समाजकार्य पदवीधरांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:24 AM2017-10-06T00:24:44+5:302017-10-06T00:25:00+5:30
शासनाने अधीक्षक व गृहपाल पदासाठी पूर्वी समाजकार्य पदवीधारक किंवा पदव्युत्तर उमेदवारांनाच संधी देण्याची अट ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाने अधीक्षक व गृहपाल पदासाठी पूर्वी समाजकार्य पदवीधारक किंवा पदव्युत्तर उमेदवारांनाच संधी देण्याची अट ठेवली होती. आता ही अट शिथील करण्यात आली असून कुठल्याही पदवीधारकाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. या अन्यायाविरोधात समाजकार्य पदवीधारक व पदव्युत्तर उमेदवारांनी गुरुवारी दुपारी धरणे दिले.
राज्य शासनाने राजपत्र असाधारण भाग ४ अ मध्ये अधीक्षक व गृहपालपदासाठी सरळ सेवा भरती करून कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरेल, असे जाहीर केले. यापूर्वी केवळ समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यासाठी संधी दिली जात होती. शासनाच्या या धोरणामुळे समाजकार्य पदवी व पदव्युत्तर धारण केलेल्या उमेदवारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. या अन्यायाविरोधात पदवी व पदव्युत्तरधारण विद्यार्थ्याच्या संघटनेने धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. आंदोलकांशी नगरसेवक अनिल देशमुख यांनी चर्चा केली. त्यांचा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापुढे मांडणार असल्याचे सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व रूपेश वानखडे, सचिन डोळस, मंगेश मानकर, आकाश पाटील, योगेश भगत, रूपेश ठाकरे यांनी केले.