सोलापुरी डाळिंबाचा जगभर तोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:34 AM2018-03-14T01:34:54+5:302018-03-14T01:34:54+5:30

विविध औषधी गुणांनी युक्त असलेलं डाळिंब हे फळ आता शेतकºयांना आर्थिक सक्षम तर करेलच; पण त्याची चव चाखण्यापूर्वी ग्राहकांना सोलापूरची आठवण करून देईल.

Solapur pomegranates worldwide | सोलापुरी डाळिंबाचा जगभर तोरा

सोलापुरी डाळिंबाचा जगभर तोरा

Next

- बाळासाहेब बोचरे

विविध औषधी गुणांनी युक्त असलेलं डाळिंब हे फळ आता शेतकºयांना आर्थिक सक्षम तर करेलच; पण त्याची चव चाखण्यापूर्वी ग्राहकांना सोलापूरची आठवण करून देईल. सोलापूरच्या डाळिंबाला जी.आय. मानांकन मिळाल्यामुळे ही डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत ‘सोलापूर डाळिंब’ या नावाने तोरा मिरवू लागली आहेत. त्याला भावही चांगला मिळू लागला आहे.
विविध औषधी गुणांनी युक्त असलेलं डाळिंब हे फळ शेतकºयांना आर्थिक सक्षम तर करेलच; पण जगाच्या बाजारपेठेतील ग्राहकाला ते चाखण्यापूर्वी सोलापूरची आठवण जरूर होईल. सोलापूरच्या डाळिंबाला जागतिक मानांकन मिळाले असून, ही डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत ‘सोलापूर डाळिंब’ या नावाने तोरा मिरवू लागली आहेत. त्याला भावही चांगला मिळू लागला आहे. आखात आणि युरोपच्या बाजारपेठेत अफगाणी डाळिंबांचे वर्चस्व असायचे, पण वरचेवर सोलापूर डाळिंबांना विदेशात मागणी वाढली असून, अफगाणी डाळिंबाच्या तुलनेत सरस ठरू लागली आहेत.
कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्यात असलेल्या सोलापूर जिल्ह्याने फळफळावळांचा जिल्हा म्हणून अलीकडे नाव कमावले असून, त्यातल्यात्यात डाळिंबामध्ये प्रगती केली आहे. सोलापूरचं कोरडं हवामान हे फळांच्या चवीसाठी अत्यंत पोषक असून, कमी पाण्यात सोलापूरचा शेतकरी फळांची लागवड करतो. सर्वच फळांचे भाव उतरल्याने शेतकरी चिंतेत असताना सोलापूरच्या डाळिंबाला स्थानिक बाजारपेठेत किलोला ५०० रुपये भाव मिळाल्याची बातमी वाचून बाजारपेठच अवाक् झाली, पण ते सत्य आहे. आकर्षक आकार, फळावरचा तजेलपणा, रंग आणि कसलाही डाग नाही. मालाची प्रतवारी केली तेव्हा त्या शेतकºयाला ९० ते ५०० रुपये दर मिळाला होता. याचाच अर्थ तुम्ही दर्जेदार मालाचे उत्पादन केले तर त्यासाठी खाणाºयांची व पैसे सोडणाºयांची वानवा नाही.
सोलापूरचे डाळिंबही त्यादिशेने वाटचाल करू लागले असून, या डाळिंबाला जी.आय. मानांकन मिळाल्याने जगात एक ओळख निर्माण झाली आहे. निर्यातक्षम मालाला भाव चांगला मिळतो, हे शेतकºयांना कळून चुकल्याने त्यांनीही दर्जेदार मालाचे उत्पादन करण्यासाठी पावले उचलली आहेत. डाळिंबाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असल्याने डाळिंबाचा प्रत्येक भाग हा उपयुक्त झाला आहे. येथील राष्टÑीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये डाळिंबापासून तयार होणारे उपपदार्थ याची सतत प्रात्यक्षिके दाखविली जातात. एवढेच नव्हे तर ज्यांच्याकडे मशिनरी नाही त्यांच्यासाठी मशिनरीही वापरायला दिली जाते. त्यामुळे डाळिंबाची लागवड वाढू लागली असून, निर्यातही वाढली आहे. वर्षाला ३० ते ३५ टनाची निर्यात आता ५० हजार टनांपर्यंत गेली आहे. स्थानिक बाजारपेठेत भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल होतात. पण निर्यातक्षम डाळिंबाचे भाव बघून तोंडात बोटे घातल्याशिवाय राहत नाहीत. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता २१ हजार टन, ४५ हजार टन व ५० हजार टन अशी निर्यात झाली आहे.
देशाच्या ९० टक्के डाळिंब हे महाराष्टÑात पिकतात आणि राज्याच्या ९० टक्के डाळिंब हे सोलापूर जिल्ह्यात पिकतात. म्हणूनच याला ‘सोलापूर डाळिंब’ असे जी.आय. मानांकन मिळाले आहे. तरीही एकूण उत्पादनाच्या केवळ १० टक्के डाळिंबे निर्यातक्षम उत्पादित होतात. आज प्रत्येक फळाला प्रदेशानुसार मानांकन मिळाले आहे, पण त्याची गुणवत्ता टिकवण्यात अन् निर्यातीमध्ये आगेकृूच करण्यात सोलापूर डाळिंबाने आघाडी घेतली आहे, असेच म्हणावे लागेल. दर्जेदार मालाला जगात मिळणारा चांगला दर पाहता शेतकºयांनाही आता दर्जेदार माल उत्पादित करण्याची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Solapur pomegranates worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.