सुरू झालाय अर्थशास्त्रचा नव्याने विचार

By admin | Published: November 23, 2014 02:00 AM2014-11-23T02:00:52+5:302014-11-23T02:00:52+5:30

युरोपच्या औद्योगिक विकासानंतर देखील हीच स्थिती होती. इंग्रजांच्या लुटीमुळे आज देशाची ही दुर्दशा झाली आहे.

New ideas for starting economics have started | सुरू झालाय अर्थशास्त्रचा नव्याने विचार

सुरू झालाय अर्थशास्त्रचा नव्याने विचार

Next
युरोपच्या औद्योगिक विकासानंतर देखील हीच स्थिती होती. इंग्रजांच्या लुटीमुळे आज देशाची ही दुर्दशा झाली आहे. आज जेव्हा जगाच्या स्तरावरच आर्थिक दुर्दशा आली आहे तेव्हा मार्गदर्शनाकरिता भारताच्या तत्त्वांचा अभ्यास करावा लागेल. ही पूर्ण प्रक्रि या दीर्घकालीन आहे. 
गोष्ट तर जुनीच आहे, बालपणी आईन सांगितलेली. पण आजच्या अ(न)र्थशास्त्नास अचूक लागू पडते. चंगू-मंगू दोन मित्न होते. गावात राहायचे. आळशी होते, काहीच कामधंदा करीत नव्हते. दोघांच्या बायका कष्टाळू होत्या. घरकामासोबतच कमाई पण त्याच करायच्या. पूर्ण घर चालवायच्या. एक दिवस चंगूच्या बायकोने त्याला खूप फैलावर घेतले. मटका भरून लिंबू-सरबत करून दिले आणि शेजारच्या गावात बाजारात जाऊन विकायला सांगितले. संयोगाने त्याच दिवशी मंगूच्या बायकोने पण मंगूला रागावले आणि संत्र्याचा रस भरून बाजारात पाठवले. दोघींनी ताकीद दिली की कोणालाही एक पेला पण फुकटात द्यायचा नाही. एक रु पया प्रति ग्लास घेऊनच द्यायचे. विशेष ताकीद होती की मंगूने चंगूला व चंगूने मंगूला बिलकुल फुकटात सरबत द्यायचे नाही. दोघे मित्न शेजारच्या गावाला निघाले. डोक्यावर भरलेले घडे, तापतं ऊन आणि कामाची कधी सवय नाही, लवकरच दोघेही थकले. झाडाखाली बसले. चंगू म्हणाला, तहान लागलीय. मंगू म्हणाला, ‘‘बायकोने स्पष्ट सांगितलंय, स्वत: प्यायचं नाही आणि फुकटात मंगूला द्यायचं नाही. मंगू - फुकटात कोण मागतय? हा घे एक रु पया आणि दे एक ग्लास सरबत.’’ आता रु पया मंगूकडे होता. एक ग्लास संत्ना रस त्याने घेतला. आता Aरुपया चंगूकडे. शेयर बाजारात पैसे गुंतवणा:या सुजाण वाचकांना कळलेच असेल की लवकरच दोन्ही घडे रिकामे झाले. एक रुपयाने इकडून तिकडे खूप चलन करून दोघांचाही टर्नओवर बराच वाढवला. मंगूने 2क्क् ग्लास रस विकला आणि चंगूने 2क्क् ग्लास सरबत. घरी गेल्यावर दोन्ही बॅलन्सशिटना अप्रतिम प्रतिसाद गृह मंत्नालयाकडून मिळालाच असणार. 
विकासाची अशीच अर्धवट कल्पना घेऊन गेली अनेक वर्षे पूर्ण जगच चंगू-मंगूचा खेळ खेळतंय. परिणामी  मंदीचे वैश्विक चक्र, जागतिक प्रदूषण अशा समस्यांनी मानवता ग्रासित झालेली दिसते. मूळ अडचण संतुलनाची आहे. पर्यावरणप्रेमी असाल तर विकासाला विरोध, विकासाकडे फक्त लक्ष दिले तर निसर्गाचं वाटोळं, व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं म्हणाल तर समाजाकडे दुर्लक्ष, समाजवादाची अति झाली तर व्यक्तीकडे दुर्लक्ष़़़ सरकारचं नियंत्नण किती असावं आणि खाजगीकरण किती? पूर्ण जगच या द्वंद्वात फसलेलं दिसतंय. या सर्वावर शाश्वत उपाय म्हणून एक नवीन अर्थशास्त्नाचा विचार जगात सुरू झालाय. भारत अनेक सहस्रकं जगात सर्वात श्रीमंत व उत्पादक देश राहिलेला आहे. जगातील सध्याच्या श्रीमंत देशांची संघटना असलेल्या एका संघटनेने सहस्रकाच्या बदलाच्या वेळी इसवी सन 2क्क्क् मध्ये अंगास मेडिसन नावाच्या अर्थशास्त्र्याला जगाच्या आर्थिक इतिहासावर संशोधन करण्याचा ठेका दिला. इसवी सनाच्या सुरुवातीपासून 2क्क्क् वर्षाचा आर्थिक इतिहास अंगास मेडिसनने लिहिला. त्याने निर्विवादपणो सिद्ध केले की 14 व्या शतकार्पयत भारताने जगाचे नेतृत्व केले. जगाच्या सकल उत्पादनाच्या दोनतृतीयांश 66 टक्के भाग भारताचा होता. चीनच्या उदयानंतर 16व्या शतकात हा थोडा कमी होऊन 33 ते 4क् टक्क्यार्पयत आला. पण हे मात्न नक्की की 18व्या शतकात इंग्रजांचे राज्य भारतात रूढ होण्यापूर्वी भारत जगाचा निर्विवाद नेता होता. युरोपच्या औद्योगिक विकासानंतर देखील हीच स्थिती होती. इंग्रजांच्या लुटीमुळे आज देशाची ही दुर्दशा झाली आहे. आज जेव्हा जगाच्या स्तरावरच आर्थिक दुर्दशा आली आहे तेव्हा मार्गदर्शनाकरिता भारताच्या तत्त्वांचा अभ्यास करावा लागेल. ही पूर्ण प्रक्रिया दीर्घकालीन आहे. (लेखक अर्थतज्ज्ञ आहेत.)
 
विकास म्हणजे फक्त पैशाची प्रचुरता असा न होता शिक्षण, स्वास्थ्य, कला या सर्व अंगांचा विकास अपेक्षित आहे. 
विकासाची कल्पना भोगाच्या अतिरेकावर नसून आनंदाच्या प्राप्तीला महत्त्व देणारी आहे. आनंद नेहमी सामूहिकच असतो. 
व्यक्तीला स्वत: काही प्राप्त झाले, नवीन मिळाले तरी ते जोवर कोणाला सांगत नाही तोवर आनंद मिळत नाही. 
ही सामूहिक आनंदाची कल्पना विकासाचा केंद्रबिंदू झाली, तर सर्व योजनांचे लक्ष्य व्यक्ती होण्याऐवजी परिवार, गाव असे सामूहिक एकक असतात. 
 
- मुकुल कानेटकर

 

Web Title: New ideas for starting economics have started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.