माल डागी असल्याने लासलगावात मुगाच्या दरात चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:35 AM2018-09-14T05:35:53+5:302018-09-14T05:37:19+5:30

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव समितीमध्ये सध्या जुन्या मालाची आवक कमी झाली असून, नवीन मुगाची आवक सुरू आहे.

price of moong is fluctuating in lasalgaon market | माल डागी असल्याने लासलगावात मुगाच्या दरात चढ-उतार

माल डागी असल्याने लासलगावात मुगाच्या दरात चढ-उतार

Next

- संजय दुनबळे, नाशिक />
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव समितीमध्ये सध्या जुन्या मालाची आवक कमी झाली असून, नवीन मुगाची आवक सुरू आहे. मुगाला ५००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. बाजारात येणाऱ्या बहुतांश मुगाची प्रत फारशी चांगली नसल्याने भावामध्ये चढ उतार होत आहेत. सुमारे ७५ टक्के माल डागी असून, केवळ १० ते २० टक्के माल चांगला असतो, असे अडत व्यापाºयांनी सांगितले. सध्या गव्हाची आवक कमी असून, गव्हाला १९०० ते २२०० रुपये सरासरी २०४० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील सप्ताहात २३७ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावर्षी पाण्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. यामुळे रबीत गव्हाचा पेरा कमी होण्याची चिन्हे आहेत.
लासलगाव बाजारात सोयाबीनची आवक कमी असून, भाव काहीसे वाढले. मागील सप्ताहात सोयाबीनला ३३०० ते ३४२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. सोयाबीनची नवी आवक पुढील महिन्यात येण्याची अपेक्षा असली तरी त्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीच्या पावसावर शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली; मात्र नंतर पावसाने दीड ते दोन महिने उसंत घेतल्याने त्याचा फटका बसला आहे. यामुळे सोयाबीनच्या भावात फारसा फरक पडेल, असे व्यापाºयांना वाटत नाही. लोकल बाजरीला लासलगाव बाजारात १२०० ते १६६१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असून, आवक खूपच कमी झाली आहे. साधारणत: दसºयाच्या आसपास नवीन बाजरीचे पीक बाजारात येण्याची अपेक्षा असून, सध्यातरी बाजरीचे भाव स्थिर आहेत.
जिल्ह्यात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मक्याला १३८० ते १५०० आणि सरासरी १४६१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. स्थानिक मक्याची आवक कमी असली तरी लासलगाव बाजारात सध्या बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून मक्याची आवक होत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांकडून हा मका खरेदी केला जात असून १४५० ते १५५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. कळवण बाजार समितीत मागील १५ ते २० दिवसांपासून मक्याचे बाजार बंद आहेत.
यावर्षी मक्याला पावसाचा फटका बसला आहे. वेळेत पाऊस न झाल्याने पिकाची वाढ झाली नाही. कोरडवाहू शेतकºयांचे तर हातचे पीक गेले आहे. ज्यांनी विहिरीतील पाण्यावर मका जगविला त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. यामुळे यावर्षी मक्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करुन नवीन मक्याची आवक आणि त्याची प्रत यावरच भाव ठरतील, असे व्यापाºयांनी सांगितले. लोकल ज्वारीची केवळ एक क्विंटल आवक झाली. ज्वारीला लासलगाव बाजारात १५०१ ते १९२६ रुपये क्विंटलचा भाव आहे. विशाल हरभºयाची २२ क्विंटल, तर लोकल हरभºयाची ७२ क्विंटल आवक झाली. हरभºयाचे भाव चांगले असून, स्थिर आहेत. उडीद आवक फारशी नाही.

Web Title: price of moong is fluctuating in lasalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.