ग्रहण काळात शुक्लकाष्ट

By सचिन जवळकोटे | Published: July 26, 2018 06:10 AM2018-07-26T06:10:18+5:302018-07-26T06:11:27+5:30

ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक.

Shuklakasta during the eclipse | ग्रहण काळात शुक्लकाष्ट

ग्रहण काळात शुक्लकाष्ट

Next

‘उद्या काय हाय रं बंड्याऽऽ’ पारावर बसल्या-बसल्या कानात काडी फिरवत गुंड्यानं विचारलं. ‘उद्या का नाऽऽय पोरनिमा हाय पोरनिमा.. खाटखूटवाली आषाढी पोरनिमा,’ बंड्यानंही डोक खाजवत उत्तर दिलं. तसा गण्या खेकसला, ‘खाटखूटवाली गटारी अमावश्या असतीयाऽऽ’
‘मग काय हाय रं उद्या?’ महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण, या गहन प्रश्नासारखंच कोडं बंड्याला पडलं.
‘उद्या गिºहान हाय गिºहानऽऽ लई सावध ºहायचं असतंया उद्या,’ गुंड्यानं नवी माहिती पुरविताच पारावरच्या चर्चेला लागले ग्रहणाचे वेध. या ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक. सर्वप्रथम ही सारी मंडळी ‘कृष्णकुंज’वर गेली, तेव्हा खर्ज्या आवाजात अन् फर्ड्या भाषेत ‘राज’ सांगू लागले, ‘मी माझ्या तमाम मनसैनिकांना सांगितलंय की मुंबईच्या खड्ड्यातल्या पाण्यात ग्रहण बघा अन् माझ्या फेसबुक वॉलवर टाका.’
.. नंतर भेटले रौतांचे संजय. ते ‘उद्धों’शी मोबाईलवरून बोलत होते, ‘आपण असं करू या का साहेब... इतकी वर्षे देवेंद्रांच्या चंद्राला आपण खंडग्रास ग्रहणाइतका त्रास दिला. आता सावज दमलं असेल तर आपण थेट खग्रासच बनू या,’ हे ऐकून मंडळी दचकली. ‘सत्तेचा सूर्य’ देऊनही ‘मातोश्री’कार केवळ ‘ग्रहणाऽऽ ग्रहणी’मध्येच अडकलेत, हे ध्यानात येताच मंडळींनी चंद्रकांतदादांना गाठलं. मात्र, ‘सार्वजनिक बांधकाम’च्या कृपेनं चौका-चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांची पाठ दुखू लागल्याचा निरोप यल्लपानं देताच मंडळी पुढे सरकली.
आता गाठ पडली जळगावच्या नाथाभाऊंशी. ग्रहणाविषयी विचारताच त्यांनी रागारागानं खडसावलं, ‘इथं मलाच ग्रहण लागून राहिलेऽऽ तिथं तुम्ही मला काय नवीन विचारून राहिले?’ हिरमुसल्या चेहऱ्यानं मंडळी सदाभाऊंना भेटली. ते पांढºया दुधातले काळे बोके हुडकत बसलेले. त्यांना विचारताच दाढी खाजवत त्यांनी दोन-तीन कृषी अधिकाºयांना धडाऽऽ धड फोन केले, ‘दिवाळी खुशीसारखी ग्रहणाची काही स्पेशल गिफ्ट-बिफ्ट असते की नाही?’ अशी विचारणा करताच तिकडचे आवाजच बंद झाले.
मग मंडळी अशोकराव नांदेडकरांना भेटली. ते मात्र, भलतेच खुशीत दिसले. ‘आता आमचं ग्रहण सुटायची वेळ झालीय,’ असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगून त्यांनी ‘राहुल बाबां की जादू की झप्पी’ हा व्हिडीओ बघण्यास सुरुवात केली. विरोधकांना ‘झप्पी’ देण्यापेक्षा सहकाºयांना ‘प्रेमाची मिठी’ मारली तर अडथळे दूर होतील, हे या ‘हात’वाल्यांना कधी कळणार, असं एकमेकांना विचारत मंडळी बारामतीला पोहोचली.
तिथं ‘मीडियासोबत आक्रमक संवाद कसा साधावा?’ हे पुस्तक वाचण्यात सुप्रियाताई दंग होत्या तर ‘मीडियासमोर कसं तोलून-मापून बोलावं?’ याचे धडे चिरंजीवांना देण्यात अजितदादा रमले होते. थोरल्यां काकांना मंडळी भेटली, तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘ग्रहणकाळात कमळाची पूजा करावी, मात्र देवेंद्राचं दर्शन घेऊ नये, अशी इच्छा असली तरी मी पडलो ‘पुरोगामी’ विचारसरणीचा. विरोधकांची ‘जात’ बघून राजकीय भूमिकेचा ‘धर्म’ ठरविणारा. त्यामुळे ग्रहणकाळात विरोधकांमागे नसती शुक्लकाष्ट लावण्याचा नवा प्रयोग करावा म्हणतोय.’
 

 

Web Title: Shuklakasta during the eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.