साहेब, एकदा टोकाचं सांगा!

By अतुल कुलकर्णी | Published: June 6, 2018 02:30 AM2018-06-06T02:30:25+5:302018-06-06T02:30:25+5:30

आपण जाणते राजे. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीविषयीचे आपल्याला जेवढं ज्ञान तेवढं या देशात कुणाला असेल...? कधी, काय, कसं पेरलं की चांगलं उगवतं याचा आपल्या एवढा अभ्यास कुणाचाही नाही.

 Saheb, tell me once! | साहेब, एकदा टोकाचं सांगा!

साहेब, एकदा टोकाचं सांगा!

Next

प्रिय शरद पवार साहेब,
      आपण जाणते राजे. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीविषयीचे आपल्याला जेवढं ज्ञान तेवढं या देशात कुणाला असेल...? कधी, काय, कसं पेरलं की चांगलं उगवतं याचा आपल्या एवढा अभ्यास कुणाचाही नाही. कोणत्या मातीत काय रुजतं, आणि कुठून कशाचं पीक काढावं यातही आपला हातखंडा... यशवंत मनोहर यांनी ‘सदरहू पीक आम्ही आसवांवर काढलं आहे...’ असं जरी लिहिलं असलं तरी कोणतं पीक आसवांवर आणि कोणतं भावनेवर काढावं याचे क्लासेस सुरू झाले तर एका दिवसात बुकिंग फुल्ल होईल. 
असो, विषय तो नाही. आपण शेतकºयांना आवाहन केलं की तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हीच टोकाची भूमिका घ्या...! पण यामुळे काही प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं काही केल्या मिळत नाहीत. म्हणून विचार केला, आपल्यालाच पत्र लिहून विचारावं. 
आम्ही शेतकरी विचारात पडलोय. शेतकºयांनी सुरू केलेला संघर्ष थांबवायचा की नाही याचा निर्णय शेतकºयांनीच घ्यावा, आणि स्वत:च्या प्रश्नासाठी टोेकाची भूमिका घ्यावी, असा आपला जाणता सल्ला आहे. म्हणजे आम्ही नेमकं काय करावं...? संघर्ष थांबवला तर टोकाची भूमिका घेता येत नाही आणि टोकाची भूमिका घेताना जीवाचं काही बरं-वाईट झालं तर परत तुम्हीच म्हणणार की संघर्ष थांबवायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचं होतं. थोडक्यात काय दोन्हीकडून आमचाच कार्यक्रम...! 
आमचे दादासाहेब म्हणत होते, की आपल्या ज्ञानीपणावर विश्वास ठेवत एवढी वर्षे आम्ही आपल्याला मतदान करत आलोय. विश्वास दाखवत आलोय. याहीवेळी आम्ही आपल्याच पक्षाला मत दिलंं, आता मध्येच ते नरेंद्र-देवेंद्र आले त्यात आमचा काय दोष? पण आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काय करताय, हे आम्ही कुणाला विचारायचं? आमच्या प्रश्नावर आपल्या पक्षानं हल्लाबोल केला, त्यातून काही पदरात पडलं नाही, म्हणून आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला सांगताय का? असा त्यांचा सवाल! 
एक पत्रकार गंभीरपणानं सांगत होते, आपला पक्ष शिवसेनेला बाजूला सारून सत्तेत जायला निघाला होता. सगळं काही ठरलं होतं. अजितदादा, तटकरेंना बाजूला ठेवायचं, बाकीच्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं. तारीखपण ठरली होती म्हणे, पण सुप्रियाताई मध्ये पडल्या, तुम्ही सगळे जा त्या भाजपात, मी नाही येणार, गरज पडली तर मी एकटीच राहीन राष्टÑवादीत... आणि मग कुठं सगळं गणित मोडलं, असं काहीबाही सांगत होते ते. हे खरंय का? की बिनकामाच्या पत्रकारांनी सोडलेली पुडी आहे...? साहेब, प्रश्न असाय की आपला पक्ष भाजपासोबत आहे की विरोधात हे काही केल्या कळत नाही. विरोधात आहे म्हणावं तर मध्येच कुणीतरी भाजपाबद्दल चांगलं बोलतं. सोबत आहे म्हणावं तर कुणीतरी विरोधात बोलतं. आपले जयंत पाटील भाजपात जाणार असं म्हणत होते तर तुम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. तर आता सांगलीतले आपले ११ नगरसेवक भाजपात गेले. काय नाटक आहे तेच कळेनासं झालंय. तेव्हा एकदा आपण कुणाच्या विरोधात आहोत व कुणाच्या बाजूनं हे टोकाची भूमिका घेऊन सांगून टाकता का? 

(तिरकस)

Web Title:  Saheb, tell me once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.