ये मर्दोंवाला काम नही, शेंबेकर, तू बाहर रूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 11:20 AM2022-11-05T11:20:37+5:302022-11-05T11:25:01+5:30

१९९२ मध्ये मी प्रसूतिरोगशास्त्रात एम.डी. करायला गेलो, त्याला ३० वर्षे उलटली. 'डॉ. जी' पाहिल्यावर जाणवलं, अजूनही या क्षेत्रात पुरुष काहीसे उपरेच आहेत!

Since the experiment was to be done on the brain, it was necessary for someone to donate the brain for it. | ये मर्दोंवाला काम नही, शेंबेकर, तू बाहर रूक!

ये मर्दोंवाला काम नही, शेंबेकर, तू बाहर रूक!

googlenewsNext

- डॉ. चैतन्य शेंबेकर

नुकताच डॉ. जी हा सिनेमा पाहिला आणि गायनॅकॉलॉजीला अॅडमिशन घेतल्यानंतरचे माझे दिवस आठवले. १९९२ मध्ये बोटावर मोजण्याइतकेच मुलगे प्रसूतिरोगशास्त्रात (गायनिक) एम.डी. करायचे. ही बँच मुलांसाठी नाहीच असा समज होता. डॉ. जी पाहताना लक्षात आलं की आजही यात फारसा बदल झालेला नाही. मला मात्र गायनिक करायचंच होतं आणि माझा विचार फायनल एम.बी.बी.एस. मध्ये पक्का झाला होता. अॅडमिशन घेतल्यावर काकू मला म्हणाली, अगंबाई चैतन्य, आम्हा बायकांचं कसं असतं हे तुला काय कळणार? मी मिश्कीलपणे म्हटलं, काकू, पुस्तकात लिहिलेलं असतं ना!

गेल्या २५ वर्षांत समाजामध्ये यादृष्टीने आलेला सकारात्मक बदल मी अनुभवतो आहे; पण सुरुवात सोपी नव्हती. एम.डी. ला माझ्या गाइड होत्या डॉ. पुष्पा गुर्टू कोणी मुलगा गायनिकमध्ये काम करतो आहे ही कल्पना त्यांच्या पचनी पडायलाच वेळ लागला. सुरुवातीला मला त्या काही करूच द्यायच्या नाहीत. अगदी सीझरच्या पेशंटचं ड्रेसिंग सुरू असलं तरी त्या मला म्हणायच्या, ये मर्दोंवाला काम नही, शेंबेकर, तू बाहर रूक! मी तर तुमचा प्लॉट आम्ही घेऊ! मुकाट्याने बाहेर थांबायचो.

एक मात्र खरं की मुलींच्या राज्यात एकुलता मुलगा असण्याचा मला खूप फायदा झाला. कॉलेजच्या त्या दिवसांमध्ये मी सर्वांचा लाडका होतो. ऑपरेशन्स भरपूर करायला मिळायची, सिनीअर्स विश्वासाने जबाबदारी टाकायचे आणि मी ती चोखपणे पूर्ण करायचो...तीन वर्षे कशी गेली कळलंदेखील नाही. मी १९९७ साली नागपूरला रामदासपेठेत चार खाटांचा छोटा दवाखाना थाटला आणि स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पेशंटनी माझ्यावर नेहमीच विश्वास टाकला आणि मला भरभरून प्रेम दिलं, अर्थात सुरुवातीला त्रास बराच झाला. दवाखाना सुरू करताना एका बँकेकडून कर्ज घेतलं होतं. बर्डीच्या शाखेमध्ये एक अधिकारी होते. नागपूरमध्ये आमचा छोटासा प्लॉट होता. तो आईच्या नावावर होता, कर्जासाठी तारण म्हणून तो गहाण ठेवावा लागणार होता.

कर्जाच्या कागदपत्रांवर सही करायला साहेबांनी आईला बँकेत बोलावलं आणि म्हणाले, पुरुषांना गायनॅकोलॉजिस्ट म्हणून काम करताना मी आजवर पाहिलेलं नाही. तुमचा मुलगा हे धाडस करतो आहे. त्याला जर काम मिळालं नाही तर तुमचा प्लॉट आम्ही घेऊ! आई घाबरली, मी तिला म्हटलं, आई कर सही. मी करीन सगळं व्यवस्थित! सुरुवातीला कधी काम मिळायचं. कधी नाही. त्या काळी मी, सिनीअर आणि नामांकित स्त्री गायनॅकोलॉजिस्टसकडे काम मागायला म्हणून जायचो. त्या म्हणायच्या, "अरे ऑपरेशनच्या वेळी पुरुष डॉक्टर ओटीत असलेला आमच्या पेशंटला चालणार नाही. त्यामुळे ते शक्य नाही!" रामदासपेठेत माझ्या ओपीडीला अनेक वर्षे मी एकटाच असायचो. गेल्या दहा वर्षात माझ्याबरोबर खूप डॉक्टर्स काम करतात; परंतु, सुरुवातीला परिस्थिती वेगळी होती. कालांतराने दिवस बदलत गेले. तात्पुरता असतो. अनेक स्त्रिया आम्हाला डॉ. शेंबेकरांच्या हातूनच डिलिव्हरी करायची असा हट्ट धरत आणि त्यांचे नवरे आनंदाने त्यांचा हट्ट पुरवीत असत.

गेल्या पंचवीस वर्षांत अनेक चढ- उतार पाहिले. चांगले वाईट अनुभव आले, परंतु, माझा विषय मला आवडतो, अगदी मनापासून सांगतो, हे क्षेत्र मला आवडतं! कॉलेजमध्ये असताना, ड्युटी करताना खूप मजा यायची. रात्री दोन वाजता डिलिव्हरी झाली की मावशीच्या कँटीनचा चहा पीत गप्पा मारणं हा आमचा फेव्हरेट टाइमपास असायचा; पण त्यावेळी हे लक्षात नाही आलं की, बाळंतपण म्हटलं की आयुष्यभर इमर्जन्सी, रात्री अपरात्री उठणं. धावपळ, चिंता, भीती, अनिश्चितता! आजही दरवेळी रात्री चडफडत उठताना कुठून दुर्बुद्धी झाली आणि हा विषय निवडला, असा विचार हमखास मनात येतो; परंतु, तो बाळाच्या रडण्याच्या आवाजाने आईच्या चेहऱ्यावरचं सुख, कुटुंबियांचा आनंद, त्यांचे खुललेले चेहरे पाहिले की, सगळं विसरून मी पुन्हा नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायला आनंदात आणि उत्साहात तयार असतो.

Web Title: Since the experiment was to be done on the brain, it was necessary for someone to donate the brain for it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर