रामलीला-मोदींची आणि रा.स्व. संघाची

By admin | Published: October 1, 2014 01:39 AM2014-10-01T01:39:17+5:302014-10-01T01:39:17+5:30

आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला ते कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे.

Ramlila-Modi and RSS The team's | रामलीला-मोदींची आणि रा.स्व. संघाची

रामलीला-मोदींची आणि रा.स्व. संघाची

Next
>आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला ते कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे.
 
त्या विजयदशमीच्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकाशवाणीवरून राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. हा सण हिंदू समाज सत्प्रवृत्तींचा दुष्प्रवृत्तींवर विजय या स्वरूपात साजरा करीत असतो. गेल्या 9क् वर्षापासून दसरा हा दिवस राजकीय दिनदर्शिकेत महत्त्वाचे स्थान मिळवून बसला आहे. कारण याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे नागपूर या संघाच्या मुख्यालयातून दस:याचे भाषण देत आले आहेत. रा.स्व. संघाशी जुळलेले लोकच हे भाषण पूर्वी ऐकत असत. पण विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीची चळवळ 198क् नंतर सुरू केल्यापासून सांस्कृतिक राष्ट्रीयता ही मुख्य प्रवाहाचा भाग बनली त्यामुळे सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण मीडियाचे आकर्षण केंद्र ठरू लागले. या भाषणातूनच भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची दिशाही ठरू लागली. रा.स्व. संघाच्या परिवाराच्या कार्यक्रमाचे स्वरूप याच भाषणाच्या आधारे ठरू लागले.
रा.स्व. संघाच्या सरसंघचालकांचे भाषण विजयादशमीला होण्यापूर्वी आपले राष्ट्राला उद्देशून असलेले भाषण रेडिओतून प्रसारित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना आहे. त्यामुळे हे भाषण सरसंघचालकांच्या भाषणाचे महत्त्व कमी करील असे वाटते. मोदींचे दस:याचे भाषण हे राजकीय उद्दिष्टाने प्रेरित राहणार असल्याने ते लोकांच्या अधिक आकर्षणाचे केंद्र बनेल असे वाटते. त्यामुळे मीडियाकडून आणि लोकांकडूनही पंतप्रधानांच्या आणि सरसंघचालकांच्या भाषणाची तुलना केली जाईल का? कुणाला टी.आर.पी. जास्त मिळेल, 
या कार्यक्रमातून रा.स्व. संघापेक्षा मोदी मोठे होतील का?
अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असताना त्यांचे अस्तित्व हे रा.स्व. संघासाठी कधीच आव्हानात्मक ठरले नाही. त्यांनी कधीही रा.स्व. संघाच्या नेतृत्वाची जागा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट संघाने अनेकदा सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढल्याने रा.स्व. संघाच्या महत्त्वाला कधी बाधा पोचली नाही. रा.स्व. संघाने भाजपाची राजकीय ओळख स्वतंत्र ठेवण्याचाच प्रय} केला. पण मोदी मात्र संघाला अशी संधी देताना दिसत नाहीत. 
नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान बनण्याची आपली आकांक्षा 2क्11 मध्ये पहिल्यांदा प्रकट केली. तेव्हापासून ते आणि सरसंघचालक यांची एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या आणि संघाच्या संबंधात कटुता निर्माण झाली होती. गुजरात रा.स्व. संघाच्या प्रांतप्रचारकांपेक्षा मोदी श्रेष्ठ आहेत का, असा वाद तेव्हा निर्माण झाला होता. तेव्हापासूनच राजनाथसिंह, सुषमा स्वराज किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींना मान्यता मिळेल का याचा विचार सुरू झाला होता. अखेर संघाने मोदींची निवड केली, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला विजय मिळू शकेल असे परिवाराला वाटू लागले होते. संघाच्या कार्यक्रमापाससून मोदी हे विचलित होणार नाहीत असा परिवाराला त्यांच्याविषयी विश्वास वाटत होता. सरकारात असल्याने काही गोष्टी मान्य कराव्या लागतील अशी परिवाराने स्वत:ची समजूत करून घेतली होती आणि संघ स्वयंसेवकांचीही तशी समजूत करून देण्यात आली होती. मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाची रा.स्व. संघाच्या नेत्यांना पूर्ण कल्पना होती. मोदींना पर्यायी सत्ताकेंद्र नको असते हे परिवाराला ठाऊक होते. पण आपला अजेंडा राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी संघाने मोदींना पत्करले.
रा.स्व. संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यात एक मूलभूत फरक आहे. मोदींच्या सगळ्या हालचाली त्यांचा स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी सुरू असतात. तर संघाकडून संघाच्या विचारांचा प्रभाव राष्ट्रीय पातळीवर वाढविण्याचे प्रयत्न सुरू असतात. संस्थाचालक निर्माण करणो हे मोदींच्या स्वभावात नाही. आपल्यानंतर कारभार हाती घेण्यासाठी त्यांनी गुजरातमधील नेत्यांना तयार केले नाही. त्यामुळे गुजरातमधून मोदी निघून जाताच राज्यात झालेल्या नऊ पोटनिवडणुकांपैकी तीन निवडणुकात भाजपाला पराभव पाहावा लागला. मोदींचा प्रभाव देशात वाढला, पण राज्यात मात्र तो घटला हेच यावरून दिसून येते. त्यामुळे राज्यातील भाजपामध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
हे सर्व पाहता दस:याच्या भाषणातून मोदी हे रा.स्व. संघाचा प्रभाव निश्चितपणो कमी करतील असे दिसते. आगामी वर्षात हाच प्रकार सुरू राहील अशी चिन्हे दिसत आहेत. मोदी नावाच्या वादळाचा मुकाबला करण्यासाठी रा.स्व. संघाकडून कोणते डावपेच आखण्यात येतात हेच आता पाहायचे. आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ 
सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे. पंतप्रधानांनी धार्मिक सणाचा वापर 
राष्ट्राला उद्देशून भाषण करण्यासाठी करावा का या विषयावर राष्ट्रीय चर्चा सुरू होऊ शकते. रा.स्व. संघाला हे स्वातंत्र्य जसे होते, तसेच मुस्लीम सणांच्या 
बाबतीत शाही इमामांनाही असे स्वातंत्र्य असते पण पंतप्रधानांनीे विजयादशमीला राष्ट्राला उद्देशून भाषण देणो कितपत योग्य आहे? मोदींनी आपल्या आकाशवाणीवरील भाषणासाठी दुसरा दिवस निवडला असता तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. पण मग टी.आर.पी. जास्त कुणाचा- मोदींचा की भागवतांचा हाही प्रश्न निर्माण झाला नसता. मोदींनी याच दिवसाची निवड करून संघाला स्पष्ट संकेत दिले आहेत. आपण ते जाणून घ्यायचे की नाही ते ज्याने त्याने ठरवायचे आहे.
 
नीलांजन मुखोपाध्याय
ज्येष्ठ पत्रकार व लेखक

Web Title: Ramlila-Modi and RSS The team's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.