विशेष लेख: माणसाचे मूल कृत्रिम गर्भाशयात वाढवावे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:10 AM2023-04-19T11:10:34+5:302023-04-19T11:11:00+5:30
Artificial Womb: 'परफेक्ट बेबी' घरी आणण्याच्या ओढीने दूरगामी सामाजिक अस्थिरतेलाच आपण अप्रत्यक्ष निमंत्रण तर देणार नाही ना?..
- दीपक शिकारपूर
(माहिती तंत्रज्ञान अभ्यासक)
वाढत्या लोकसंख्येच्या समस्येचे काही पैलू आहेत. काही भीतीदायक शक्यताही दडलेल्या आहेत देशांमध्ये विविध कारणांमुळे जन्मदर खूपच घटतो आहे. आपण यामागील तंत्रज्ञानाकडे प्रथम नजर टाकू. वाहने परिणामी तेथे तरुणवर्ग कमी होऊन कार्यनिवृत्तीच्या किंवा इतर वस्तूंचे उत्पादन करणान्या कोणत्याही क्यातील व प्रौढांची संख्या वाढते आहे. उदा. जपान, बल्गेरिया, द. कोरिया चीन इत्यादी. याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम चिंताजनक असू शकतात. त्याचप्रमाणे, अपत्याला जन्म देणे काहींना नैसर्गिकरीत्याच शक्य नसते. विशेषतः कर्करोगासारख्या किंवा अन्य काही कारणांमुळे ज्या स्त्रियांना गर्भाशयाच्या समस्या येतात त्यांच्या नशिबी तर अपत्यहीनता कायमचीच असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार गर्भावस्थेदरम्यान तसेच बाळंतपणातील गुंतागुतीमुळे दरवर्षी सुमारे तीन लाख बालके मृत्युमुखी पडतात. या आणि अशा समस्यांवर मात करून नवतंत्रज्ञानाचे दोन मुख्य घटक अनेक जोडप्यांना अपत्यप्राप्ती घडवू शकतात- कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि सूक्ष्मतंत्रज्ञान जातील. (नोटेक्नोलॉजी)।
काही शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार आपल्याला हवे तसे मूल तयार करून घेणे प्रत्यक्षात शक्य होऊन, अपुल्या दिवसांचे कमकुवत बाळ किंवा सिझेरियन शस्त्रक्रिया यासारख्या बाबी पूर्णपणे इतिहासजमा होणार आहेत. अर्थात या संकल्पनेमध्ये अनेक धोके तसेच विचित्र व भीतीदायक शक्यताही दडलेल्या आहेत.
आपण यामागील तंत्रज्ञानाकडे प्रथम नजर टाकू. वाहने किंवा इतर वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कोणत्याही अत्याधुनिक कारखान्याप्रमाणेच बाळे जन्माला घालण्याच्या या फैक्टरी मध्ये हजारोंच्या संख्येने विशिष्ट्य मटेरियलच्या पारदर्शक डब्याच्या (पॉड) रूपातील कृत्रिम गर्भाशये असतील अशा प्रत्येक गर्भाशयात, अगदी बीजावस्थेपासून बाळाची वाढ केली जाईल. जंतुसंसर्गाची शक्यता मुळातूनच टाळण्यासाठी या कवचाला आतून बाहेरून) काहीही चिकटून राहणार नाही अशी तजवीज असेल. गर्भाला सर्व पोषकद्रव्ये नळीद्वारे पुरवण्यासाठी प्रत्येक पौडजवळ अक्षरशः दोन छोट्या टाक्या बाळाच्या बेंबीवर बसवलेल्या नळीतून, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स नियंत्रित प्रणालीद्वारे त्याच्या शरीरात सोडला जाईल, तर त्याच नळीतून अपद्रव्ये बाहेर काढून दुसऱ्या टाकीत साठवली जातील.
बाळाच्या शरीरातील सर्व महत्त्वाच्या लक्षणांवर अर्थातच नजर ठेवली जाईल इदयाचे ठोके, शरीराचे तापमान, ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर, रक्तदात इत्यादी त्याचप्रमाणे शारीरिक वाढ निरोगी आहे ना आणि काही जनुकीय गडबड नाही ना (कारण जनुकीय दोषातून विकृत बालक जन्माला येते हेदेखील पाहिले जाईल.
सर्व माहिती लाइष्ट (रिअल टाइममध्ये) बाळाच्या आईबाबांच्या फोनवर थेट पाठवली जात राहील, ज्यायोगे त्यांना बाळाबद्दल कोणतीही चिंता राहणार नाही. शिवाय बाळाची वाढ प्रत्यक्ष (म्हणजे फोनच्या स्क्रीनवर) पाहण्याचा आनंदही त्यांना मिळेल. गर्भ काही महिन्यांचा झाल्यावर आवाज आणि भाषांची नोंद घेऊ शकत असल्याने त्याच्याशी नियमित, ठराविक वेळी गप्पा माराव्यात, असा सल्ला डॉक्टरही देतात. या बाळांचे आईबाबा स्पीकरमार्फत त्याच्याशी बालू शकतील. आधुनिक वायरलेस हॅप्टिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाळाच्या शारीरिक हालचाली पालकांना जाणवू शकतील. अगदी त्याने लाथ झाडलेलीही आईला कळेल, एका वाक्यात सांगायचे तर नैसर्गिक मानवी गर्भधारणेतील सर्व टप्पेही संपूर्णपणे अमलात आणले जातील.
सख्या तरी ही संकल्पना प्रत्यक्षात आलेली नसली तरी तशी लवकरच देण्याची शक्यता खूपच आहे. कारण हशीम अपनी या जर्मन जैवतंत्रज्ञान संशोधकाच्या मते एक्टीलाइफ (EctoLife) नावाची त्याची स्वताची प्रयोगशाळा अगदी तयार आहे आणि अल्पावधीच्या पूर्वसूचनेवर प्रयोगाचे रूपांतर करत केले जाऊशकते। जगातला हा असा पहिलाच कारखाना असेल आणि तो संपूर्णपणे पर्यावरणस्नेही ऊर्जा, तीही कमीतकमी वापरून चालवला जाईल असेही त्याचे सांगणे आहे.
बाळे तयार करण्याचा 'कारखाना' हीच संकल्पना वापरायची म्हटल्यावर त्यामध्ये आर्थिक व औद्योगिक व्यवहारांचा, नफ्यातोट्याचा संबंध येणारच! अगदी त्याप्रमाणेच बाळामध्ये समाविष्ट करण्याच्या विविध गुणांची वेगवेगळी पॅकेजेस उपलब्ध होतील. बाळाची उंची, ताकद व क्षमता. कातडीचा आणि डोळ्यांचा रंग, केसांची ठेवण, बुद्धिमत्ता, कलांमधील प्रावीण्य, ही यादी भरपूर लांबवता येईल. त्यानुसार डिलक्स, सुप्रीम, इलाइट वगैरे प्रकारची पॅकेजेस मिळू शकतील 'हौसेला मोल नाही' हा शब्दप्रयोग या क्षेत्रालाही लागू राहील.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेल्या धोक्याचा उगम इथेच असू शकतो! एखाद्या संशोधनाचा मूळ हेतू अतिशय चांगला, जनकल्याणाचा असला तरी भविष्यात त्याचा प्रत्यक्ष वापर कोणत्या दिशेने जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. क्रूर किया विकृत मनोवृत्तीची बाळे अशा कारखान्यांत जन्माला घालून त्यांच्याकरवी अनैतिक कामे करून घेतली जाण्याचा धोका मोठा आहे. आपल्याला हवी तशी माणसे तयार करून त्यांची दूरनियंत्रित फौजच तयार करण्याचे समाजकंटकांचे स्वप्न यातून प्रत्यक्षात येऊ शकते, असे झाले तर त्यावर नियंत्रण कसे आणि कोण ठेवणार? निसर्गावर मात करण्याची खुमखुमी अंतिमतः माणसाला महागात पडते हे दिसून आले आहे तरीही आपण त्याच दिशेने पुनःपुन्हा का जात आहोत? हे सर्व लक्षात घेता, 'परफेक्ट बेबी" घरी आणण्याच्या भावनेत सापडून भावी पालक दूरगामी सामाजिक अस्थिरतेलाच अप्रत्यक्ष निमंत्रण देणार नाहीत ना?..