मिस्टर टुडो, हा भारत वेगळा आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 11:07 AM2023-10-05T11:07:00+5:302023-10-05T11:07:27+5:30
पंतप्रधान मोदी झुकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आमची बाजारपेठ हवी असेल तर फुकट काही मिळणार नाही, याची कल्पना भारताने जगाला दिलेली आहे.
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
पाकिस्तान विषयाची दारे बंद केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडों यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. कॅनडाविरुद्धची भूमिका त्यांनी आणखी कठोर केली असून, निदान नजीकच्या भविष्यात ते मागे हटण्याची शक्यता नाही. हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचे हस्तक असल्याचा जाहीर आरोप ट्रुडो यांनी केला. त्यावर हा आरोप भारताच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत नसून विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचा खुलासा भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केला. भारताविरुद्धच्या आरोपाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा ट्रुडो यांनी दिलेला नाही, हेही त्यांनी सांगितले.
अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा पाच देशांच्या भारताचा हात असल्याचे दर्शवतो, असे वॉशिंग्टनने म्हटले असून भारताने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु पंतप्रधान मोदी झुकण्याच्या मनस्थितीत नाहीत. कॅनडाच्या भारतातील वकिलातीतून ४१ अधिकाऱ्यांना देशाबाहेर घालवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
भारताविरुद्ध हिंसाचार करू पाहणाऱ्यांचा कैवार कॅनडा घेत असून दहशतवाद्यांना साथ देत आहे, असे भारताने कॅनडा आणि वॉशिंग्टनला कळविले. भारताविरुद्ध पुरावा असेल तर कॅनडा तो उघड का करत नाही, हा एक कळीचा प्रश्न आहे. व्हिएन्ना परिषदेशी बांधील असल्यामुळे कॅनडा कोणतीही माहिती उघड करू शकत नाही. राजनैतिक अधिकाऱ्याला याबाबतीत टोकता येत नाही; त्यांना पूर्णपणे अभय असते. कॅनडाने भारताला अधिकृतपणे ही गुप्त माहिती पुरवली तर कॅनडा किंवा अमेरिकेने कॅनडात काम करत असलेल्या राजनीती अधिकाऱ्यांना कायदेशीरपणे टोकले, असा अर्थ होईल. निज्जर यांच्या हत्येपेक्षाही गंभीर असे दूरगामी परिणाम त्यामुळे होतील.
एका वेगळ्या भारताशी आपण दोन हात करत आहोत हे टूडो यांना बहुधा समजले नसावे, कॅनडात स्थायिक भारतीय वंशाच्या काही लोकांच्या संगतीने संघटित गुन्हेगारी चालते, फुटीरतावाद, दहशतवाद, खंडणीखोरी अशा गोष्टी तेथे बोकाळल्या आहेत, अशी मोदी यांची धारणा आहे करणाऱ्या भारतविरोधी दहशतवाद्यांना लगाम घालावा, असे मोदी यांनी त्या देशाला सांगितले आहे. २०१८ सालीच अशा लोकांची यादी देण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच 'जी २०' देशांची बैठक झाली तेव्हा मोदी टूडो यांच्याशी काहीसे कठोरपणेच वागले. तरीही टूडो यांनी काही केले नाही, तेव्हा मोदी यांनी त्यांना त्यांच्याच औषधाची कडू गोळी घ्यायला लावली सरसकट बंदी लावण्यात आलेली असतानाही आम्ही रशियाकडून तेल घेणे चालूच ठेवू, असे भारताने अमेरिकेला ठामपणे कळवले होते, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. तसे करणे आमच्या देशाच्या हिताचे आहे असे मोदी यांनी अमेरिकेला स्पष्ट सांगितले होते. शेवटी, अमेरिकेला
याबाबतीत रस्ता बदलावा लागला.
धोरणातील मोठा बदल
बालाकोटमध्ये २०१९ साली दहशतवाद्यांचे पाकव्याप्त काश्मीरमधील तळ उद्ध्वस्त करताना भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केला. हे करताना पंतप्रधान मोदी यांनी लागेल. भारताच्या धोरणात एक मोठा बदल केला होता. भारत आपल्या सीमेचे रक्षण करील, परंतु शत्रूपक्षावर सीमा ओलांडून हल्ला करणार नाही, अशी भारताची जाहीर भूमिका होती. परंतु बालाकोटमुळे ते सर्व बदलले. मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्याचे ठरवले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यामुळे मोदी यांची भूमिका आक्रमक झाली असल्याचे भारतीय गुप्तचरांच्या पवित्र्यावरून दिसते, असे त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे. डोभाल पंतप्रधान कार्यालयात गेली १० वर्षे काम करत आहेत. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते काम करत असून पाकिस्तान विषयाचे तज्ज्ञ मानले जातात. २००५ साली दाऊद इब्राहिमची टोळी संपवण्यासाठी दहशतवाद्यांचा उपयोग करून घेण्याची योजना त्यांनी आखली होती. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मुंबई पोलिसांच्या अजागळपणामुळे डोभाल यांचे नियोजन उधळले गेले ही गोष्ट वेगळी. डोभाल इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख म्हणून त्याचवर्षी निवृत्त झाले. परंतु भारतीय संस्थांना त्यांच्या कामात ते मदत करत राहिले. पाकिस्तानशी त्याच्या भाषेतच बोलले पाहिजे, असे डोभाल कायम म्हणत आलेले आहेत. 'आक्रमकता हेच संरक्षण' हीच भूमिका घेतली पाहिजे, असा आग्रह त्यांनी कायमच धरला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत बदललेला आहे असेच दिसते. पैसे कमावण्यासाठी आम्ही आमची बाजारपेठ तुम्हाला देत असू तर फुकट काही मिळणार नाही, याची कल्पना भारताने पश्चिमी जगाला दिलेली आहे. किंमत मोजावीच लागेल आणि कॅनडाला दहशतवाद्यांविरुद्ध सरळ व्हावे लागेल हे भारताने स्पष्ट केल्यानंतर आता या विषयावर शेवटी काय होते पाहावे लागेल.
दुर्लक्षित नायक
रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉचे प्रमुख सामंत गोयल हे नव्या जमान्यातले दुर्लक्षित राहून गेलेले नायक म्हणावे लागतील. १९८४ च्या पंजाब केडरचे ते आयपीएस अधिकारी. जून २०२३ पर्यंत चार वर्षे ते रॉ च्या प्रमुखपदी होते. त्यांच्या कार्यकाळातच भारताने देशाबाहेर वेगवेगळ्या गुप्त कारवाया केल्या. जे घडत होते त्याच्यावर अर्थातच अजित डोभाल यांची पकड होती. पाकिस्तानातील भारतविरोधी शक्तींना पळता भुई थोडी केल्यानंतर सामंत गोयल आता निवृत्त झाले आहेत.
आता पाकिस्तानचीही भाषा बदलली आहे. भारताबरोबर शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी आता तिथल्या लोकांकडूनच होऊ लागली आहे.