नव्या स्मारकाचे मधाचे बोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:19 AM2018-08-16T06:19:18+5:302018-08-16T06:19:33+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक रे यांच्या महापौर निवासातील स्मारक ाचे घोंगडेभिजत पडलेआहे. त्यातच आता अनेक अडथळेपार करू न वरळीत त्यांच्या नावे भव्य क न्व्हेन्शन सेंटर उभारण्याची इच्छा भाजपा नेत्यांनी मांडली आहे. ही निवडणुक ीच्या तोंडावर शिवसेनेला मधाचेबोट लावण्याची रणनीती तर नाही ना?

 The new monument's middle finger? | नव्या स्मारकाचे मधाचे बोट?

नव्या स्मारकाचे मधाचे बोट?

Next

- मिलिंद बेल्हे
विधानसभेच्या निवडणुक ीत जे व्हायचे ते होवो, पण लोक सभा निवडणुक ीत क से क ा होईना शिवसेनेला भाजपासोबत ठेवण्याचे
जेवढे जमतील तेवढे प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांक डून सुरू आहेत. सत्तेत राहून विरोधी भूमिक ा बजावण्याच्या शिवसेनेच्या
प्रयत्नांक डे दुर्लक्ष क रण्याचा पवित्रा भाजपा नेत्यांनी आजवर घेतला. पण लोक सभा निवडणुक ा जसजशा जवळ येत आहेत, तशी
भाजपा नेत्यांची घालमेल वाढतेआहे. म्हणजे ते तसे दाखवून तरी देत आहेत. आंध्रात चंद्राबाबू नायडू यांनी वेगळी चूल मांडल्यावर
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांसोबतच मित्रपक्षांसोबतही संपर्क अभियान सुरू के ले. शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाक रे यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी शहा यांनी केलेली चर्चा हा त्याचाच भाग होता. त्याला शिवसेनेचा प्रतिसाद हवा तितक ा समाधानक ारक नाही.
खरंतर दिल्लीत जाऊ न तेथील नेत्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याक डेपत्रेदेऊ न आपल्या मागण्या रेटणे ही क ाही ठाक रे कुटुंबीयांच्या
राजक ारणाची परंपरा नाही. जेआदेश द्यायचे ते मुंबईतूनच. तरीही शिवसेनेच्या नव्या पिढीचे नेते असलेल्या आदित्य यांनी ती
‘परंपरा’ दूर सारत गेल्या आठवड्यात दिल्लीत विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. वेगवेगळ््या विषयावरील मागण्यांची निवेदने
दिली. तेव्हाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेवरळी क ोळीवाड्यात सी लिंक च्या पार्श्वभूमीवर क न्व्हेन्शन सेंटर
उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदामंत्री नितीन गडक री यांनी मांडला. पालिकेची तीन एक र आणि बीपीटीची दोन एक र अशा पाच एक रांच्या प्रशस्त जागेत हेसेंटर उभारण्याची ही क ल्पना आहे. ती राबवण्यासाठी वरळी क ोळीवाड्याच्या पुनर्विक ासाची योजना आधी राबवावी लागेल. सोबतच पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवून तेथे पुनर्वसन योजना राबवावी लागेल. त्यानंतर ही जागा मोक ळी होईल आणि त्यात सेंटर उभारले जाईल, अशी ही क ल्पना आहे. वस्तुत: दादरला महापौर निवासाच्या
जागेत बाळासाहेब ठाक रे यांच्या स्मारक ाच्या क ल्पनेवर क ाम सुरू आहे. तेथून मुंबईच्या महापौरांना राणीच्या बागेत हलवायचे होते.
पण तो बंगला रिक ामा होत नाही आणि त्या जागेत जाण्याची कुणाचीच मनापासून इच्छा नाही. त्यामुळे मूळचे स्मारक सध्या जागेच्या
वादाभोवतीच फि रते आहे. ते मार्गी लागण्यातील हे अडथळे दूर होण्यापूर्वीच क न्व्हेन्शन सेंटरच्या क ल्पनेचे इमले उभारले जात आहेत. ते पाहता बाळासाहेबांच्या पुण्याईचे दान मागत नव्याने शिवसेनेला चुचक ारण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असे वाटणेस्वाभाविक आहे. या साऱ्या क ल्पनांना शिवसेना क सा प्रतिसाद देते त्यावर भाजपाच्या प्रयत्नांचे फ लित अवलंबून आहे.
 

Web Title:  The new monument's middle finger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.