पॅडमॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:59 AM2017-10-11T00:59:49+5:302017-10-11T01:00:23+5:30
‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ म्हणून जगानं गौरवलेल्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या अचाट धाडसाची कोरडी, स्वच्छ आणि स्वावलंबी कहाणी
‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ म्हणून जगानं गौरवलेल्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या अचाट धाडसाची कोरडी, स्वच्छ आणि स्वावलंबी कहाणी
अरुणाचलम मुरुगनाथन - सॅनिटरी पॅड वापरणारा जगातला पहिला पुरुष : तामिळनाडूतल्या एका सामान्य वेल्डरच्या हातून उभ्या राहिलेल्या एका जागतिक चळवळीची थक्क करणारी गोष्ट... प्रत्यक्ष मुरुगनाथन यांच्याबरोबर राहून शोधून आणलेली!
तामिळनाडूतल्या पापनायकन पुदूर गावातला एक साधा वेल्डर माणूस. लग्न झालं. संसार सुरू झाल्यावर एके दिवशी बायकोशी नोकझोक काढली. मासिक पाळीच्या दिवसात ती नीट काळजी घेत नाही, हे कारण. बायको म्हणाली, ‘वाट्टेल ते उपाय सुचवू नका. दर महिन्याला मी त्या महागड्या नॅपकिन्सची चैन केली ना, तर आपल्याला घरी पुरेसं दूध आणता येणार नाही.’ मठ्ठ वास्तवाचा दगड ढकलून कोणत्याही बदलाला पहिली चाल देणारा प्रश्न त्याच्या ‘अर्धशिक्षित’ डोक्यात वळवळायला लागला : असं का? - आणि त्यातून उभं राहिलं झपाटलेपणाचं एक वादळ.
‘शांतीला आणि तिच्यासारख्या अनेक बायांना परवडणारे स्वस्त आणि स्वच्छ नॅपकिन्स बनवायचा ध्यास’ या अबोल, संकोची वेल्डर माणसाला गावातून उचलून थेट जगाच्या नकाशावर घेऊन गेला. या झपाटलेपणाच्या आडरस्त्यावर टिंगल-टवाळी, अपमान, आरोप आणि अगदी बहिष्कारही सोसावा लागला. अगदी देशोधडीला लागण्याची वेळ आली; पण या माणसाच्या मानेवरचं भूत उतरलं नाही.
२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये
प्रसिद्धी : दिवाळीच्या पणत्या अंगणात लागण्याच्या कितीतरी आधी!
तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com
आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com
नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा : 8425814112
-शर्मिष्ठा शशांक मीना भोसले