‘शिवशाही’ची बाजारगाडी होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:31 AM2017-12-06T03:31:09+5:302017-12-06T03:31:15+5:30

परिवहन महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे.

'Shivshahi' should not be marketable | ‘शिवशाही’ची बाजारगाडी होऊ नये

‘शिवशाही’ची बाजारगाडी होऊ नये

Next

परिवहन महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे. महामंडळाने बसची गुणवत्ता तसेच सेवा आणि वाजवी तिकीट दर याचा मेळ बसवला तर शिवशाही महामंडळाला उर्जितावस्था आणू शकते पण याचा मेळ बसवला नाही तर शिवशाहीची अवस्थाही हिरकणीसारखी होऊन ती बाजारगाडी होऊ शकते.


राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी बसचा प्रयोग करून पाहिला पण तो फसल्यानंतर आता शिवशाही बस आणली असून, ती बºयापैकी परवडणारी व आरामदायी आहे. केवळ लालपरीच्या पलीकडे न जाणाºया राज्य परिवहन महामंडळाला १९८२ साली मिळालेल्या एशियाड बसनंतर परिवहन महामंडळाने आरामदायी सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या बसेसनाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण कालांतराने मोडकळीस आलेल्या बसचा केवळ रंगच आरामदायी राहिला. तरीही त्याच गाड्या आरामदायी गाड्या म्हणून प्रवाशांकडून आरामदायीचे भाडे घेतले जाऊ लागले. तेव्हा प्रवाशांनी अशा आरामदायीकडे पाठ फिरवली. मग त्यांचा लाल रंग करण्यात आला आणि कालांतराने त्या गाड्या खेडेगावात बाजारगाड्या म्हणून धावू लागल्या. आजही त्या गाड्या काही ठिकाणी धावत असून त्यांच्या सीट आरामदायी आहेत. त्यानंतर महामंडळाने कोकणातील एका खासगी कंपनीकडून हिरकणी गाड्या बांधून घेतल्या. त्या गाड्या तर अक्षरश: पाच वर्षांतच बाजारगाडीपेक्षा कुचकामी निघाल्या. १९८२ साली महामंडळाला मिळालेल्या गाड्यांचा सांगाडा दणकट आणि सीट आजही आरामदायी वाटतात. पण हिरकणी गाड्यामधून प्रवास करताना प्रवाशांना कधीच आराम वाटला नाही. अगदी दगडावर बसून प्रवास केल्यासारखे वाटते. रात्रीच्या वेळी या गाडीतून प्रवासी डोके टेकवून न झोपता खांदा टेकून झोपतात. त्यामुळे या गाड्यांकडे प्रवाशांनी अक्षरश: पाठ फिरवली. हिरकणीच्या तुलनेत आता महामंडळाने शिवशाही ही खºया अर्थाने आरामदायी आणि वातानुकूलित बस आणली आहे. राज्यात ज्या मार्गावर ही बस धावते आहे तिला बºयापैकी उत्पन्न मिळत आहे. खासगीच्या आणि हिरकणीच्या तुलनेत तिचे तिकीट दरही परवडणारे आहेत. हीच सेवा हेच तिकीट दर कायम ठेवले तर प्रवासी तिच्यापासून दूर जाणार नाहीत. एशियाड गाडीने मिळवलेली प्रतिष्ठा हिरकणीने इतकी घालवली की एशियाड बाजारगाडी झाली तरी तिची सीट आरामदायी होती पण हिरकणीची नवीन आसनेही आरामदायी वाटली नाहीत. यापुढे हिरकणी बस बनवताना परिवहन महामंडळाचे अधिकारी व आरटीओचे अधिकारी यांना त्या गाडीतून रात्री २५० किलोमीटर प्रवास करण्याची सक्ती करावी म्हणजे आरामदायी कशाला म्हणतात ते कळेल. आता महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. पण त्या खासगी कंपनीकडून बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे. महामंडळाने बसची गुणवत्ता तसेच सेवा आणि वाजवी तिकीट दर याचा मेळ बसवला तर शिवशाही महामंडळाला उर्जितावस्था आणू शकते पण याचा मेळ बसवला नाही तर शिवशाहीची अवस्थाही हिरकणीसारखी होऊन ती बाजारगाडी होऊ शकते. तसे झाले तर लालपरीला मान वर करणे अवघड होऊन बसेल.

Web Title: 'Shivshahi' should not be marketable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.