प्रयोग सुरू... निष्कर्ष कधी ?

By admin | Published: December 27, 2015 01:33 AM2015-12-27T01:33:59+5:302015-12-27T01:33:59+5:30

गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून सध्या निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. हे प्रयोग करताना

Start the experiment ... When did the conclusions? | प्रयोग सुरू... निष्कर्ष कधी ?

प्रयोग सुरू... निष्कर्ष कधी ?

Next

प्रासंगिक : सुशांत मोरे

गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून सध्या निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. हे प्रयोग करताना रेल्वेबरोबरच प्रवाशांची मात्र चांगलीच कसोटी लागते. रेल्वेकडून गेल्या काही महिन्यांपासून स्वयंचलित दरवाजा लोकलचा प्रयोग केल्यानंतर, आता मेट्रोसारखी आसने बनवून प्रवास सुकर करणारा प्रयोगही केला जात आहे. त्याचप्रमाणे, आणखी काही प्रयोगही करण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून विचार होत असून, हे प्रयोग कितपत यशस्वी होतील, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

भावेश नकाते या प्रवाशाचा सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. या अपघाताचे मोबाइल चित्रीकरण सर्वत्र पसरल्यानंतर आणि प्रसारमाध्यमांनी याबाबतची माहिती समोर आणल्यानंतर, प्रवासी संघटनांसह खासदारांनी त्वरित मध्य रेल्वेचे मुख्यालय गाठले आणि यावर उपाय करण्याची मागणी केली. त्यानंतर खासदारांनी दिल्ली गाठून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे लोकल अपघातांचे गाऱ्हाणे मांडले. यावर रेल्वेमंत्र्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला त्वरित आदेश देत, स्वतंत्रपणे एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार रेल्वे अधिकारी, खासदार, प्रवासी संघटना, स्वयंसेवी संस्थांचा यात समावेश करण्यात आला आणि यातून प्रवाशांवर पुन्हा एकदा नवे प्रयोग होणार हे निश्चित झाले.
गर्दीमुळे लोकलमधून पडून अनेक प्रवाशांचे अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्याने, पश्चिम रेल्वेवर मार्च २0१५ रोजी स्वयंचलित दरवाजा लोकलचा पहिला प्रयोग करण्यात आला. एका लोकलच्या फर्स्ट क्लास महिला डब्यावर प्रयोग करताना रेल्वेची आणि प्रवाशांची चांगलीच कसोटी लागली. अनेक निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या आणि प्रवाशांच्या तक्रारी, यामुळे हा प्रयोग रेल्वेकडून बंद करण्यात आला. अशाच प्रकारचा दुसरा प्रयोग करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून तयारी केली जात आहे. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे, परंतु स्वयंचलित दरवाजा लोकल चालवल्यास, त्यातील वेंटिलेशन आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी रेल्वेला चांगलीच कसरत करावी लागेल.
आता दुसरा प्रयोग करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यात लोकल डब्यातील प्रवाशांची क्षमता वाढविल्यास गर्दी आटोक्यात राहील आणि त्यामुळे अपघात होणार नाही, असा दावा केला जात आहे. यासाठी एका लोकलमधील पाच डब्यांमध्ये असलेली आसन व्यवस्थाच रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आली. चौथा डबा हा मेट्रोच्या आसन व्यवस्थेप्रमाणे करतानाच, अन्य चार डब्यांतील दरवाज्याकडील प्रत्येकी एक आसन काढून टाकण्यात आले. या प्रयोगामुळे जास्तीत जास्त प्रवाशांचा प्रवास हा उभ्यानेच होणार हे मात्र निश्चित आहे. यापूर्वीही रेल्वेकडून छुप्या पद्धतीने हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, त्याला खुद्द प्रवाशांकडूनच विरोध झाल्यानंतर प्रयोग थांबविण्यात आला. भावेश नकातेच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आसन व्यवस्थेतील बदलाचा प्रयोग करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र, हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, हा प्रश्नच आहे. लोकल सीएसटी ते अंबरनाथ, बदलापूर दरम्यान चालवल्यास मोठ्या संख्येने प्रवाशांचा प्रवास उभ्यानेच होऊ शकतो. त्यामुळे या दुसऱ्या प्रयोगाला विरोध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही मध्य रेल्वेकडून आसन व्यवस्थेत बदल करणारी दुसरी लोकल बनवण्यावर भर दिला जात आहे. याबाबत खुद्द काही रेल्वे अधिकाऱ्यांमध्येच मतभिन्नता जाणवते. आसन व्यवस्थेत जरी बदल केला, तरी प्रवाशांची क्षमता वाढू शकते. मात्र, गर्दी ही होतच राहणार आणि लटकणारे प्रवासी लटकत राहणार, असे रेल्वे अधिकारीच सांगतात. मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला जवळपास ४0 ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे मार्गावरही जवळपास ३५ लाख प्रवासी असून, दोन्ही मार्गांवर हे प्रवासी वाढतच जात आहेत. त्यामुळे लोकलला होणारी ही गर्दी आटोक्यात येणार तरी कशी, असा प्रश्न रेल्वे प्रशासनालाच पडला आहे.

प्रवास उभ्यानेच
भावेश नकातेच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आसन व्यवस्थेतील बदलाचा प्रयोग करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र, हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, हा प्रश्नच आहे. लोकल सीएसटी ते अंबरनाथ, बदलापूर दरम्यान चालवल्यास मोठ्या संख्येने प्रवाशांचा प्रवास उभ्यानेच होऊ शकतो. त्यामुळे या दुसऱ्या प्रयोगाला विरोध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही मध्य रेल्वेकडून आसन व्यवस्थेत बदल करणारी दुसरी लोकल बनवण्यावर भर दिला जात आहे.

अपघात रोखण्यासाठी होणार प्रयत्न
कल्याणपासून सीएसटीपर्यंत धावणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाड्यांमधून लोकल प्रवाशांना मुभा देण्यासाठी प्रस्ताव. जास्तीत जास्त लोकल फेऱ्या चालवण्यास मध्य व पश्चिम रेल्वेचा प्रयत्न.
छोट्या अंतरावरील लोकल फेऱ्यांचा विस्तार वाढवण्याचा निर्णय. मध्य रेल्वेकडून जास्तीत जास्त पंधरा डबा लोकल चालवण्याचा विचार.
सीएसटी ते कल्याण, सीएसटी-पनवेल फास्ट कॉरीडोर, पश्चिम रेल्वेवरील विरारपर्यंतचा एलिव्हेटेड प्रकल्पाचे नियोजन करण्यावर भर.

Web Title: Start the experiment ... When did the conclusions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.