आटत चालल्या नोबेलप्रतिभा?

By admin | Published: October 18, 2014 01:01 AM2014-10-18T01:01:33+5:302014-10-18T01:01:33+5:30

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार चुकीच्या किंवा अपात्र व्यक्तींना मिळाला असे नाही; पण शांतता पुरस्कार देण्यासाठी नोबेल समितीला योग्य व्यक्ती मिळाल्या नाहीत,

Nobel pratibhabe walking? | आटत चालल्या नोबेलप्रतिभा?

आटत चालल्या नोबेलप्रतिभा?

Next
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार चुकीच्या किंवा अपात्र व्यक्तींना मिळाला असे नाही; पण शांतता पुरस्कार देण्यासाठी नोबेल समितीला योग्य व्यक्ती मिळाल्या नाहीत, याचा अर्थ शांततेच्या क्षेत्रत सध्या मोठे काम सुरू नाही.
बेल शांतता पुरस्काराने अनेकदा स्वत:लाच लाजवलंय. महात्मा गांधी यांना या पुरस्कारापासून वंचित ठेवून आणि बराक ओबामा यांना तो देऊन, या पुरस्काराने स्वत:ला लाजवलं. प्रत्येक पुरस्कारामागे राजकारण असते आणि नोबेल पुरस्कार देणारी समितीही या दुबळेपणापासून  मुक्त नाही, तरीही नोबेल पुरस्काराची आजही एक प्रतिष्ठा आहे. सर्व मर्यादा आणि उणिवा असूनही  हा आज जगातला सर्वात मोठा सन्मान आहे. 
 शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराची स्थापना  19क्1 मध्ये केली गेली. त्या वर्षी हा पुरस्कार दोन व्यक्तींना विभागून देण्यात आला होता. रेड क्रॉससाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करणारे ज्यो हेन्री डुनाँ आणि जागतिक शांतता परिषदेचे आयोजक फ्रेडरिक पेसी या दोघांना हा  पुरस्कार  बहाल करण्यात आला होता. युरोपमध्ये त्या वेळी युद्धाचे ढग घोंघावू लागले होते. नोबेल शांतता पुरस्कार ज्यांना मिळतो, त्यांना मिळणा:या प्रशस्तिपत्रत, दोन देशांतला बंधुभाव, शांतता संमेलनं घेण्यासाठी केलेले परिश्रम असली भाषा आढळते. ग्रेट ब्रिटनचे विन्स्टन चर्चिल यांना शांततेसाठीच्या प्रय}ांसाठी नव्हे तर साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. 18 वर्षे सोडली तर दरवर्षी नोबेल शांतता पुरस्कार दिला जात आहे. पहिल्या वेळी 1914 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला नव्हता. 1972 मध्येही हा पुरस्कार दिला गेला नव्हता. इतर क्षेत्रतही हीच स्थिती आहे का? साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कारही 19क्1 मध्ये सुरू करण्यात आला. साहित्याचे नोबेल दिले नाही, असे एकही वर्ष गेले नाही. यावरून साहित्याच्या क्षेत्रत जगात भरपूर काम होत आहे; पण शांतता प्रस्थापित करण्याच्या क्षेत्रत फार कमी काम झाले आहे, असा निष्कर्ष काढता येईल. शांततेच्या मार्गावर काटेच काटे आहेत. जग बदलले; पण हे काटे निघाले नाहीत.  दरवर्षी काही लाख लोक युद्धात भरडले जात आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काही करीत नाही. नोबेल शांतता पुरस्कार समितीला शांततेची व्याख्या बदलणो भाग पडले, त्याचे कारण हेच असावे. युद्ध केवळ दोन देशांमध्ये लढले जात नाही. प्रत्येक देशात अनेक रूपांमध्ये ते सुरू असते, याला वर्गसंघर्ष म्हणता येणार नाही कारण या संघर्षाचे अनेक स्तर आहेत. सवर्णवादाविरुद्ध दलितांचा संघर्ष, फॅसिझमविरुद्ध लोकशाहीवाद्यांचा संघर्ष, असभ्यतेविरुद्ध सभ्यतेचा संघर्ष. समाजात अन्याय कमी करणारे, न्यायाच्या संधी वाढवणारे प्रत्येक काम हे शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. युद्ध नाही म्हणजे शांतता आहे, असे म्हणता येणार नाही, अन्याय नाही म्हणजे शांतता, असे म्हणता येईल. याच आधारावर नोबेल समितीने अनेक पुरस्कार वाटले आहेत. 2क्क्6 मध्ये  बांगला देशची ग्रामीण बँक चळवळ आणि तिचे प्रवर्तक  महम्मद युनूस यांना दिलेला नोबेल शांतता पुरस्कार, यात कुठेही युद्ध नाही; पण पुरस्कार दिला गेला.  ग्रामीण बँक चळवळ ग्रामीण आणि विशेषकरून महिलांचे सबलीकरण करते आणि आर्थिक विषमता कमी करते. आर्थिक स्वाभिमानाचे हे आंदोलन आहे. पाकिस्तानची मलाला युसूफझाई आणि भारताचे कैलाश सत्यार्थी यांना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्काराचे हेच महत्त्व आहे.  
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार चुकीच्या  किंवा अपात्र व्यक्तींना मिळाला असे मला म्हणायचे नाही; पण शांतता पुरस्कार देण्यासाठी नोबेल समितीला मोठय़ा व्यक्ती मिळाल्या नाहीत, याचा अर्थ शांततेच्या क्षेत्रत सध्या कुठले मोठे काम सुरू नाही, असा होतो. माङया मते, यंदाचा पुरस्कार व्यक्तींना नाही, तत्त्वाला मिळाला आहे. मलाला आणि सत्यार्थी हे दोघेही दोन महत्त्वपूर्ण तत्त्वांचे प्रतीक आहेत. भारतातल्या मुलांची  स्थिती वाईट आहे, ते कुपोषणाचे शिकार आहेत. शिक्षण नाही, रोजगार हे दूरचे स्वप्न आहे. बालपण वाचवा चळवळीच्या निमित्ताने एका मोठय़ा संकटाशी टक्कर घेण्याच्या दिशेने हा एक छोटासा प्रय} आहे. कैलाश सत्यार्थी यांची ही मोहीम व्यक्तीकेंद्रित बनून राहिली, हे वास्तव आहे. त्यांच्या कार्याला संघटनात्मक रूप आले नाही आणि त्यांनी हा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा विषय व्हावा इतक्या प्रमाणात काम केले, असेही नाही; 
पण भारताला आर्थिक महाशक्ती ठरविण्याचा बँडबाजा वाजविला जात असताना बालकांच्या प्रश्नाकडे भारताचे लक्ष वेधले, यासाठी नोबेल समितीचे आभार मानले पाहिजेत. ज्या देशाचे बालपण दुबळे असेल, त्या देशाचे तारुण्य 
काय असेल?  17 वर्षे वयाची मलाला. या 
मुलीने शिक्षणाच्या अधिकारासाठी मोठे काम 
केले आहे, यासाठी तिला तालिबान्यांची गोळी खावी लागली. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर मलाला म्हणाली, ‘नोबेल मिळाल्याने मी 
परीक्षेत तर पास होणार नाही. अभ्यास करावाच लागेल.’ तिची विनोदबुद्धी यातून दिसून आली; पण तिचे आतार्पयतचे यश एवढे मोठे नव्हते, 
की ती नोबेलची हक्कदार बनावी. हा पुरस्कार मुस्लिम जगाच्या कूपमंडुक वृत्तीवर एक गंभीर ताशेरा आहे.  
या धावपळीत कुणाला इवान शिर्मला यांची आठवण  आली नाही, याचे वाईट वाटते. राज्याच्या   दहशतवादाच्या  विरोधात त्या गेल्या 14 वर्षापासून उपोषणावर बसल्या आहेत. त्यांना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? राजकीय दहशतवादाच्या विरोधातला सर्वात मोठा लढा त्या लढत आहेत. 
 
राजकिशोर 
 ज्येष्ठ विचारवंत 

 

Web Title: Nobel pratibhabe walking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.