तरुण पिढीची नवी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:06 AM2018-09-09T05:06:44+5:302018-09-09T05:06:50+5:30

कामजीवनातील समस्या टाळण्यासाठी आपण बरेच काही करू शकतो.

A new problem of young generation | तरुण पिढीची नवी समस्या

तरुण पिढीची नवी समस्या

googlenewsNext

-डॉ. मिनू भोसले
कामजीवनातील समस्या टाळण्यासाठी आपण बरेच काही करू शकतो. जसे की, दररोज व्यायाम करणे, पहाटे लवकर उठणे, खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे, पार्टनरची इच्छा समजून घेणे. समोरच्याची अडचण समजून त्याला विश्वासात घेऊन सहानुभूतीने कार्य करणे, वाईट सवयी टाळणे, परंतु एखादी अडचण आलीच, तर ती लपवून चालणार नाही. ती तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यावर योग्य तो उपचार केलाच पाहिजे. कामजीवन हा विषय मनुष्य जीवनातील अतिमहत्त्वाचा भाग आहे. आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये पती-पत्नींना बऱ्याच लैंगिक समस्यांनी ग्रासलेले आहे. गेल्या काही दिवसांत इरेक्टाइल डिसफंक्शन ही लैंगिक मानसिक समस्या तरुणपिढीमध्ये आढळून येते, या समस्येबद्दल अधिक जाणून घेऊ या.हा आजार नेमका कशामुळे होतो?
‘इरेक्टाइल डिसफंक्शन’ हा एक लैंगिक मानसिक आजार आहे. हा मानसिक आजार लैंगिक संबंधांविषयी असून, पुरुषांमध्ये पाहायला मिळतो. सततचा ताण-तणाव आणि चिडचिडेपणा यामुळे पुरुषांमध्ये हा आजार दिसू शकतो. बºयाचदा या समस्येमागे सेक्सदरम्यान असणारी चिंता-काळजी अथवा सेक्सबाबत स्वत:कडून असणाºया काल्पनिक अपेक्षा अशी मानसिक कारणे असतात.
या आजाराची लक्षणे कोणती?
उपचारासाठी आलेली एक महिला तिच्या पतीला घेऊन माझ्याकडे आली होती. इरेक्टाइल डिसफंक्शन यामुळे ती त्याला सोडून जाईल, असे तिचे म्हणणे होते. या महिलेचा नवरा माझ्याशी नजर मिळवित नव्हता. मात्र, त्याच्या चेहºयावर खूप चिंतेचे भाव दिसत होते. तपासणीतून लक्षात आले की, या व्यक्तीला झालेल्या इरेक्टाइल डिसफंक्शन आजाराचा संबंध हा सततची चिंता आणि चिडचिडेपणा याच्याशी आहे. २५-३० वयोगटांतील तरुण मुलेदेखील सध्या ही तक्रार घेऊन येतात. या आजाराला सर्वांत अति प्रमाणात पॉनोग्राफी कारणीभूत आहे. ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’ आजार होण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे, मानसिक, मेंदूसंबंधी आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आहेत. बहुतेक लोकांमध्ये हा आजार मानसिक स्वरूपाचा पाहायला मिळतो.
त्यासाठी उपचारपद्धती कोणती?
या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीच्या पत्नीचेदेखील समुपदेशन करायचे होते. सध्या सायकोजेनिक इरेक्टाइल डिसफंक्शन या आजाराला तरुण
मुले जास्त बळी पडताना दिसतात. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे
की, खºया आयुष्यातील लैंगिक
संबंध हे फार वेगळे असतात. अशा प्रकारच्या रुग्णांवर औषधे कमी तर थेरेपीच्या आधारे उपचार करण्यात येतात. अतिप्रमाणातील पॉनोग्राफीही या समस्येला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. काही वेगळ्या पद्धतींद्वारे जसे की, ड्युअर सेक्स थेरेपी यामध्ये नवरा आणि बायको दोघांचे समुपदेशन केले जाते. यामध्ये एक गोष्ट चांगली म्हणजे, लोक या समस्येला आजार समजतात आणि याच्या उपचारांसाठी आता स्वत:हून पुढाकार घेतात.

Web Title: A new problem of young generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.