शेतकऱ्यांचा कैवारी अन् शांतिदूत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 12:56 PM2024-08-18T12:56:27+5:302024-08-18T12:56:50+5:30

जर शेतकरी सुखी नसतील तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आपण शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात,” असे जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी अत्यंत चिंतेने सांगितले.

Sri Sri Ravi Shankar : Farmers' kaivari and peace messenger... | शेतकऱ्यांचा कैवारी अन् शांतिदूत...

शेतकऱ्यांचा कैवारी अन् शांतिदूत...

“जर शेतकरी सुखी नसतील तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आपण शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात,” असे जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर अत्यंत चिंतेने सांगतात. गुरूदेव यांचे योगदान केवळ राज्याला जल-सकारात्मक आणि शेतीला फायदेशीर आणि सुरक्षित बनवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यापलीकडे मोफत सर्वांगीण शिक्षण, नदी स्रोतांचे पुनरुज्जीवन यासह पर्यावरण संवर्धन, वनीकरण, तुरुंग पुनर्वसन आणि ग्रामीण युवकांचे सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. 

‘माझ्या विहिरीत पाणी आहे!’ महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यातील वरुड गावातील शेतकरी, ४२ वर्षीय बाबा साहेब लोमटे आनंदाने सांगतात. लोमटे हे पाण्याअभावी वर्षातील सहा महिने शेती करायचे आणि उर्वरित वर्ष मुंबईत मजूर म्हणून काम करायचे. वर्षानुवर्षे, हवामानाचा अंदाज न आल्याने आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे त्यांचे पीक उत्पादन हळूहळू कमी होत गेले. प्रदेशातील शेतकऱ्यांनी अनियमित पावसाळा आणि हवामानाच्या तीव्रतेशी संघर्ष केला होत. भूजल पातळी खालावल्याने त्यांच्या पीक उत्पादनावर थेट परिणाम झाला. “जर शेतकरी सुखी नसतील तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आपण शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात,” असे जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी अत्यंत चिंतेने सांगितले. या भागातील लोमटेसारख्या हजारो शेतकऱ्यांसाठी परिस्थिती बदलत आहे, गुरुदेवांनी केलेल्या कार्यामुळे. गुरुदेवांनी जलतारा प्रकल्पाची, तसेच शेतकऱ्यांना हळूहळू रासायनिक शेतीपासून दूर जाण्याची प्रेरणा दिली आहे.

जलसमृद्ध बनवून शेतकरी विकासाचे उद्दिष्ट
भारताला जल-सकारात्मक बनवण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भूजल वाढवण्यासाठी एक परिसंस्था निर्माण करून साधे रिचार्ज स्ट्रक्चर्स तयार करून पावसाचे पाणी साठवणे  आणि अधिक पाणी उपलब्ध करण्यासाठी पृथ्वीला स्पंजमध्ये बदलणे, हे काम त्यातून करण्यात येणार आहे.
लोमटे यांनी त्यांच्या १६ एकर शेतीत पुनर्भरणाचे ४ खड्डे बांधले. पुरेशा पावसाने रिचार्ज खड्ड्यांमध्ये पाणी साचले, त्यांच्या बोअरवेलला संपूर्ण वर्ष पुरेल इतके पाणी आले. प्रकल्पाअंतर्गत, केवळ २ वर्षांत १४० गावांमध्ये ४६,००० जलतारा पुनर्भरण संरचना बांधण्यात आल्या आहेत, ज्याचा लाखो लोकांना फायदा झाला आहे.
महाराष्ट्र सरकारसोबत नुकत्याच स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत, हजारो शेतकऱ्यांना आता महाराष्ट्रात १.३ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या पर्यावरणीय प्रयत्नांमध्ये ७० नद्या आणि हजारो जलस्रोतांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे. 

शांततेसाठी गुरुदेवांच्या भूमिकेचा सारांश
गुरुदेवांनी १९८२ मध्ये त्यांच्याद्वारे शोधलेली  सुदर्शन क्रिया, ध्यान, समुपदेशन, व्यावहारिक शहाणपण आणि योग यांसारख्या विज्ञान-समर्थित श्वासोच्छ्वासाचे तंत्र ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये शिकवलेल्या सर्वसमावेशक कार्यक्रमात विणले आहे. कोलंबिया, मंगोलिया, पॅराग्वे आणि सूरीनाममधील सर्वोच्च नागरी सन्मानांसह त्यांच्या मानवतावादासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महात्मा गांधी आणि डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाचा प्रसार केल्याबद्दल त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये गांधी शांती तीर्थक्षेत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इराकचे माजी पंतप्रधान, नूरी अल-मलिकी म्हणाले की, “जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात गुरुदेवांच्या भूमिकेचा सारांश आहे.’’

मध्यस्थीचा विश्वासू आवाज
गुरुदेव यांनी ईशान्येकडील सात राज्यांमधील ६७ प्रमुख बंडखोर गटांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. या गटांनी सलोखा आणि विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी गुवाहाटी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यांनी एफ.ए.आर.सी. बंडखोरांना अहिंसेच्या पद्धतीबद्दल पटवून देऊन ५२ वर्षे जुने कोलंबियन गृहयुद्ध संपवले. ५०० वर्षे जुना अयोध्या वाद सौहार्द्रपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी गुरुदेवांचा आवाज हा मध्यस्थीचा सर्वांत विश्वासू आवाज होता. 

कार्याला नाही मर्यादा
जलतारा प्रकल्पाद्वारे मंगला पंडगे यांनी केवळ सात महिन्यांत शेवग्याचे ३.६ लाख रुपयांचे उत्पादन फक्त  ५,००० रुपये खर्चातून काढले. लातूरचे शेतकरी अमृत गम्पले यांनी केवळ ०.५ एकर जमिनीतून १ टन गव्हाचे उत्पादन घेतले. गुरुदेव यांचे योगदान केवळ राज्याला जल-सकारात्मक आणि शेतीला फायदेशीर आणि सुरक्षित बनवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यापलीकडे मोफत सर्वांगीण शिक्षण, नदी स्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यावरण संवर्धन, वनीकरण आदींपर्यंत विस्तारलेले आहे. 

उद्या, १९ ऑगस्ट रोजी जागतिक मानवतावादी दिन. त्यानिमित्त...
महाराष्ट्रात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’... ७,२८,००० झाडे लावली गेली. ४६,००० रिचार्ज स्ट्रक्चर्स बांधली गेली. २,८९,९९० ग्रामीण युवकांना प्रशिक्षण. ११,२७९ कैद्यांना पुनर्वसनाचा लाभ. १० आर्ट ऑफ लिव्हिंग मोफत शाळा.

Web Title: Sri Sri Ravi Shankar : Farmers' kaivari and peace messenger...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.