जंगल वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:41 AM2018-04-02T00:41:00+5:302018-04-02T00:41:00+5:30

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते.

 Save the forest | जंगल वाचवा

जंगल वाचवा

googlenewsNext

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भातील आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील जंगलांमध्ये आगीच्या ५८४४ घटनांमध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी आतापर्यंत आगीच्या तीन हजारावर छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेत. जंगलातील या वणव्यांकडे ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सहजतेने बघण्याची एक सवयच आम्हाला लागली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण उन्हाळ्यात वणवा लागतोच, तेंदूचा हंगाम असला की लोक आग लावतातच असे आम्ही गृहितच धरून चालत असल्याने काही किरकोळ उपाययोजना वगळता या आगी नियंत्रणात आणण्याकरिता अथवा त्या लागूच नयेत या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज यंत्रणा अद्यापही आम्ही तयार केलेली नाही, आणि असली तरी ती प्रभावीपणे अमलात आणलेली नाही, हे या आगीचे प्रमाण बघितल्यावर कुणाच्याही लक्षात यावे. एकीकडे विकासाच्या नावावर जंगलांची सरेआम कत्तल सुरू असताना जंगलांमध्ये लागणाºया या वणव्यांमुळे होणारे नुकसान कधीही भरून न निघणारे असेच आहे. या आगींमुळे केवळ हजारो प्रकारच्या वनस्पतीच नष्ट होत नाहीत तर जमिनीचा पोतही खराब होतो. या जमिनीवर पुन्हा वृक्षवल्ली उगवणे,बहरणे अशक्य होऊन बसते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या जंगलांवर पोसल्या जाणारे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास कायमचा हिरावून घेतला जातो. वणवा पेटला की वन्यजीव जंगलाबाहेर पडतात आणि संकटात सापडतात ते वेगळेच. एकंदरीतच आम्ही जंगलांमधील आगी अजूनही पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. कुठल्याही जंगलात आग लागली की वनमजूर आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी ती विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे खरे. पण त्यांच्या सोबतीला जी सुसज्ज यंत्रणा असायला हवी ती आपल्याकडे आहे का? गेल्या ३० वर्षात राज्यात वृक्षलागवडीचे असंख्य कार्यक्रम घेतल्यावरही जंगलांची स्थिती काही फारशी चांगली नाही. ३५ वर्षात जवळपास १५०० चौ.किमी. वनक्षेत्र नष्ट झाले आहे. थोडेबहुत घनदाट जंगल शिल्लक आहे ते केवळ विदर्भातच. तेव्हा या आगींमुळे ते नष्ट होऊ नये,एवढीच अपेक्षा आहे.

Web Title:  Save the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.