पाकची वाटचाल अस्थिरतेकडे

By admin | Published: December 10, 2014 01:09 AM2014-12-10T01:09:27+5:302014-12-10T01:09:27+5:30

पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.

Pakistan's transition to instability | पाकची वाटचाल अस्थिरतेकडे

पाकची वाटचाल अस्थिरतेकडे

Next
पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले नवाज शरीफ सरकार कोणत्याही ब:या-वाईट मार्गाने उखडून टाकण्याचे प्रयत्न पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी चालविले आहेत.  त्यांना या कामात अदय़ाप यश आलेले नाही आणि ते मिळण्याची शक्यताही कमीच आहे. आपल्या या कामासाठी लष्कराची मदत मिळेल, असे इम्रान खान यांना  वाटते; पण आपले जे काही छुपे हेतू आहेत, ते पूर्ण करण्याची क्षमता इम्रान खान यांच्यात नाही, याची लष्कराला जाणीव आहे. शिवाय, इम्रान खान यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संदिग्ध असे आहे. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही, हेही पाकिस्तानी लष्कराला कळून चुकलेले आहे. असे असले तरी लष्कर सध्या एक प्यादे म्हणून त्यांचा वापर करीत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही.
लोकशाही मार्गाने आलेले सरकार अस्थिर करण्यात सध्या काहीच अर्थ नाही, याची लष्कराला जाणीव आहे. कारण, हे सरकार लष्कराने आखून दिलेल्या मार्गाने सत्तेवर आले आहे. अशा परिस्थितीत फक्त जिहादी शक्तींच्या पाठिंब्यावरच इम्रान खान सत्ता हस्तगत करण्याचा खेळ खेळू शकतात; पण सध्या तरी नवाज शरीफ सरकार जिहादी शक्तींच्या इच्छेनुसार वागत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना पाठिंबा देण्यात जिहादी शक्तींनाही फारसा रस वाटत नाही.
नवाज शरीफ यांचा उदय ङिाया उल् हक् यांच्या आशीर्वादाने झाला आहे. ङिाया यांनी पाकिस्तानच्या राजकारणात धर्म आणला, हे शरीफ यांना विसरता येणार नाही. अशा स्थितीत सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी काही ना काही उपद्व्याप इम्रान खान यांना करीत राहावे लागणार आहेत. त्यामुळेच त्यांनी आता 16 डिसेंबरला पाकिस्तान बंदचे आयोजन केले आहे. त्याला कितपत यश मिळते, ते आता पाहावे लागेल.
इम्रान खान यांनी 30 नोव्हेंबरला इस्लामाबादेत झालेल्या आपल्या पक्षाच्या जाहीर सभेत पुढील रणनीतीची घोषणा केली होती. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग 16 डिसेंबरच्या बंदचा होता. या दिवशी लाहोर, फैसलाबाद आणि कराचीत हरताळ पाळला जाणार आहे. 16 डिसेंबरलाच पाकिस्तानातून बांगलादेश फुटला होता. हा पाकिस्तानच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आहे. या निमित्ताने इम्रान खान पाकिस्तानच्या जुन्या जखमेवरची खपली उकरून काढत आहेत. थोडक्यात आता इम्रान खान सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण देशाची सध्याची स्थिती आणि 43 वर्षापूर्वीची पाकिस्तानच्या विभाजनाची घटना यांचा ताळमेळ ते कसा घालणार आहेत, हे समजत नाही. 
इम्रान खान एकीकडे सिस्टीम बदलण्याची भाषा करीत आहेत; पण ती कशी बदलायची, याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि दुसरीकडे आम जनतेच्या भावनेला आवाहन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची दिशाच समजत नाही. परिणामी, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक दोघेही संभ्रमित झाले आहेत.
एकंदरच सध्याचे पाकिस्तानी राजकारण दिशाहीन झाले आहे. नवाज शरीफ सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. झरदारी व भुत्ताे यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्ता गेल्यानंतर फारशी सक्रिय दिसत नाही आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व राजकारण येनकेन प्रकारे सत्ता कशी मिळेल यासाठी चाललेले आहे. त्यातच लष्कर सत्तेतले आपले वर्चस्व वाढवत आहे. ही सर्व चिन्हे पाकिस्तानला पुन्हा एकदा दीर्घ काळच्या अस्थिरतेकडे नेणारी आहेत.
 
रहीस सिंह
 ज्येष्ठ पत्रकार

 

Web Title: Pakistan's transition to instability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.