क्षमा वीरस्य भूषणम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:03 AM2018-03-09T01:03:00+5:302018-03-09T01:03:00+5:30
विस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.
- प्रा. डॉ. संदीप ताटेवार
विस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.
जेव्हा आपण दु:ख पकडून ठेवतो तेव्हा ते आतल्या आत वाढत जाते व मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण करते. त्याचे पर्यवसान क्रोध, इर्षा, मत्सर, द्वेष अशा दुर्गुणांमध्ये होते व त्यामुळे आपली मानसिक स्थिती खालावते. सुडाची भावना आपल्याच शरीरावर दुष्परिणाम करते. क्षमा करण्याºया लोकांना क्रोध कमी प्रमाणात येतो व अपमानाचा अनिष्ट प्रभावसुद्धा कमी प्रमाणात प्रकृतीवर पडतो तसेच क्षमा करणारे लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी असतात. जेव्हा आपण मनात कसलीच जळमटं ठेवत नाही व मोठ्या मनाने दुसºयाला क्षमा करतो तेव्हा आपल्या मनात जमा झालेली नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात मोकळी होते. दु:ख पकडून ठेवल्यामुळे आपल्यात नकारात्मक विचारांची शृंखला चालू होते व आपल्या आत्मिक शक्तीचा ºहास होतो. क्षमा केल्यामुळे मनाला शांती मिळते व दु:ख पकडून ठेवल्यास नैराश्यता वाढते. म्हणूनच डॉ. रॉबर्ट एनाराईट या व्यक्तीने अमेरिकेत ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस डे’ हा दिवस आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जगभर साजरा केल्या जातो. महात्मा गांधी म्हणतात की कमजोर व्यक्ती कधीही क्षमा करू शकत नाही तर क्षमा करणे हा शक्तिशाली व्यक्तीचा गुण आहे. यामुळेच म्हणतात ‘क्षमा वीरस्य भूषणम’. संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’. श्रीमत भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की,
तेज: क्षमा धृती: शौचमद्रोहो नातिमानिता।
भविन्त सम्पंद दैवीमिभजातस्य भारत।।
हे अर्जुना, तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वत:विषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक क्षणी क्षमाशील असणे अत्यंत आवश्यक असते.