लोकसंस्कृती परिवर्तनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:23 AM2018-05-13T05:23:39+5:302018-05-13T05:23:39+5:30

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या मानव्य शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या अभ्यासशाख्ोला सैद्धांतिक बैठक प्राप्त करून देणारे आाणि या अभ्यासशाखेच्या अभ्यासकांची एक चळवळच महाराष्ट्रात सुरू करणारे

Population change | लोकसंस्कृती परिवर्तनशील

लोकसंस्कृती परिवर्तनशील

Next

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या मानव्य शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या अभ्यासशाख्ोला सैद्धांतिक बैठक प्राप्त करून देणारे आाणि या अभ्यासशाखेच्या अभ्यासकांची एक चळवळच महाराष्ट्रात सुरू करणारे लोकसाहित्य परिषद आणि लोकसाहित्य संशोधन मंडळ यांचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर मांडे यांची निवड ११, १२, १३ मे रोजी कराड येथे होत असलेल्या अखिल भारतीय लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी झाली आहे. त्यांचे लोेकसंस्कृती आणि लोककला या संदर्भातील विचार...

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ब्रिटिश आमदानीत त्यांच्या विखंडनकारी धोरणामुळे निरनिराळ्या भाषिक प्रांतांत जो दुरावा निर्माण झाला तो दूर होऊन, सर्व भाषिक प्रांत एकात्म स्वरूपात स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवतील, असे वाटले होते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात काही प्रयत्नही सुरू झाले, परंतु राजकारणामुळे आणि राजकीय आकांक्षा प्रबळ झाल्यामुळे म्हणजेच राजकीय स्वार्थाने प्रेरित काही राजकीय पुढाºयांच्या चुकीच्या धोरणामुळे निरनिराळ्या प्रांतांतील भाषक समाजात केवळ दुरावा नाही, तर कटुता निर्माण झाली. प्रादेशिक पक्ष प्रबळ झाले. भाषावार प्रांतरचनेमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सरहद्दीसंबंधीच्या वादांमुळे म्हणजेच सीमावादामुळे महाराष्ट्र कर्नाटकात तंटा निर्माण झाला. असेच कमी-अधिक प्रमाणात सर्व प्रांतांच्या संदर्भात घडले. प्रांतांतील लोककलाप्रकारांचे आदानप्रदान घडून सर्वत्र एकच एक समष्टिचेतना किंवा लोकचेतना कशी प्रकट होते, याचा अनुभव समाजाला घडविणे हा आहे. सुदैवाने या दृष्टीने सर्व प्रांतांत प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व कलाविष्कारांतून भारतीयत्वाचे दर्शन कसे घडते, हे देशातील जनमानसाला स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र, असे प्रयत्न होत असताना, प्रदेशातील कलाप्रकाराला प्रदर्शनीय वस्तूचे स्वरूप प्राप्त होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. कारण लोककलाविष्काराला (लोककलेला) प्रदर्शनीय वस्तू करणे म्हणजे तिचा प्रवाह कुंठित करून त्याला थिजविणे, स्थिर करणे, संपविणे असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
लोकपरंपरेने चालत आलेल्या कलाविष्कारांत, त्यांतही विशेषत्वाने प्रेक्षाभान असलेल्या लोककलांत काळानुरूप बदल होत जाणार हेही समजून घेतले पाहिजे. समाजात घडणाºया परिवर्तनानुसार या कलांतही बदल होणे अनिवार्य आहे. समाज आधुनिक होत आहे, तेव्हा परंपरेतही बदल होणारच. पारंपरिक लोककलाही आधुनिक होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, येथे आधुनिकता ही संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे. आधुनिकीकरण म्हणजे स्वत्वहीन होऊन पश्चिमीकरण करणे नाही, हे समजून घेतले पाहिजे.
आधुनिकता हा शब्द गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिमीकरणाच्या अंधानुकरणासाठी वापरला जातो. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आणि हिंदुस्थानात त्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर, १९ व्या शतकात येथील समाजाला पश्चिमेतील संस्कृतीचा परिचय झाला. त्याचा परिणाम म्हणून परंपरेने चालत आलेल्या अनेकविध बाबींना आपण सोडले. लोकभ्रमाचा त्याग करण्यापर्यंत सगळे ठीक झाले, परंतु त्याबरोबरच परंपरेने चालत आलेल्या अनेक चांगल्या बाबींचाही येथील समाजाने त्याग केला. पश्चिमीकरणाच्या अंधानुकरणात येथील विशेषकरून शिक्षित समाज फसत गेला आणि पश्चिमीकरण म्हणजेच आधुनिकता, असे समीकरण तयार झाले. पश्चिमीकरणाच्या अंधानुकरणामुळे अनेक अमानवी आणि जीवनविरोधी तत्त्वे आपल्या समाज जीवनात आली आणि अनेक क्षेत्रांच्या संदर्भात मोहभंगाची स्थिती निर्माण झाली.
विज्ञानाचा वाढता दबाव आणि अनेकानेक नवीन शोध, यामुळे आपल्या जीवनात काही चांगले बदल झाले, ते नाकाराता येत नाही, परंतु त्याबरोबरच आपली ओळख नष्ट होत असल्याची जाणीवदेखील होत असल्याचे दिसते. यासर्व बाबींचा परिणाम असा झाला की, आपल्या पारंपरिक जीवनसारणीला आणि शाश्वत जीवनमूल्याला त्यामुळे बाधा पोहोचत आहे आणि येथील समाज अंतर्मुख होउन आधुनिकतेचा अर्थ काय, याचा शोध घेत आहे. आधुनिकता म्हणजे पश्चिमीकरण नव्हे. आधुनिकता ही निरंतर विकासाची एक जिवंत प्रक्रि या आहे. आपला बोध, आपल्या जाणिवा आणि त्यातून सिद्ध झालेला आपला व्यवहार या माध्यमांतून अभिव्यक्त होणारी एक जीवनप्रणाली आहे. ही जीवनप्रणाली अनेक वेळा परंपरेच्या विरुद्ध होते, तरीही परंपरेतूनच विकसित झालेली आणि पुन्हा त्याच परंपरेचा घटक बनत असलेली दिसते. कोणत्याही समाजाचे लोक संबंधित समकालीन जीवनशैलीच्या संदर्भात स्वत:चे परंपरेने चालत आलेले जीवन आणि त्याची मिळालेली स्वतंत्र ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्या संदर्भातच आधुनिकतेचे लाक्षणिक स्वरूप त्यातून स्पष्ट होत असते. आपल्या पारंपरिक आणि अक्षय आणि विकासमान जीवनासंदर्भाची ही एक अत्यंत महत्त्वाची आणि शक्तिशाली संकल्पना आहे. आधुनिकतेमुळे आपल्या जीवनात आणि जीवनसरणीच्या आधारभूत तत्त्वांत व्यापक परिवर्तन होते आणि त्याचा परिणाम बाह्य आचरणावरही दिसून येतो.

Web Title: Population change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.