नीरव मोदीच्या कृष्णकृत्यांचा पेटाराच उघडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:17 AM2018-02-23T03:17:26+5:302018-02-23T03:17:38+5:30

पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँडी शाखेतील लेटर आॅफ अंडरस्टँडिंगचा भरणा करण्यासाठी हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे अधिकारी बँकेत पोचले त्या १६ जानेवारीलाच नीरव मोदी अािण मेहुल चोकसी यांचा हिºयाचा व्यवहार कोसळला.

Nirav Modi's Krishna Consciousness patent opened! | नीरव मोदीच्या कृष्णकृत्यांचा पेटाराच उघडला!

नीरव मोदीच्या कृष्णकृत्यांचा पेटाराच उघडला!

Next

हरीश गुप्ता, लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर

पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँडी शाखेतील लेटर आॅफ अंडरस्टँडिंगचा भरणा करण्यासाठी हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे अधिकारी बँकेत पोचले त्या १६ जानेवारीलाच नीरव मोदी अािण मेहुल चोकसी यांचा हिºयाचा व्यवहार कोसळला. हे व्यवहार हाताळणाºया बँकेच्या सहायक व्यवस्थापकाला या व्यवहारात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. तासाभरातच या घोटाळ्याची चर्चा होऊ लागली. नीरव मोदी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये सुटीचा आनंद घेत होता. त्याच्याशी अधिकाºयांनी बोलणी केली तसेच बँकेच्या अधिकाºयांनाही पैशाची व्यवस्था करण्यात येत आहे असे सांगून अंबानीसह अन्य अधिकाºयांनी बँकेला दहा दिवस झुलविले. अखेर बँकेचे प्रबंध संचालक सुनील मेहता यांनी वित्त मंत्रालयातील बँकिंग सचिवाला या घोटाळ्याची कल्पना दिली. त्यांनी वित्त सचिव हसमुख अढिया यांना सर्व काही सांगितले. अढियांनी वित्तमंत्र्यांना त्याची माहिती दिली आणि वित्तमंत्र्यांनी पंतप्रधानांना ती अवगत केली. अखेर २८ जानेवारीला पंजाब नॅशनल बँकेने रु. २८० कोटीचा घोटाळा झाल्याची तक्रार सी.बी.आय.कडे नोंदवली! सी.बी.आय.ने घटनेची चौकशी सुरू केल्यावर घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचे लक्षात आले. अखेर १३ फेब्रुवारीला रु.११,४०० कोटींचा घोटाळा असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
मोदीची मालमत्ता
रु. ८०० कोटीचीच!
या तक्रारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीच्या प्रतिष्ठानावर छापे घालून रु. ५७०० कोटी किमतीचे फ्लॅट्स आणि अन्य अलंकार ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या अलंकाराचे मूल्य किती आहे याचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. पण मोदीची स्थावर मालमत्ता रु. ८०० कोटीची असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी त्यापैकी किती मालमत्ता तारण म्हणून बँकांकडे किंवा अन्य कुणाकडे ठेवली आहे हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. ताब्यात घेतलेल्या अलंकारांचे मूल्यांकन संचालनालयाने इतक्या झटपट कसे केले याविषयी उद्योगजगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नीरव मोदीचा व्यवसाय हा कच्चे हिरे हाँगकाँग येथून विकत घ्यायचे आणि त्यांना पैलू पाडून व पॉलीश करून ते अधिक किमतीत विकायचे हा होता. आतापर्यंत ई.डी.ने मोदीच्या तसेच गीतांजली जेम्सच्या प्रतिष्ठानांवर छापे घालून रु. ५७०० कोटीचे हिरे (त्यांच्या पुस्तकातील नोंदलेल्या किमतीनुसार) ताब्यात घेतले आहेत. आयात केलेल्या कच्च्या हिºयांच्या मूल्यावर आधारित कर्जे बँकेकडून दिली जातात. त्यामुळे या हिºयांचे खरे मूल्य काय याचे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही.
आयकर विभागाने मोदी ग्रुपची १०३ बँक खाती आणि ४० मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांचे मूल्य आयकर विभागाने जाहीर केले नाही. अलंकारांचे मूल्य रु. ५७०० कोटी असल्याचे जाहीर करून ई.डी. अडचणीत आले आहे. कारण त्यांचे मूल्य रु. १४०० ते १५०० कोटीच असावे असे सांगितले जात आहे! कच्चे हिरे विकत घेऊन त्यांना पैलू पाडून ते स्थानिक बाजारात अधिक किमतीत नीरव मोदी विकत होता असे समजते.
नीरव मोदीचा आणखी
एक घोटाळा
हैदराबाद सेझमध्ये असलेल्या नीरव मोदीच्या मालमत्तेच्या किमती पी.एन.बी.च्या खात्यात फुगवून नमूद केल्या आहेत. या सेझमध्ये नीरव मोदीच्या हिºयाच्या पाच फर्म असून त्यांचे गीतांजली जेम्स पार्क असे नाव आहे. गीतांजली पार्क येथून १०० पेट्या ताब्यात घेण्यात आल्या, ज्याचे मूल्य रु. ३०० कोटी असून फर्मच्या खात्यात मात्र त्याची किंमत रु. ३८०० कोटी नमूद केली आहे! या सेझमध्ये नीरव मोदीचा हिºयांचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. हिºयांना पैलू पाडण्याचे व त्यांना पॉलीश करण्याचे काम सुरत येथे होते. तेथून हिरे अरब राष्टÑात निर्यात केले जातात. सेझमध्ये ४०० कर्मचारी कामाला असून कागदावर मात्र १८५० कर्मचारी असल्याचे नोंदलेले आहे व त्यांच्या नावाने प्रॉव्हिडंड फंडमध्ये पैसे जमा केल्याचे दाखवून ते पैसेही हडप करण्यात येत होते असे दिसते.
काँग्रेस पक्षाच्या
संस्कृतीत बदल
काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी हे स्वत:साठी राजकीय सचिव ठेवणार नाहीत हे मी यापूर्वी या स्तंभातून स्पष्ट केले होते. पक्षाच्या बैठकीनंतर ते कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला भेटण्यासाठी सार्वजनिक दरबाराचे आयोजन करतील असेही मी लिहिले होते. राहुल गांधींची पाऊले त्या दिशेने पडत आहेत असे दिसते. त्यांनी पक्षातील असंतोष शमविण्याचा प्रयत्न चालविला आहे. समविचारी पक्षांसोबत बोलणी करण्यापूर्वी पक्षातील असंतोष कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पूर्वी ते कार्यकर्त्यांना भेटत नव्हते. तसेच त्यांच्या एस.एम.एस.ची दखलही घेत नव्हते. पण आता पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात परत आणण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक राज्यातील कार्यकर्त्यांना पक्षाशी बांधून ठेवण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी करावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शीला दीक्षित आणि अजय माकन यांच्यातील मतभेद त्यांनी दूर केले. तसेच पक्ष सोडून गेलेल्या अरविंद सिंग लवली यांना पक्षात परत आणले, यावरून पक्षातील बदललेल्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. त्यांनी कर्नाटक, महाराष्टÑ, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश एवढेच नव्हे तर बिहारवरही लक्ष केंद्रित करून २०१९ च्या निवडणुकीत मोदींना तोंड देण्याची तयारी चालवली आहे.

Web Title: Nirav Modi's Krishna Consciousness patent opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.