अडचणींची पॉवर.. ..पवारांची अडचण

By सचिन जवळकोटे | Published: December 27, 2017 11:10 PM2017-12-27T23:10:38+5:302017-12-29T15:41:20+5:30

‘पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार असून, कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागावे,’ असा सल्ला थोरले काका बारामतीकर यांनी दिला;

Power of Problems .. .. | अडचणींची पॉवर.. ..पवारांची अडचण

अडचणींची पॉवर.. ..पवारांची अडचण

googlenewsNext

‘पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार असून, कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागावे,’ असा सल्ला थोरले काका बारामतीकर यांनी दिला; मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच्या ‘तोडमोड के जोड’ स्टाईलनं ‘पुढच्या वर्षी अडचणी वाढणार. आजच तयारीला लागा,’ एवढाच कळीचा फॉरवर्डेड मेसेज काकांच्या नावे फिरू लागला. हे वाचून कारागृहातील दाढीधारी नेत्यानं घाबरून आपला मफलर अधिकच घट्ट गुंडाळला. ‘तयारीला लागावं म्हणजे दाढी अजून वाढवावी की दोन-चार साहिंत्यिक पत्रं अधिक लिहावीत’ या विचारानं ‘भुज’मधील ‘बळ’ कासावीस होत गेलं.
तिकडं ‘कणकवली’करांनाही घाम फुटला. कारण, ‘कोणत्याही परिस्थितीत आपण २०१७ मध्येच शपथ घेणार’ ही त्यांची स्वयंभूत भविष्यवाणी खोटी ठरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले होते. थोरल्या काकांचा शब्द खरा ठरला तर २०१८ मध्येही आपण कोकण किनाºयावर माशा मारत (की मासेमारी करत?) बसणार, या टेन्शनमध्ये त्यांनी देवेंद्रपंतांना कॉल केला; परंतु फोन सतत एंगेज होता. वंचित पुनर्वसितांपेक्षा बलाढ्य प्रस्थापितांकडून काय-काय अडचणी वाढतील, याचा शोध म्हणे पंत घेत होते. कारण, प्रस्थापितांच्या यादीतील एकनाथभाऊ जळगावकर, चंद्रकांतदादा कोल्हापूरकर अन् सुभाषबापू सोलापूरकर यांच्यापेक्षा त्यांना नितीनराव नागपूरकरांची चिंता अधिक होती. ‘मातोश्री’वर मात्र उद्धोंसह लाडके युवराज कानात कापसाचे बोळे घालून गाढ झोपल्याने त्यांनी हा मेसेज वाचलाच नाही. महाबळेश्वरहून परतल्यापासून म्हणे ते दोघे आपापले कान सेफ ठेवूनच फिरत होते.
बारामतीतही थोरल्या काकांजवळ त्यांच्या लाडक्या युवराज्ञी आल्या, ‘बाबाऽऽ बाबाऽऽ मी कोणत्या तयारीला लागू’ असा लाडीक सवाल त्यांनी करताच काका बीडकडे बघत उत्तरले, ‘बेटा.. भविष्यात तुझ्यासमोर कोणत्या अडचणी राहतील, याचा विचार करून आतापासूनच तयारीला लागलोय. सध्याच्या ‘धनू अन् अजू’ युतीला शह देण्यासाठी लवकरच कोरेगावच्या ‘शशी’ला अध्यक्षपद देऊन टाकतोय ’
- सचिन जवळकोटे

Web Title: Power of Problems .. ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.