जीएसटी आयटीसी २0-२0 मॅच सावधगिरीने खेळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:29 AM2019-10-14T05:29:10+5:302019-10-14T05:30:10+5:30

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने ९ आॅक्टोबर २0१९ रोजी जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार करदात्यास जीएसटीआर-२ ए मध्ये जेवढा ...

Play GST ITC 10-20 matches carefully! | जीएसटी आयटीसी २0-२0 मॅच सावधगिरीने खेळा!

जीएसटी आयटीसी २0-२0 मॅच सावधगिरीने खेळा!

Next

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने ९ आॅक्टोबर २0१९ रोजी जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार करदात्यास जीएसटीआर-२ ए मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त २0 टक्के अधिक आयटीसी घेऊ शकतो, असा नवीन वादग्रस्त नियम आला आहे. तर हे काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जशी क्रिकेटमध्ये २0-२0 मॅच खेळली जाते तशी आता जीएसटी आयटीसी २0-२0 मॅच सुरू झाली आहे. प्राप्तकर्ता फलंदाज तर पुरवठादार गोलंदाज आहे आणि प्रत्येक महिन्याच्या रिटर्नला हा सामना खेळावा लागेल. या सामन्यात नक्कीच करदात्यांचा तोटा होणार आहे.
सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार करदाता जीएसटीआर - २ ए मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त २0 टक्के अधिक आयटीसी घेऊ शकतो. म्हणजे जेवढा आयटीसी जीएसटीआर-२ ए मध्ये दिसत आहे, त्याच्या २0 टक्के किंवा खातेपुस्तकातील आयटीसी या दोन्हीपेक्षा जे कमी आहे तेच आयटीसी क्रेडिट मिळेल. हे तर क्रिकेटच्या डकवर्थ लुईस नियमापेक्षाही अवघड आहे. या क्रिकेटमध्ये तिसरा पंच जीएसटीएन आहे आणि जीएसटीएनचा निर्णय अंतिम राहील.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-२ ए काय आहे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-२ ए हा जीएसटीएन सिस्टम जनरेटेड अहवाल असून त्यात करदात्यांची खरेदी आणि त्यावरील आयटीसी क्रेडिटची माहिती मिळते. जेव्हा पुरवठादार म्हणजे फलंदाज जीएसटीआर-१ फाइल करतो त्याची माहिती प्राप्तकर्ता म्हणजे फलंदाजाच्या जीएसटीआर-२ एमध्ये दिसते. हे आपण एका उदाहरणासह समजून घेऊ. जर ‘अ’ने रु. २,५0,000 चा पुरवठा ‘ब’ ला केला, तर ‘अ’ पुरवठादार असल्यामुळे त्याला त्याची विक्री जीएसटीआर-१ मध्ये २,५0,000 दाखवावी लागेल. एकदा जर पुरवठादाराने ‘अ’ जीएसटीआर-१ फाइल केला तर तो व्यवहार ‘ब’च्या जीएसटीआर-२ ए मध्ये दिसतो. याचा अर्थ प्रत्येक खरेदी करणाऱ्याने आपले जीएसटीआर-२ ए तपासावे, पूर्वीप्रमाणे आता आयटीसी क्रेडिट मिळण्यास त्रास होणार आहे.
अर्जुन : कृष्णा, यात पुरवठादाराची भूमिका आणि जबाबदारी काय आहे?
कृष्ण : अर्जुना, नवीन नोटिफिकेशननुसार पुरवठादाराला जीएसटीआर-१ देय तारखेच्या आत फाइल करावेच लागेल. जेणेकरून त्यानंतरच्या जीएसटीआर-३ बीमध्ये आयटीसी घेऊ शकेल. जसे वाइड बॉल टाकल्यास फलंदाजाला खेळावयास त्रास होतो तसेच आता खरेदीदारास विक्री करणाºयाने जीएसटीआर-१ फाइल न केल्यास होणार आहे.
अर्जुन : कृष्णा, प्राप्तकर्त्याच्या भूमिका आणि जबाबदारीत नव्या परिस्थितीत काय बदल आहे?
कृष्ण : अर्जुना, प्राप्तकर्त्यास जीएसटीआर-२ ए आणि खरेदी पुस्तकाचे नियमन करावे लागेल.
- प्राप्तकर्त्यास पुरवठादाराकडे नियमित पाठपुरावा करावा लागेल. जेणेकरून पुरवठादार त्याचा जीएसटीआर-१ देय तारखेच्या आत दाखल करेल आणि प्रत्येक इनव्हाइस अपलोड होईल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, आता करदात्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. करदात्यास कधी व कसे आयटीसी काढावे हा मोठा प्रश्न पडणार आहे. जसे इनव्हाइस, पुरवठादार आणि रिटर्ननुसार. मिसमॅचचे क्रेडिट कसे पुढे मिळेल व त्यावरील व्याज इत्यादी ज्वलंत व किचकट प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. अशा अनेक जाचक नियमांमुळे जीएसटी सोपे होण्यापेक्षा खूपच अवघड झाले आहे.

- उमेश शर्मा । सीए

Web Title: Play GST ITC 10-20 matches carefully!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.