जैन पर्युषण पर्वाचे धार्मिक महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:21 AM2018-09-12T00:21:31+5:302018-09-12T00:21:33+5:30

कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते.

Religious Importance of Jain Purushottam | जैन पर्युषण पर्वाचे धार्मिक महत्त्व

जैन पर्युषण पर्वाचे धार्मिक महत्त्व

Next

- भरत जैन
कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते. शिवाय यामुळे पुण्यार्जन होऊन मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे दहा दिवस गणेशोत्सव, नऊ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा दहा दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्व जण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. ‘पर्युषण’ म्हणजे ‘उपासना’, जी स्वकल्याणासाठी केली जाते. ‘आत्मकल्याण’ म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जीवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रीय द्विइंद्रिय जी इंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याश्रयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने मोक्ष मिळविता येतो. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असून, ते कसे साध्य करता येते हे आपण थोडक्यात पाहू. चिंतन सामायिक (रोजच होते) व ते पाळण्याचा संकल्प केला जातो. एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, न ऐकले तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांंगून त्याला क्षमा करणे; मग तो लहान असो, मोठा असो, हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ दुसऱ्या दिवशीचा धर्म उत्तम मार्दव आहे. ‘मार्दव’ म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे, नम्रता अंगीकारणे. सर्व मोठी म्हणवणारी माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीरांपर्यंत सर्व अति मृदू-नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपण तर देतेच शिवाय पुण्यही लाभते. तिसरा दिवस ‘आर्जव’चा आहे. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, कोठेही कपट मनात नसते, मायाचार न करणे. शौच म्हणजे शुचिता, पवित्रता, निर्मलता, लोभाचा नाश करणे. आजचा बोकाळलेला भ्रष्टाचार ‘हा’ धर्म न अंगीकारण्यानेच आहे. सत्य बोलणे, वागणे, खोटे-लबाड न बोलणे. सत्याची नेहमीच जीत होते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणतात ‘सत्यमेव जयते’.
मनाविरुद्ध घडणाºया घटनांनी मन विचलित न होऊ देता संयम बाळगणे म्हणजे स्वत:ला त्रासही होत नाही व पुण्यार्जनही होते. हे इंद्रियांना जिंकणे होय.

Web Title: Religious Importance of Jain Purushottam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.