शहाण्यासुरत्या माणसांनी दंगलीत काय करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 11:12 AM2023-06-14T11:12:12+5:302023-06-14T11:13:56+5:30

तात्कालिक कारणांवरून दुपाची आग लागते, लावली जाते तेव्हा डोकं ठिकाणावर असलेल्या शहाण्या, समंजस माणसांनी काय भूमिका घ्यावी?

Special article on what should wise men do in a riot | शहाण्यासुरत्या माणसांनी दंगलीत काय करावे?

शहाण्यासुरत्या माणसांनी दंगलीत काय करावे?

googlenewsNext

मिलिंद यादव, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर

दुनिया में ढूंढकर भी एक हिंदू ऐसा नहीं मिल सकता जिसके चार मुसलमान दोस्त ना हो. और एक मुसलमान ऐसा नही मिल सकता जिसके पंधरा- बीस हिंदू दोस्त ना हो फिर ये क्या बात हुई? -

की जब चार हिंदू एक साथ बैठते है
तो वो हिंदू हो जाते है
चार मुसलमान एक साथ बैठते है
तो वो मुसलमान हो जाते है..?

कैफी आजमींची ही कविता आठवण्यामागचं कारण, गेल्या चार-सहा दिवसांपूर्वी छत्रपती शाहू राजांच्या कोल्हापुरात घडलेली दंगल एकत्र येतो काय, काही कळायच्या आत सामाजिक अचानक प्रचंड संख्येने तरुणांचा जमाव एका विशिष्ट धर्माच्या लोकांचे व्यवसाय, घर उद्ध्वस्त केली जातात काय... या दंगलीनंतर शहरामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार होणं स्वाभाविकच होतं. घरात, कट्ट्यावर तरुणांच्या गटागटात चर्चा उसळल्या होत्या. शहरात सर्वत्र भरून राहिलेला द्वेष अगदी श्वासात जाणवेल एवढा तीव्र होता.

दंगल अचानकपणे उद्भवली की पूर्वनियोजित होती? घडली की घडवली? त्या अमक्यानं तसा स्टेटस ठेवलाच का? मग तो देशद्रोही नाही का?.. हे असले सगळे प्रश्न काही काळानंतर विस्मृतीत जातील, हे नक्की आन आपल्या आजूबाजूला हे असं का घडतं, हे न समजण्या इतपत सर्वसामान्य माणसं दूधखुळी नसतात. यासाठी काय करावं? खरंतर अशाप्रसंगी खरा प्रश्न हा आहे की, काही तात्कालिक कारणांवरून ही अशी देवाची आग लागते, लावली जाते तेव्हा डोकं ठिकाणावर असलेल्या शहाण्यासुरत्या, समंजस माणसांनी काय भूमिका घ्यावी? समाजात सौहार्द, सामाजिक सलोखा अबाधित राहील, चांगलं. वाईट कळूनसुद्धा लोक योग्य भूमिका जाहीरपणे घ्यायला घाबरतात. कशाला घाबरतो आपण? वाईटाला विरोध करायला? वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत नसेल तर किमान वाईटाला चांगलं कार्यकर्ते. तरी म्हणू नये, एवढं तरी करता येतंयच की! न्हापूर खरं म्हणजे अशावेळी कोणाला काही म्हणण्याची गरजच नसते मुळी. समाजात शांतता नांदावी म्हणून आपण कोण कसा चुकीचा आहे. अशी एकमेकांकडे बोट दाखवू लागलो तर, चूक करणारा सुधारण्याऐवजी जास्तच चुका करू लागतो!

कोणत्याही दंगलीनंतर काही काळानंतर समाजातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होतात. दंगलीचे खरे ठसे उमटतात ते मनावर. एक उदाहरण सांगतो. परवाच्या दंगलीत, एका दुकानावर आणि त्या दुकानाच्याच वर असलेल्या दुकान मालकाच्या घरावर प्रचंड दगडफेक सुरू होती. घरमालक आजारी पत्नीला दवाखान्यात भरती करायला घेऊन गेला होता. घरात त्याच्या फक्त दोन मुली होत्या. एक इयत्ता तिसरीत शिकणारी, दुसरी सातवीत. दोघीही जीव मुठीत घेऊन, घरावर पडणाऱ्या दगडांचे आवाज ऐकत एकमेकींना बिलगून पलंगाखाली रडत लपल्या होत्या. सुदैवाने घराचं दार आतून बंद होतं. काही काळाने वडील घरी आले. आता तर आईही दवाखान्यातले उपचार संपवून घरी परतली. पण त्या दोन चिमुरड्यांनी जे सोसलं, अनुभवलं त्याचं काय?.. अशा अनेक मनांवर जे परिणाम होतात, त्यांचं आपण काय करणार आहोत? दंगली शमतात आणि मग कोणाच्यातरी दबावाला,

प्रलोभनाला उचकावण्याला, भूलथापांना बळी पडून या दंगलीत सामील झालेल्या मुलांची धरपकड सुरू होते. चार दिवस तुरुंगाचा सासुरवास घडतो. या सासुरवासात त्यांना कोण सज्जन भेटणार? - भेटणार ते समाजकंटकचा या असल्या ओळखीतून हाताला काम नसलेल्या त्या तरुण पोरांना कुठली दिशा मिळणार? - अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे.

स्टेटस लावणाऱ्याने स्टेटस लावला, दगड मारणाऱ्यांनी दगड भिरकावले... हे दगड भिरकावणारे हात अवघ्या वीस ते तीस वयोगटातील आहेत. ज्याने वादग्रस्त स्टेटस लावला तो पोर तर फक्त बारा वर्षाचा आहे। या मुलांना जवळ घेऊन, समजून घेऊन शहाणं करण्याचा मार्ग खरंच एवढा कठीण असेल का? उलट त्यांना दोष देऊन शिव्याच घालायच्या ठरवल्या तर या मुलांचे हात अधिकच हिंसक होतील... आणि हिंसेला हिंसा हेच उत्तर कसं असेल?

प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात प्रगत यंत्र आली असली तरी, करवीर नगरीतल्या मुलांच्या मनात शाहू राजाचे विचार रुजवायला आम्ही कमी पडलो, हेच खरं. जिथे असे विचार रुजले, तिथे कृती झाली. दंगलीचे वर्तमानपत्रातील फोटो पाहताना १९८२ मधील माझा वर्गमित्र इकबालची कप-बशीची हातगाडी उलटवलेली दिसली. गाडीवरील सर्व काचसामानाचा चक्काचूर झाला होता. त्याक्षणी ठरवलं, इकवालचा व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात हातभार लावायचा. प्रयत्नांती त्याचा व्यवसाय सुरूही झाला. विशेष म्हणजे त्याची मोडलेली हातगाडी दुरुस्त करणारा एक हिंदूच होता. कष्टणाऱ्यांचा धर्म शेवटी एकच तर असतो... पोटासाठी राबणारा माणूसा

मागच्या पिढीची जबाबदारी असते पुढच्या पिढीला शहाणं करण्याची. या मुलांना सांगायला हवं की, सगळेच जातात त्या दिशेला जाणं, चुकीच्या गोष्टी गपगुमान ऐकणं यात तात्कालिक फायदे दिसतात खरे, पण त्याने आपले आणि देशाचं भविष्य बिघडतं.

हे फक्त सागायला हवं आहे. मुल ऐकतील!

Web Title: Special article on what should wise men do in a riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.