उत्कृष्ट करिअरसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम
By admin | Published: May 29, 2016 03:24 AM2016-05-29T03:24:43+5:302016-05-29T03:24:43+5:30
भविष्यामधील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त करण्यासाठी दहावी, बारावी आणि पदवी स्तरावर कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची निवड करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या
- प्रा. दीपक ताटपुजे (करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक)
भविष्यामधील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त करण्यासाठी दहावी, बारावी आणि पदवी स्तरावर कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची निवड करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील वापरामुळे अद्यायावत कौशल्य वृद्धी करणारे अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. दहावीनंतर अनेक क्षेत्रात कौशल्यवृद्धींगत करणारे अनेक अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. दहावीनंतर व्यावसायिक (व्होकेशनल), विविध तंत्रज्ञानाचे तीन वषार्चे डिप्लोमा अभ्यासक्रम, किमान कौशल्यावर आधारीत (एम.सी.व्ही.सी) अनेक अभ्यासक्रम, आय.टी.आय.चे अभ्यासक्रम, कृषी क्षेत्रातील अनेक पदविका त्याचबरोबर प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दहावीनंतर आपल्या करिअर विषयक कल व आवडीनुसार अभ्यासक्रमाची निवड करावी. हे अभ्यासक्रम अद्ययावत कौशल्ययुक्त असणे करिअर समृद्धीसाठी आवश्यक आहे.
मुलभूत अभ्यासक्रमाला बदलत्या काळानुसार कौशल्यांची जोड देताना ‘करिअर मॅपिंग’ ही संकल्पना माहीत असणे गरजेचे आहे. दहावीनंतर आय.टी.आय.चा विशिष्ट अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांनी सी.एन.सी. आॅपरेशन्स, सी.एन.सी. प्रोग्रामर आदी अद्ययावत कौशल्यांची जोड देणे महत्वाचे आहे. संगणक क्षेत्राची निवड करणाऱ्या युवकांनी येत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा वेध घेऊन आपल्या मुलभूत संगणकीय ज्ञानाला कौशल्यांची जोड देणे गरजेचे आहे. ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’, ‘थ्रीडी प्रिंटींग’, ‘पर्सनल क्लाउड कॉम्प्युटिंग’, ‘अँड्रॉइड-विंडोज डेव्हलपमेंट’ आदी अद्ययावत कौशल्यांच्या अभ्यासक्रमांची निवड करणे गरजेचे आहे.
दहावीनंतर विज्ञान शाखेतील बारावीचा पर्याय निवडताना ‘पी.सी.एम.’, ‘पी.सी.बी.’, किंवा ‘पी.सी.एम.बी.’ या विषयांचा ग्रुप जाणीवपूर्वक घेताना पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता परिक्षांची माहिती घेणे अत्यावश्यक बनले आहे. मुलभूत विज्ञानशाखा, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकिय आणि उपवैद्यकिय या शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध असतानाच त्यापैकी पर्यायांची निवड ही स्वगुणवत्तेच्या आधारे करताना प्रवेशाच्या स्पर्धेचाही विचार करणे महत्वाचे आहे. आजचे युग अनेक क्षेत्रांमध्ये ‘स्पेशलायझेशन’चे असल्याने निवड केलेल्या शाखांमधील उपशाखांच्या विस्ताराची माहिती योग्य वेळीच घ्यायला हवी.
- पत्रकारिता, भाषा विकास तज्ज्ञ, भाषा विज्ञान, विज्ञान भाषा संवाद, दृकश्राव्य भाषा विज्ञान, विकास संवाद, व्हिज्युअल लँग्वेंज फॉर डिजिटल मीडिया आदी अनेक उपशाखांमधील अभ्यासक्रमांची उपलब्धता असल्याने अद्ययावत कौशल्यांचे महत्त्व करिअर संधींसाठी मोठ्या प्रमाणात वाढते आहे.
नवीन शाखांचा उदय
भाषा शास्त्रासारख्या कला शाखेतील अभ्यासक्रमासही तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने अनेक नवीन शाखांचा उदय झाला आहे.
वैद्यकीय शाखेला पर्याय
उपवैद्यकीय शाखेचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. फार्मसी, दंतवैद्यक, नर्सिंग, वैद्यकीय प्रयोगशाळाशास्त्र, फिजीओ थेरेपी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, डायलेसीस तंत्रज्ञान, रेडिओलॉजी यांसह अनेक उपशाखांमधील स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आज उपलब्ध असल्यानेच करिअर मॅपिंगला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.