....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:49 AM2023-02-17T10:49:18+5:302023-02-17T10:49:54+5:30

काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो रेप्टाइल) शत्रुप्रदेशात सोडले होते. आता त्यांनी संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत.

....now snakes and butterflies will fight modern wars! | ....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

googlenewsNext

दीपक शिकारपूर

अमेरिकेने चीनचा बलून (फुगा) हेरून नष्ट केला व सापांसारखाच दिसतो. त्याचे डोके म्हणजे कॅमेरा असतो. जगापुढे युद्धाचे नवे स्वरूप उघड केले. बदलत्या तो लष्करी किंवा इतर महत्त्वाच्या स्थानांभोवती फिरून काळानुसार तंत्रेही बदलली असल्याने 'शस्त्र हे तेथील फोटो लगेच प्रक्षेपित करतो आणि गवतातून वा शस्त्रासारखेच दिसले पाहिजे' असा पारंपरिक आग्रह धरण्याचे दिवसही संपले आहेत. स्वतःच्या शरीरात संवेदक (सेन्सर्स) असलेला, इजा झाल्यास स्वतःच एखादी छोटी शस्त्रक्रिया करू शकणारा, 'जीपीएस'मार्फत शत्रूच्या हालचाली व इतर माहिती मिळवणारा आजचा 'कमांडो' सैनिकाबाबतच्या पारंपरिक संकल्पनेपेक्षा खूपच वेगळा आहे. आणि हे वेगळेपण वाढतच जाणार आहे! हेरगिरीसाठी वापरली जाणारी तंत्रे तर अद्भूत आहेत. 

अंगठ्याच्या नखावर मावणारे डासासारखेच दिसणारे उडते यंत्र आज शत्रू प्रदेशात सोडले जाते. त्यामधील संगणकाची क्षमता अफाट असते! हवेत अंदाज आहे. कारण हमासने पकडलेल्या फुलपाखरात उडणारे असे शेकडो कीटक आसपासच्या वीसएक बेपत्ता तसेच युद्धकैदी (POW) इस्त्रायली सैनिकांची किलोमीटर क्षेत्राची खडानखडा माहिती ह्या कमांडोला क्षणार्धात कळवू शकतात. काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो-रेप्टाइल) तयार करून शत्रुप्रदेशात सोडले होते. असा साप अगदी खऱ्या कुंपणाच्या कडेकडेने सरपटत परत येतो. आता इस्त्रायलने इलेक्ट्रॉनिक दूरनियंत्रित संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत. पॅलेस्टाइनमधील हमास दीपक शिकारपूर चळवळीच्या कार्यकत्यांनी गाझा कार्यक्षमता वाढली आहे. किनारपट्टीवर भिरभिरणारी अशी फुलपाखरे पकडल्याचा दावा केला आहे. आकाराने छोट्या पक्ष्यापेक्षाही लहान असल्याने फुलपाखरू चक्क खोलीच्या खिडकीतून आत जाऊन टेहळणी करून यामध्ये जीपीएस वगैरे इतर यंत्रणा बसवलेली असतेच; शिवाय यामध्ये चेहरा ओळखणारे (फेस रेकग्निशन) सॉफ्टवेअरही असावे, असा छायाचित्रे आढळली!

पेन, बूट, पैशाचे पाकीट यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये सूक्ष्म प्रक्षेपक (मायक्रो ट्रान्समीटर्स) आणि राहत्या घरात कॅमेरे बसवून विशिष्ट व्यक्तीच्या संपूर्ण व्यवहारांवर गुप्तहेर यंत्रणा लक्ष ठेवू शकते. बहुतेकांना सीआयए आणि एफबीआय ही नावे माहीत असतात. परंतु एनएसए सारख्या इतरही यंत्रणा अमेरिकेत कार्यरत आहेत, प्रत्येकच देशात असतात. तब्बल २५ वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसारदेखील अशा यंत्रणांकडील महासंगणक विविध ठिकाणी प्रत्येकी शेकडो एकर क्षेत्रावर पसरलेले होते. आज सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी) आणि इंटरनेटसारख्या बिनतारी संदेशवहनाचा वाढता वेग यामुळे अनेक उपकरणांचे आकार घटले आहेत व इस्त्रायली संगणकीकृत दूरनियंत्रित टेहळणी फुलपाखरु. अशा परिस्थितीत आज सायबर हल्ल्यांचे हे क्षेत्र किती आणि कसे विस्तारले असेल याची कल्पनाही करता येत नाही. देशाच्या सुरक्षिततेबाबतची तसेच त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय भूमिकांसंबंधीची संवेदनशील माहिती मिळवून तिचा अनधिकृत वापर किंवा विक्री करणे अथवा तिच्या मोबदल्यात अन्य व्यवहार साधणे याला सर्वसाधारणपणे सायबर हेरगिरी असे म्हणता येईल. अशी माहिती व्यक्तिगत तसेच संस्था वा विभागीय इमेल्समधून तर उचलली जातेच शिवाय संबंधितांचे व्यावसायिक किंवा राजकीय स्पर्धक, त्यांच्या वाईटावर असलेल्या व्यक्ती इत्यादींचाही वापर हुशारीने करून घेता येतो. यासाठी सायबर घुसखोरांतर्फे म्हणजेच हॅकर्सद्वारेच संगणक व संगणकाधारित प्रणालींवर डल्ला मारला जातो. यामागे लष्करी, राजकीय, आर्थिक, सामाजिक असे आणि इतरही इतरांना शक्य होते. काही विशिष्ट हेतू असू शकतात.

अशाप्रकारे हाती लागलेली गुप्त माहिती अनधिकृतपणे वापरली तर जातेच; परंतु यापेक्षाही अधिक धोकादायक बाब म्हणजे त्यात (हॅकर्स आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांच्या सोयीने) थोडेफार बदल करून ती साइटवर तशीच ठेवली जाते. यामुळे बरेचदा माहितीचा मूळ स्रोत हाताळणाऱ्यांना आणि ती वाचणाऱ्यांनाही आपण काही वेगळे वाचतोय, अशी शंकाच (निदान काही काळापर्यंत) येत नाही व अशा चुकीच्या माहितीच्या आधारे काही निर्णय घेतले जाऊ शकतात वा कारवाई केली जाते. हे शत्रुराष्ट्राच्या पथ्यावरच पडते. काही वेळा यामुळे मूळ राष्ट्र जरा गाफील राहून त्यावर थेट हल्लाही करणे इतरांना शक्य होते.

Web Title: ....now snakes and butterflies will fight modern wars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.