भगवे त्रिपुरा पुन्हा लाल झाले... पण पानाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:51 AM2018-05-02T10:51:46+5:302018-05-02T10:51:46+5:30

Political satire on Tripura CM Biplab dev | भगवे त्रिपुरा पुन्हा लाल झाले... पण पानाने

भगवे त्रिपुरा पुन्हा लाल झाले... पण पानाने

Next

- योगेश बिडवई

( सुनील देवधर या अस्सल मराठी माणसामुळे भाजपाने त्रिपुरा पादाक्रांत केल्यानंतर आगरतळा येथे पक्ष कार्यालयात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे)
मुख्यमंत्री बिप्लव देव (तोंडात बनारसी पानाचा विडा) : मैं आपकों कहता हूँ सुनीलजी, नौजवानोंको रोजगार देने में हम कोई कसर नहीं छोडेंगे... (पानाची पिंक उडू नये म्हणून देवधर जरा लांब सरकतात)
सुनील देवधर (बिप्लव देव यांच्या तोंडात पान कसे, यावर विचार करत) : हाँ, रोजगार हमारी प्राथमिकता होंनी चाहिए. युवाओंको हमसे बहुत सारी उम्मीदे है. उन्हे हम निराश नहीं कर सकते.
बिप्लव देव : मगर युवाओंने सरकारी नौकरी के लिए हमारे पिछे नहीं लगना चाहिए. सरकारी नौकरीके चक्कर में युवाओंके महत्त्वपूर्ण साल बरबाद हो जाते है. उसकी बजाय उन्होनें मुद्रा योजना से लोन लेकर कोई व्यवसाय शुरू करना चाहिए. मैं तो कहता हूँँ, पान की टपरी भी शुरू करेंगे तो पाच साल में पाच लाख रुपये उनके बँक अकाऊंट मे जमा होंगे.
(एव्हाना बिप्लव देव यांच्या तांबूलरसाची नक्षी देवधर यांच्या कपड्यांवर तयार झाली. आता सुनील देवधरांच्या लक्षात येतं. बिप्लव देव पान का खात आहेत. त्रिपुरात पान खाण्याची संस्कृती आणण्याचा त्यांचा विचार दिसतोय)
बिप्लव देव : यही नहीं पदवीधर युवक अगर गोपालन करते है तो, १० साल में उनके अकाऊंट में १० लाख रुपये जमा होते. (तेवढ्यात सर्वांना एक ग्लास दूध येते. याआधी बैठकीत कधी दूध दिले गेले नव्हते.) मैं तो कहता हूँ मुर्गी पालन भी अच्छा व्यवसाय है. खेती में भी अच्छी उपज मिलती है. क्या जरुरत है नौकरी की. पान टपरी के व्यवसाय कों राज्य सरकार अनुदान भी दें सकती है. कुछ सुझाव हों तो बताईंयें.
एक मंत्री : हर गाँव में कमसें कम पाच पान टपरीओंको सरकारने लाइन्सेस देना चाहिए. पान खानेंवालो को कुछ सहुलिअत भी देनी चाहिए. सरकारी योजनाओं में उन्हे अग्रक्रम मिले.
दुसरे मंत्री : बनारस की जगह त्रिपुरा पान ब्रॅण्ड हमें विकसित करनी चाहिए. पान की हम निर्यात भी कर सकते है.
तिसरे मंत्री : उद्योग मंत्रालय ने पान टपरी योजना लानी चाहिए. इज आॅफ डुर्इंग बिजनेस में इस योजना को प्राथमिकता देनी चाहिए.
महिला मंत्री : ५० प्रतिशत पान टपरी महिलाओंको देनी चाहिए. महिलाभी तो आत्मनिर्भर होनी चाहिये.
सुनील देवधर : (काहीशा त्रासिक स्वरात) मगर पान खाके लोग इधर उधर थुंकेंगे तो ‘स्वच्छ भारत’ मिशन का, क्या होगा?
चौथे मंत्री : हम हर सरकारी कार्यालय में कुडेंदान रखेंगे. पान टपरी उद्योग से जो राजस्व मिलेगा उसमेंसे कुछ स्वच्छता पर खर्च करेंगे.
बिप्लव देव : सुनीलजी अब आप ना मत कहिए. यह देश की पहली योजना होंगी. हमारी योजना दुसरे राज्य भी अ‍ॅडॉप्ट कर सकते है. मैं तो कहता हूँ आप कुछ अच्छे सुझाव दे. पुणे, मुंबई पान भी हम शुरू कर सकते है.
(काय बोलावे, हे आता सुनील देवधर यांना सुचेना. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणखी गडद झाले. पानटपरी हे सुद्धा रोजगाराचे साधन असल्याने त्यास विरोध तरी कसा करायचा, असे त्यांचे मन सांगत असावे.)
सर्व मंत्री या योजनेवर प्रत्येकाने काहीतरी प्रस्ताव तयार करून आणण्याच्या एकमतावर बैठक संपवितात. पुढच्या बैठकीत योजनेला मूर्त रुप देण्याचे ठरते.

Web Title: Political satire on Tripura CM Biplab dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.