करनीती भाग-२९६ : जीएसटीअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:40 AM2019-07-29T03:40:59+5:302019-07-29T03:41:39+5:30
करनीती भाग-२९६
उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २७ जुलै २०१९ रोजी झालेल्या ३६व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये कोणत्या शिफारशी करण्यात आल्या आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, ३६व्या जीएसटी कौन्सिलच्या सभेत काही वस्तू व सेवा पुरवठ्यांच्या जीएसटी दरात बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच अंतिम तारखांमध्ये वाढ करण्यात यावी हेदेखील त्यात समाविष्ट आहे.
अर्जुन : कृष्णा, वस्तू व सेवा पुरवठ्यासंबंधीच्या जीएसटी दराविषयी कोणती शिफारस करण्यात आली आहे?
कृष्ण : अर्जुना, वस्तू व सेवा पुरवठ्याच्या दराबाबतीत बदल खालीलप्रमाणे आहेत :
इलेक्ट्रिक वाहनांवरील दर हे १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याबाबत.
चार्जर तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेले चार्जिंग स्टेशन यांवरील दर हे १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याबाबत.
स्थानिक प्रशासनाला चार्जर तसेच इलेक्ट्रिक बसेस भाड्याने देण्यासंबंधी जीएसटीत सूट देण्यात आली आहे. चार्जर तसेच इलेक्ट्रिक बस ज्याची क्षमता १२ व्यक्तींपेक्षा जास्तीची आहे त्याला सूट देण्यात आली आहे. हे बदल १ आॅगस्ट २०१९ पासून लागू होतील.
अर्जुन : कृष्णा, फॉर्म ॠरळ उटढ-02 कशासंबंधी आहे? त्याबाबतीत असलेली वाढीव अंतिम तारीख कोणती?
कृष्ण : अर्जुना, जेव्हा पुरवठादाराला कम्पोझिशन स्कीमअंतर्गत यायचे आहे, त्या वेळेस त्याला ते शासनाला माहिती देणे जरुरीचे आहे व हे फॉर्म ॠरळ उटढ - 02 द्वारे करता येईल. ॠरळ उटढ - 02 द्वारे कर भरण्याच्या पर्यायांचा लाभ घेण्यासाठी सेवा पुरवठादाराने माहिती दाखल करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २०१९ वरून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा दोन महिन्यांचा कालावधी आहे.
अर्जुन : कृष्णा, फॉर्म ॠरळ उटढ-08 कशासंबंधी आहे? त्याबाबतीत असलेली वाढीव अंतिम तारीख कोणती?
कृष्ण : अर्जुना, एप्रिल २०१९ पासून कम्पोझिशन स्कीमअंतर्गत असलेल्या पुरवठादाराला फॉर्म ॠरळ उटढ-08 द्वारे तिमाही रिटर्न दाखल करणे आहे. हे एक स्वीकृत कर भरण्याचे विधान आहे. फॉर्म ॠरळ उटढ-08 मध्ये कम्पोझिशन डिलर्सला तिमाही अंतर्गत असलेल्या स्वीकृत कर भरण्यासंबंधीची सखोल अथवा थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे. हे रिटर्न कर भरण्यासंबंधी चलनाचे कामसुद्धा करेल. जेणेकरून करदात्याला त्याचा लाभ होईल.
कम्पोझिशन योजनेअंतर्गत असलेल्या पुरवठादारांना एप्रिल २०१९ ते जून २०१९ या तिमाहीसंबंधी असलेली माहिती फॉर्म ॠरळ उटढ-08 अंतर्गत स्वीकृत करासाठी भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २०१९ वरून ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा कालावधी महिनाभराचा आहे. या कालावधीत पुरवठादारांनी स्वीकृत कर भरावा ही सरकारची अपेक्षा आहे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जीएसटी कौन्सिलने घेतलेले सर्व बदल हे अर्थातच अपेक्षेनुसार होते. दर बदल हे आर्थिक अर्थसंकल्पातसुद्धा नमूद करण्यात आले होते. जे करदाते चार्जर तसेच इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी व्यवहार करतात त्यांना या निर्णयाने खूप मोठा दिलासा देण्यात आला आहे. येत्या काळात या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून त्याचा विकास व्हावा, अशी सरकारची अपेक्षा असेल. आपण आशा करू या की भविष्यात नवीन चार्जर तसेच इलेक्ट्रिक वाहन उद्योगासंबंधी चांगले दिवस येतील.
( लेखक चार्टर्ड अकाऊंटंट आहेत )