पुन्हा एकदा बोंडअळीचा घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:22 AM2018-08-20T06:22:42+5:302018-08-20T06:24:09+5:30

बीटी तंत्रज्ञानाचा योग्यरीत्या वापर न केल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबविणे अशक्य आहे.

Once again pour the bottleneck! | पुन्हा एकदा बोंडअळीचा घाला!

पुन्हा एकदा बोंडअळीचा घाला!

Next

गतवर्षी कपाशीवरील कीटकनाशक फवारणीने विदर्भात अनेक शेतकरी व शेतमजुरांचे बळी घेतले. त्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. तरीदेखील यावर्षीही अकोला जिल्ह्यात फवारणीने एका शेतकºयाचा बळी घेतलाच! फवारणीमुळे कीटकनाशकाची बाधा झालेले अनेक शेतकरी-शेतमजूर अकोला व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.
भारतात कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र केवळ पाच टक्के आहे; पण कीटकनाशकांचा तब्बल ५५ टक्के वापर केवळ कपाशीसाठी होतो. देशात कपाशीच्या संकरित बियाण्यांची लागवड सुरू झाल्यापासून कीटकनाशकांचा वापर वाढत गेला आणि बीटी कपाशीच्या आगमनानंतर तर कीटकनाशकांच्या वापराने कळस गाठला! प्रमुख कपाशी उत्पादक देशांपैकी केवळ भारतातच कपाशीच्या संकरित वाणांचा पेरा होतो. इतर देशांमध्ये प्रामुख्याने सरळ वाणांचा पेरा होतो. कपाशीचे देशी सरळ वाण अनेक प्रकारच्या रोगराईचा, तसेच हवामानातील बदलांचा सामना करण्यास सक्षम होते; पण त्यांच्यापासून मिळणारा धागा कमी लांबीचा होता. कापड उद्योगाची मागणी लांब धाग्याच्या कापसाची असल्याने देशात कपाशीच्या संकरित वाणांचे आगमन झाले आणि कापूस उत्पादक शेतकरी महागडे बियाणे व कीटकनाशकांच्या दुष्टचक्रात फसत गेला. शेतकºयाला कीटकनाशकांच्या पाशातून बाहेर काढण्याच्या नावाखाली पुढे बीटी कपाशीचे आगमन झाले. प्रारंभीची एक-दोन वर्षे कीटकनाशकांचा वापर कमी झालादेखील; मात्र पुढे बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची बेसुमार फवारणी करण्याची पाळी शेतकºयांवर आली. कीटकनाशकांची फवारणीच आज शेतकºयाच्या जीवावर उठली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या १४ देशांमध्ये बीटी कपाशीचा पेरा होतो, त्यापैकी केवळ भारतातच बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे आज बीटी कपाशीच्या नावाने बोटे मोडण्यात येत असली तरी, प्रारंभीची काही वर्षे बीटी कपाशीने शेतकºयांचे चांगभले केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कोणतेही तंत्रज्ञान वापरण्याची एक पद्धत असते. ती मोडित काढल्यास त्या तंत्रज्ञानाचे लाभ मिळत नाहीत. कुणी उघड्या मैदानात वातानुकूलन यंत्र बसवतो म्हटले तर मैदानातील हवा थंड होईल का? बीटी कपाशी तंत्रज्ञानाचेही तसेच आहे. ‘रेफ्युज एरिया’मध्ये गैर बीटी कपाशीची लागवड आणि १८० दिवसांपेक्षा जास्त काळ पीक शेतात उभे न ठेवणे, या बीटी तंत्रज्ञान वापरातील महत्त्वपूर्ण शिफारशींना भारतात हरताळ फासण्यात आला आणि त्यामुळे बोंडअळीत बीटी जीन प्रतिरोधक क्षमता निर्माण झाली, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी गतवर्षीपासून पावले उचलण्यास प्रारंभ केला; परंतु या उपाययोजनांचे परिणाम तत्काळ दिसणे अशक्य आहे. अत्यंत कठोरपणे व सातत्य राखून उपाययोजना राबविल्या तरच आगामी काही वर्षांमध्ये चांगले परिणाम दिसू शकतील.
- रवी टाले

 

Web Title: Once again pour the bottleneck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस