विज्ञानमय प्रतल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:24 AM2019-02-07T05:24:18+5:302019-02-07T05:25:41+5:30

प्रकृतीच्या प्रचंड अशा भरलेल्या व गूढ असलेल्या प्रदेशात जे जीवात्मे राहतात त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. मानव, अमानव व कृत्रिम मानवातील आणखी वर्गीकरण म्हणजे पृथ्वीवरील भौतिक शरीर असलेले व भौतिक शरीर नसलेले मानव.

 Science fiction | विज्ञानमय प्रतल

विज्ञानमय प्रतल

googlenewsNext

- डॉ. मेहरा श्रीखंडे 
 
प्रकृतीच्या प्रचंड अशा भरलेल्या व गूढ असलेल्या प्रदेशात जे जीवात्मे राहतात त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. मानव, अमानव व कृत्रिम मानवातील आणखी वर्गीकरण म्हणजे पृथ्वीवरील भौतिक शरीर असलेले व भौतिक शरीर नसलेले मानव. आपण या आत्म्यांना मेलेले म्हणू शकत नाही. कारण विज्ञानमय प्रतलात कोणीही मेलेले नसते. आपणापेक्षा त्यांच्यात जिवंतपणा जास्त दिसून येतो. पृथ्वीवरील जीवात्म्यात जे विचार, भावना व स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तशीच सर्व विज्ञानमय प्रतलातही दिसतात व त्यांचा चेहरा व शरीर पृथ्वीवर जसे दिसते तसेच विज्ञानमय कोषातही दिसते.

हे जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यांची दोन सौंदर्यस्थाने म्हणजे त्यांचे असलेले अंतर्गत आध्यात्मिक वैशिष्ट्य व स्वत:ला आपल्या मनाप्रमाणे दृश्य व अदृश्य करण्याची ताकद. त्यांची आयुष्ये आपल्यापेक्षा खूप मोठी असून त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या आयुष्याची मर्यादा ठरते. विज्ञानमय आत्मे खूप वर्षांपूर्वी मेलेल्या आप्तस्वकीयांना भेटू शकतात. काही आध्यात्मिक लोक जे ध्यानधारणेत पारंगत असतात ते या माहिती नसलेल्या प्रतलाशी जुळवून घेऊन मनाच्या एकाग्रतेने या विज्ञानमय प्रतलात आपल्या मनाप्रमाणे कुठेही वावरू शकतात. काहीजण तर विज्ञानमय प्रतलात जे त्यांनी बघितले व ज्यांना ते भेटले त्या सर्व आठवणी जागृतावस्थेतही आणू शकतात.

हे शरीराबाहेर जाऊन येण्याचे प्रयोग करण्यासाठी शिक्षण व खूप मेहनत यांची आवश्यकता असते. आश्चर्य म्हणजे जी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असते तिचे विज्ञानमय शरीर हे कमी उन्नत असलेल्या व्यक्तीच्या शरारीपेक्षा चांगले असते. एक सर्वसामान्य समजूत अशी आहे की, झोपेमध्ये मनुष्याचे विज्ञानमय शरीर हे भौतिक शरीरापासून वेगळे होऊन विज्ञानमय जगातील वेगवेगळ््या प्रवाहातून ते फिरत असते. इथे ती अनेकांना भेटते व तिला अनेक चांगले व वाईट अनुभव येतात जे ती आपल्या भौतिक शरीरातील मेंदूला पोहचविते व ते आपल्याला स्वप्नाच्या स्वरूपात दिसतात. स्वप्नातील अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव म्हणता येईल. सामान्य माणसातील विज्ञानमय शरीराला या प्रतलाचे ज्ञान नसल्यामुळे हे अनुभव त्याला अत्यंत सुस्पष्ट व धूसर दिसतात. त्यांचे उद्देश हे नकारात्मक व वाईट असल्यामुळे जे व्हुडो व काळी जादू करतात. ते या विज्ञानमय प्रतलात जाऊन येऊ शकतात. पण पारंगत होऊ शकत नाहीत.

ज्यांना विज्ञानमय प्रतलाची नीटशी माहिती नाही, त्यांनी अशा या त्रास देणाºयांना जरा टाळणेच बरे. या विषयाबद्दल बहुतेकांना कुतूहल आणि उत्सुकता असते. परदेशातही या विषयावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. भारतातही अनेकांनी या विषयावर अभ्यास केला आहे. जीवांचा हा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणचा प्रवास ही बाब गूढ वाटते. मात्र, या विषयावर अनेकांना तपशील जाणून घ्यायचा असतो. शरीराबाहेर जाऊन येण्याचे हे प्रयोग अतिशय सखोल अभ्यासाचा विषय आहे.

Web Title:  Science fiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.