काँग्रेसला आज एक-दोन नव्हे अशा शेकडो भगिरथप्रसादांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 03:39 AM2017-08-29T03:39:31+5:302017-08-29T03:40:03+5:30

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. येत्या १९ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षात कार्यक्रम घ्यावेत, सामाजिक उपक्रम राबवावेत असे विदर्भातील काँग्रेस नेत्यांना अजिबात वाटत नाही.

The need of hundreds of hundreds of hundreds of calamities like the Congress today is not one or two | काँग्रेसला आज एक-दोन नव्हे अशा शेकडो भगिरथप्रसादांची गरज

काँग्रेसला आज एक-दोन नव्हे अशा शेकडो भगिरथप्रसादांची गरज

googlenewsNext

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. येत्या १९ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षात कार्यक्रम घ्यावेत, सामाजिक उपक्रम राबवावेत असे विदर्भातील काँग्रेस नेत्यांना अजिबात वाटत नाही.(पूर्व नागपुरातील दि. १९ नोव्हेंबर २०१६ चा एकमेव कार्यक्रम वगळता) नव्या पिढीला इंदिराजींच्या जीवन कार्याची ओळख व्हावी, यासाठीही हे नेते वर्षभर कुठे राबताना दिसले नाहीत. काँग्रेसच्या पुण्याईवर रंकाचा राव झालेल्या या नेत्यांचा कृतघ्नपणा सामान्य कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा आहे. विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे सध्या दोन वर्ग आहेत. एक वर्ग अंतर्गत लाथाळ्यात मग्न तर दुसरा भाजपाशी जुळवून घेण्यात. त्यातील पहिल्याला राहुल, सोनिया गांधींकडे सतत तक्रारीच कराव्याशा वाटतात. दुसºया वर्गातील नेते शिक्षणसंस्था, बँका, बळकावलेल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी गडकरी-फडणवीसांशी संधान साधून आहेत. गडकरींच्या षट्यब्दीपूर्ती समारंभात व्यासपीठावर खुर्ची नसल्याने त्यांना खाली मान घालून परत जावे लागते, तरीही त्यांचा स्वाभिमान दुखावत नाही, एवढे ते मजबूरही असतात.
चंद्रपुरात तर आणखी मोठी गंमत आहे. तेथील नेते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कुणी करावे, यासाठी भांडतात. यवतमाळात पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दहा नेते आणि समोर फक्त पाच कार्यकर्ते उपस्थित असतात. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काँग्रेसची अशी गलितगात्र अवस्था आहे. खरे तर इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवून कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण करता आले असते. लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचे ते परिणामकारक निमित्त होते. पण, तसे काहीच घडलेले नाही. त्याचवेळी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते मात्र दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी करीत आहेत. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी दीनदयालांचे नाव भाजपा आणि संघ परिवाराबाहेर फारसे कुणालाही माहीत नव्हते. पण, आता पद्धतशीरपणे ते जनसामान्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या भाषणात त्यांचा आवर्जून उल्लेख असतो आणि भाजपा कार्यकर्ते त्यांना नित्यनेमाने प्रचारी वंदनही करीत असतात. त्यात चुकीचे काहीच नाही आणि तो टीकेचा विषयही होऊ नये. कारण, दीनदयाल उपाध्याय हे भाजपाचे वैचारिक दैवत आहे. त्यामुळे आपल्या दैवताला अधिक लोकाभिमुख करणे हे भाजपाचे कामच आहे. पण, काँगेसला वंदनीय असलेल्या इंदिराजींच्या जन्मशताब्दीचे काय? अशी जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी काँग्रेस सत्तेवरच असणे आवश्यक असते का? सत्ता नसेल तर आपल्या महापुरुषांना उपेक्षित ठेवायचे का? विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या मनाला हा प्रश्न कधीतरी विचारायलाच हवा.
काँग्रेस आणि विदर्भ हा ऐतिहासिक स्रेहबंध आहे. १९५९ साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी इंदिराजींची निवड झाली होती. याच अधिवेशनात इंदिराजींच्या पुढाकाराने सहकार शेतीचा ठराव मंजूर झाला होता. नागपुरात १८९१ आणि १९२० या वर्षीही काँग्रेसचे अधिवेशन झाले. १८९१ च्या अधिवेशनाने या पक्षाला गरिबांशी अधिक घट्टपणे जोडले. देशातील सामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न २७ रुपये आणि भारतातील इंग्रजांचे मात्र ५७० रुपये ही आर्थिक विषमता नष्ट करण्याचा विचार याच अधिवेशनात रुजला. आणीबाणीनंतरच्या अतिशय वाईट काळात विदर्भातीलच काँग्रेस कार्यकर्ते इंदिराजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्या पुण्याईवरच दगड-धोंड्यांनाही कार्यकर्त्यांनी शेंदूर फासला व ते पुढे आमदार, खासदार, मंत्री झाले. तीच मंडळी आज पक्षाला कृतघ्न झाली आहेत. अशा गढूळ वातावरणात १८९१ च्या काँग्रेस अधिवेशनातील एक आठवण या संधिसाधूंच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरावी, अधिवेशन संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भोजनासाठी आणलेले बटाटे उरले होते. त्यावेळचे नागपूर शहर चिटणीस भगिरथ प्रसाद दुसºया दिवशी बाजारात गेले आणि त्यांनी हे बटाटे विकून त्यातून आलेले ८० रुपये काँग्रेस कमिटीत जमा केले. काही काँग्रेस नेत्यांचे वर्र्तमान बघता ती गोष्ट दंतकथा वाटावी. काँग्रेसला आज एक-दोन नव्हे अशा शेकडो भगिरथप्रसादांची गरज आहे. या दळभद्री नेत्यांना अडगळीत टाकून आता कार्यकर्त्यांनीच ‘भगिरथ’ व्हावे. इंदिराजींच्या जन्मशताब्दीचे तेच मोठे मोल असेल.
- गजानन जानभोर

Web Title: The need of hundreds of hundreds of hundreds of calamities like the Congress today is not one or two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.