विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे?
By Meghana.dhoke | Published: August 25, 2023 07:53 AM2023-08-25T07:53:57+5:302023-08-25T07:54:21+5:30
'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी २०१७ मध्ये 'लोकमत'ने इस्रोची सफर केली. त्या प्रदीर्घ लेखातला संक्षिप्त भाग इस्रोच्या यशाचे रहस्य उलगडतो...
मेघना ढोके, संपादक, लोकमत सखी डॉट कॉम
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजे इस्रोच्या बंगळुरू आणि अहमदाबाद इथल्या आवारात फिरताना, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि तरुण अभियंत्यांशी बोलताना जाणवतं की, इसो हे एकूणच झपाटून टाकणारं प्रकरण आहे. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या अनेक संस्था लालफितीत काळवंडल्या असताना इस्रोला हे इतकं यश कसं मिळालं? काय आहे इस्रोची कार्यसंस्कृती? त्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली नंदिता हरिनाथ यांच्यापासून. मंगळ यान मोहिमेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वरिष्ठ वैज्ञानिक म्हणाल्या, 'हे स्पेस सायन्स आहे, इथं मी एकट्यानं अमुक केलं असं म्हणून काहीच उपयोग नाही, कारण ते तसं नसतंच. शेकडो माणसं एकाच प्रकारच्या अत्युत्तमतेने काम करतात म्हणून घडतं. माझं काम भी चोख करीन, एवढंच आमच्यापैकी प्रत्येकाला चांगले माहिती असतं. तुम्ही कधी आमच्या एखाद्या रिव्ह्यू कमिटीच्या मीटिंगला था, म्हणजे कळेल युद्ध कशाला म्हणतात!"
रिव्ह्यू मीटिंग किंवा रिव्ह्यू कमिटी हा शब्द इस्रोत श्वासागणिक कानावर पडतो. इसोमध्ये प्रत्येक प्रकल्पाचा एक रिव्ह्यू मेकॅनिझम आहे. प्रत्येक प्रकलप, त्यातल्या चुका, कुठल्या टप्प्यावर काय चुकल, कसे चुकलं, यश कशात होत या सगळ्याची अगदी तपशिलात नोंद ठेवली जाते. इस्रोच्या अध्यक्षांपासून अत्यंत ज्यूनिअर इंजिनिअरपर्यंत प्रत्येकाला चुकांचं हे रेकॉर्ड उपलब्ध असतं. चुकांची लाज इथे कुणी बाळगत नाही. इस्रोने कधीही आपल्या चुका लपवल्या नाहीत.
इस्रोच्या प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र प्रोजेक्ट असतात. सहकारीच अनेकदा एकमेकांचा प्रोजेक्ट रिव्ह्यू करतात. चुका सांगतात, धोके सांगतात. इस्रोमधले निवृत्त शास्त्रज्ञ रिव्ह्यूला येतात. विभागांतर्गत रिव्ह्यू झाला, की अन्य विभागांसमोर प्रोजेक्ट मांडून त्यावर चर्चा होते. एकमेकांचे मुद्दे खोडून काढले जातात. नवे मुद्दे, शक्यता मांडल्या जातात. या सगळ्यातून तावून सुलाखून प्रोजेक्ट मंजूर झाला की मग तो फायनल रिव्ह्यू कमिटीसमोर जातो. बारीकसारीक गोष्टी पुन्हा तपासल्या जातात. नंतर सर्व विभागप्रमुख, इस्रोचे अध्यक्ष रिव्ह्यू करतात आणि फायनल लाँचच्या वेळी पुन्हा एकदा रिव्ह्यू होतो तो वेगळाच. इथे येस सर संस्कृतीला थारा नाही. रिव्ह्यू मीटिंगमध्ये ज्युनिअर मोस्ट इंजिनिअर थेट इस्रोच्या अध्यक्षांना प्रकल्पातील चुका सांगू शकतो. अशा सांगण्याला प्रोत्साहन दिलं जातं. एकाच प्रकल्पावर देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी माणसं फक्त त्या प्रकल्पाच्या उत्तम कामासाठी एकमेकांवर तुटून पडतात. मीटिंग संपली की पुन्हा पुढच्या कामाकडे वळतात. चुकणं, अपयशी होणं हे काहीतरी भयंकर आहे, असं इस्रोमध्ये मानलं जात नाही. चुकलं म्हणून शिक्षा मिळणार असेल तर लोक त्याच त्या कामाच्या जिलब्याच करत बसत असतात. ते इस्रोमध्ये नको, हा संस्कार साराभाईनी रुजवला, जो या संस्थेने आजवर जपला आहे! मोहीम अपयशी झाली की काय चुकलं हे इस्रोमध्ये शोधतात, कोणी चूक केली; हे नाही!
वाद घालायचं, मोकळेपणानं बोलण्याचं स्वातंत्र्य इंजिनिअरपासून शिपायापर्यंत सर्वाना आहे. लोक काटेकोर नियोजन करून काम वेळेत पूर्ण करतात. लाँचिंग जवळ येत असलं तरी लोक आपलं काम ठरलेल्या वेळेत आपल्या शिफ्टमध्येच संपवतात. चोवीस तासांपैकी छत्तीस तास काम केलं अशी टिमकी इथं कुणी वाजवत नाही. आततायीपणा, ग्लॅमर, सनसनाटी वृत्ती किंवा ज्याला प्लेइंग फॉर पब्लिक गॅलरी म्हणतात ते इस्रो करत नाही.
इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ तपन मिश्र सांगत होते. 'आम्ही ज्यांना नोकऱ्या देतो, ते इंजिनिअर, देशभरातल्या कुठकुठल्या कॉलेजातून येतात! मी त्यांना गमतीनं फटीचर लोग म्हणतो. अगर परिवर्तन चाहिए तो, तो नई चीज करो एवढंच मी या मुलांना सांगतो. रॉकेट सायन्स बाहेरून फार आकर्षक, थरारक वाटतं, प्रत्यक्षात इथं तासन्तास एकच काम करावं लागतं, पुन्हा पुन्हा करावं लागतं. आपलं काम स्पेस क्वालिफाइड करण्यासाठी जिवाचे रान करावं लागतं आणि त्या बदल्यात पैसेही तसे जेमतेमच मिळतात.'
इस्रोच्या अनेक कार्यालयांत फिरताना एक जाणवतं, ही संस्था माणसांना झपाटून टाकते! निवृत्तांनाही पुन्हा सामावून घेतलं जातं, नवीन काही करताना त्यांचे अनुभव ऐकून घेतले जातात. वय वाढलं म्हणून माणसांना कुणी मोडीत काढत नाही.
बंगळुरूच्या आयसॅकमध्ये भारतानं केलेल्या अंतराळ मोहिमांचं एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. आर्यभट्ट ते मंगळ यान आणि पीएसएलव्ही, जीएसएलव्ही रॉकेट लाँचरची अनेक रूपं इथं पाहायला मिळतात. त्या प्रदर्शनात माहिती देणारे पासष्टी उलटून गेलेले कोटमप्पा भेटले. ते इस्रोमध्ये सेवक होते. निवृत्तीनंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून या प्रदर्शनाचे गाइड म्हणून रुजू झाले अगदी मनापासून, अभिमानानं ते एकेका मोहिमेची माहिती सांगतात, बोलता बोलता म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांत मी इस्रोत आलो नाही असे फार कमी दिवस असतीला माझा श्वास चालू असे तोपर्यंत मी येणारचा इस्रोतून निघताना आठवत राहिला तो इसीचे पीआरजी देवीप्रसाद कर्णिक यांच्या दालनातला एक बोर्ड त्यावर लिहिले होते: 'युअर सर्च फॉर एक्सलन्स एण्ड्स हिअर!'
meghana.dhoke@lokmat.com