मैदाने वाचवा; खेळ जगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:27 AM2019-01-20T04:27:08+5:302019-01-20T04:27:12+5:30

टॅब, मोबाइल यांनी खेळाची हौस भागविता येईल, परंतु तंदुरुस्त शरीरासाठी, मनस्थिती आणि युवकांच्या समृद्धीसाठी मैदानांवरील अतिक्रमणे रोखणे हिताचे आहे.

Save the field; Live the game! | मैदाने वाचवा; खेळ जगवा!

मैदाने वाचवा; खेळ जगवा!

Next

- भास्कर सावंत
टॅब, मोबाइल यांनी खेळाची हौस भागविता येईल, परंतु तंदुरुस्त शरीरासाठी, मनस्थिती आणि युवकांच्या समृद्धीसाठी मैदानांवरील अतिक्रमणे रोखणे हिताचे आहे. आधुनिकीकरणाच्या धुक्यात हरवणारी मैदाने वाचवायला हवीत. जगात सर्वात कमी मोकळी जागा असणारे शहर म्हणून मुंबईकडे पाहिले जाते हे खरे असले, तरी असलेली मैदाने टिकविणे ही काळाची गरज आहे.
आपला देश स्वतंत्र होऊन ७२ वर्षे झाली, तरी खेळ हा विषय भारतात कोणाच्याच अजेंड्यावर नाही. तरीही आम्ही ऑलिम्पिक विजयाची स्वप्ने बघतो. पदकांच्या दुष्काळी अंधारात मग एखाद दुसऱ्या पदकांच्या कमाईने आम्ही सुखावतो. या साºयात माझा महाराष्ट्र कुठे आहे? त्याची दखल घेत आम्ही आमच्या बालयुवकांवर मेहनत घेत ऑलिम्पिकच्या मार्गावर त्यांना आणणार आहोत का? हा शोध घेतला तर त्यातही क्रीडारत्न सापडणे कठीण नाही.
महाराष्ट्रात सुमारे दीड लाख शैक्षणिक संस्था आहेत, यातील किती संस्थांकडे स्वत:ची मैदाने आहेत? यातून किमान शेकडाभर दर्जेदार खेळाडू घडविणे अशक्यप्राय नाही, त्यासाठी संस्थाचालक, संघटना आणि सरकारची इच्छाशक्ती हवी. मैदान ही आॅलिम्पिकमध्ये मिळणाºया यशाची पहिली पायरी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली मैदाने २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत खेळाने, सांस्कृतिक उपक्रमाने बहरलेली होती़ १९८२ च्या गिरणी संपानंतर परिस्थितीत बदल होत गेला़ विविध वाहिन्यांच्या आगमनाने मैदानावरील गर्दी ओसरायला लागली़ शालेय अभ्यास पद्धतीच्या चढाओढीत शिकवण्यांचे फॅड वाढत गेले़ मार्कांच्या चढाओढीत बालकांचे पाय मैदानापासून दुरावायला लागले़ या सवयी मोडल्याने खेळासाठी तरुणाईची संख्याही घटत गेली़ शाळेतही शारीरिक शिक्षणाच्या तासिका घटत गेल्याने मैदानी खेळांची गुणवत्ता घटत चालली़ शासनाच्या पटलावर पाउणशेच्या जवळपास खेळांची संख्या असली, तरी समूहाने खेळल्या जाणाºया मैदानी खेळांची संख्या किती? कालांतराने आट्यापाट्या लोप पावला, मातीतील कुस्ती, चपळतेचे दर्शन घडविणारा खो-खो घटू लागला, यामागे उपयुक्त मैदानांचा अभाव हेही एक कारण आहे़
काँक्रिटच्या जंगलात हरवत चाललेले शहर उपनगरातील शेतजमिनी नष्ट होऊन उभे राहिलेले हाउसिंग कॉम्प्लेक्स, टोलेजंग इमारती यात मैदानांचा बळी जाऊ लागला़ शहरात किमान मोकळा श्वास घेता यावा, या दृष्टीने मैदान बचाव चळवळ उभी राहिली़ त्यालाही आता ४५ वर्षे झाली़ मैदान बचाव लढ्याचा सकारात्मक परिणाम झाला. कुर्ला पश्चिमेकडील गांधी मैदान, माहीमच्या मोरी रोड परिसरातील दत्त मंदिर, करी रोडचे गोदरेज, व्रिकोळीचे राजेसंभाजी, घाटकोपरचे माणिकलाल, नेहरूनगरचे छत्रपती शिवाजी महाराज, माटुंग्याचे दडकर ही खेळाने बहरलेली मैदाने अतिक्रमणापासून वाचविली गेली. काही संस्थांनी जागरूक होत शाळांची मैदाने खेळती ठेवली. मैदान हा विषय एवढा विस्तारित आहे, याची कल्पना जनमानसात नव्हती़ मात्र, जागृती होऊन या विषयावर लोक आता किमान चर्चा करू लागले आहेत़
ऐतिहासिक परंपरा असलेले आझाद मैदान, प्रभादेवीचे नर्दुल्ला टँक मैदान, मेट्रो रेल्वेच्या उभारणीत नष्ट होतेय़ मुंबईसारख्या शहरात पार्र्किंगसाठी मैदानांचाही बळी देण्याचे प्रकार ऐरणीवर येत आहेत. किमान जनता या विषयावर दबाव, आमिषे याला न जुमानता विरोध करू लागली आहे.
(लेखक मैदान बचाव समितीचे अध्यक्ष आहेत.)

Web Title: Save the field; Live the game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.