Mumbai Cruise Drugs Case: आर्यन हे असा वागला त्याचा सर्वस्वी दोष त्याला देऊन चालणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 08:52 AM2021-10-04T08:52:43+5:302021-10-04T08:55:17+5:30

शाहरुख ही बॉलिवुडमधील सक्सेस स्टोरी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शाहरुखने कष्टाने बॉलिवुडमधील आपले स्थान निर्माण केले.

Mumbai Cruise Drugs Case: Aryan khan will not be blamed for his behavior | Mumbai Cruise Drugs Case: आर्यन हे असा वागला त्याचा सर्वस्वी दोष त्याला देऊन चालणार नाही

Mumbai Cruise Drugs Case: आर्यन हे असा वागला त्याचा सर्वस्वी दोष त्याला देऊन चालणार नाही

Next

बॉलिवुडचा किंग खान शाहरूख खान याचे पुत्ररत्न वयात आले आहे हे जगाला कळायला मार्ग नव्हता. कारण आर्यन खान याची अजून तरी शाहरूखचा पुत्र हीच ओळख आहे. आर्यन याने अजून तरी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवल्याचे ऐकिवात नव्हते. मात्र शनिवारी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवरील पार्टीत आर्यन व त्याच्या काही साथीदारांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले व रविवारी अटक केली. क्रुझवरील पार्टीत काहीजण अमली पदार्थांचे सेवन करीत होते, असा दावा एनसीबीने केला आहे. आता आर्यन याने अमली पदार्थांचे सेवन केले व त्याच्या सोबत अमली पदार्थ होते का वगैरे प्रश्नाची उत्तरे तपासात मिळतील. भविष्यात न्यायालयात एनसीबीचा दावा किती टिकतो हेही पहावे लागेल. मात्र मीडियाला आर्यनची पहिली ठळक ओळख अशी वादातून झाली हेच खरे.

Shah Rukh Khan's old interview saying Aryan Khan 'can do drugs'

शाहरुख ही बॉलिवुडमधील सक्सेस स्टोरी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शाहरुखने कष्टाने बॉलिवुडमधील आपले स्थान निर्माण केले. आर्यन हा मात्र तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. लायन किंग या अँनिमेटेड चित्रपटाचा हिरो सिम्बा याचे संवाद आर्यनने म्हटले तर, सिम्बाचे वडील मुफासा याचे संवाद स्वत: शाहरुखने म्हटले आहेत. अर्थात आर्यन हे असा वागला त्याचा सर्वस्वी  दोष त्याला देऊन चालणार नाही. कारण तो ज्या वर्षी १९९७ साली जन्माला आला त्याच वर्षी शाहरुखने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या मुलांना धूम्रपान, अमली पदार्थ सेवन व शरीरसंबंध अशा सर्वच बाबतीत स्वातंत्र्य देणार, असे जाहीर केले होते. घरात पडलेल्या पैशांच्या राशी आणि  निर्णयाचे स्वातंत्र्य व स्वैराचार याची गल्लत यामुळे आर्यन लवकरच वयात आला. अमली पदार्थांचे सेवन करण्याचे तरुण पिढीतील प्रमाण गेल्या काही वर्षांत बेसुमार वाढले आहे.

Aryan Khan के पास मिला कोकीन-हशीश और लाखों रुपये, सामने आई NCB की अरेस्ट रिपोर्ट - MUMBAI CRUISE DRUG BUST arrest memo of aryan khan ncb seized drugs cocaine md and money

कोरोना हे जर जैविक युद्ध असेल तर अमली पदार्थांचा साठा शत्रूराष्ट्रात धाडून तेथील तरुण पिढी नशेच्या आहारी जाईल, असे जाळे निर्माण करायचे हाही युद्धनितीचाच भाग आहे. पंजाबमधील ५० टक्क्यांहून अधिक युवक हा अमली पदार्थांच्या जाळ्यात सापडला असून, हे जळजळीत वास्तव “उडता पंजाब” चित्रपटात मांडले आहे. बॉलिवुडमधील शाहरुखसारख्या बड्या कलाकारांना दिवसात अठरा तास शुटिंग करावे लागते. दीर्घकाळ शुटिंग केल्यानंतर येणारा थकवा चेहऱ्यावर दिसू नये याकरिता माफक प्रमाणात कलाकार अमली पदार्थ घेतात, असे सांगितले जाते. आतापर्यंत अशा अमली पदार्थांच्या पार्ट्या मढ आयलंड परिसरात किंवा रिसॉर्टवर होत. मात्र गेल्या दीडेक वर्षात सुशांतसिंग राजपुत प्रकरणानंतर एनसीबीच्या कारवाया वाढल्याने क्रुझवर भर समुद्रात पार्टी केली तर एनसीबी तेथे पोहोचणार नाही, असा आयोजकांचा भाबडा समज झाला असावा.

शर्टाच्या कॉलर, पर्सची हँडल यापासून पुरुषांच्या अंतर्वस्त्रातून अमली पदार्थ क्रुझवर नेले तरी ते पकडले गेले. या पार्टीत आर्यन पकडला गेला नसता तर कदाचित मीडियात या कारवाईची एवढी चर्चा झाली नसती. शाहरुख खान याचे राहुल, प्रियंका गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईटरायडर्स या टीमच्या सामन्यांना प्रियंका व रॉबर्ड वड्रा यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे शाहरुखच्या मुलाऐवजी विद्यमान सरकारमधील सर्वोच्च नेत्यांच्या मुलाखती घेणाऱ्या, सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या अथवा महाविकास आघाडी सरकारविरोधात ट्विटचा पाऊस पाडणाऱ्या एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचा नातलग क्रुझ पार्टीत अमली पदार्थाचे सेवन करताना आढळला असता तर कठोर कारवाई झाली असती का? असा प्रश्न गेल्या वर्षांतील कारवाईतील भेदाभेदामुळे बॉलिवुडच्या मंडळींच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

Aryan Khan Arrest News: Shah Rukh Khan's son Aryan Khan arrested by NCB in drugs raid case

सप्टेंबर महिन्यात एका उद्योगसमूहाच्या ताब्यात असलेल्या गुजरातमधील मुंद्रा या बंदरातून हेरॉइनचा हजारो किलो साठा जप्त केला. बाजारात त्याची किंमत काही हजार कोटी रुपये आहे. त्या उद्योगसमूहाची गेल्या सात वर्षांत भरभराट झाली आहे. मुंद्रा पोर्टमध्ये आलेल्या त्या अमली पदार्थांकरिता सर्व संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. कदाचित अशा अनेक पार्ट्यांत येणारे अमली पदार्थ त्याच मार्गाने येत असतील. सिम्बा त्याच्या वडिलांची हत्या करणाऱ्या दुष्ट सिंहाची हत्या करून लायन किंग होतो. आर्यनने सिम्बा असतानाच पावडरची शिकार होऊ नये.

Web Title: Mumbai Cruise Drugs Case: Aryan khan will not be blamed for his behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.