गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची

By संदीप प्रधान | Published: May 9, 2018 12:06 AM2018-05-09T00:06:44+5:302018-05-09T00:06:44+5:30

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहेत, त्या टाळण्याकरिता मी इथं आलोय.

 The story is about silence | गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची

गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची

googlenewsNext

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहेत, त्या टाळण्याकरिता मी इथं आलोय. स्वागतिकेचा चेहरा (रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दिवसभर बौद्धिक ऐकल्यावर होतो तसा) लांब झाला. चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह घेऊन ती अमित शहा यांच्याकडे गेली. अमितभाई, बाहेर कुणीतरी डॉ. विश्वामित्र आलेत. ते भलतेच काहीतरी बडबडत आहेत. मला काही समजत नाही. त्यांना तुमच्याकडे पाठवू का? अमितभार्इंनी आपले टक्कल कराकरा खाजवले. चेहरा वेडावाकडा केला. स्वागतिकेला न बोलताच इशारा मिळाला. मात्र, तोवर बाहेर सुरक्षारक्षकांचा गलका ऐकू आला आणि दरवाजातून डॉ. विश्वामित्र चक्क आत घुसले. अखेर, मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो तर... विश्वामित्र हसत पुटपुटले. शहांनी खिशातून रुमाल काढून घाम पुसला. लक्ष्यापर्यंत पोहोचलो म्हणजे, काय म्हणायचे काय आहे तुम्हाला? शहांनी संशयाने पाहत प्रश्न केला. घाबरू नका. आपण सारे त्या नियतीदेवीची मुलं आहोत. तिच्या हातातील कळसूत्री बाहुल्या. अमितभाई, तुम्ही मागच्या जन्मात एका पक्षाचे प्रमुख होतात आणि चक्क स्त्री होतात. (अमितभाई सुटलेले पोट दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवतात) आपले पंतप्रधान नरेंद्रभाई हे मागच्या जन्मातही पंतप्रधान होते. मात्र, मागच्या जन्मात ते कुशाग्र बुद्धीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या जन्मात ज्या ज्या घटना घडल्या, त्या त्या घटना तशातशा पुन्हा घडू लागल्या आहेत. म्हणजे... अमितभार्इंनी घोगºया आवाजात प्रश्न केला. वेट वेट माय बॉय. इतकी घाई करू नको. गोष्ट फार गुंतागुंतीची आहे. त्यावेळी एका मुलीची काही नराधमांनी बलात्कार करून हत्या केली होती. समाजमन बिथरले होते. वारूळ फुटल्यानं मुंग्या सैरावैरा पळाव्या व त्यांनी डंख मारण्याकरिता त्वेषानं चाल करावी, तसं घडलं होतं. आताही एक कोवळ्या निष्पाप जीवाच्या बाबतीत तेच घडलं. मेणबत्ती मोर्चे निघाले. सोशल मीडियावर संतापानं काहिली झाली. त्या जन्मात काही दिग्विजयी मंडळींच्या वक्तव्यानं काहूर माजलं होतं. आता तर वाचाळवीरांनी कहर केलाय. नारद काय, गणपतीची प्लास्टिक सर्जरी काय, सापेक्षतावादाचा सिद्धांत काय, त्यावेळी पंतप्रधान एक शब्द बोलले असते, तर पुढचे सारे घडायचे टळले असते. मी खूप प्रयत्न केला. आताही तेच, अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन आणि शौचालये, सफाई, डिजिटलायझेशन, सॅनिटरी नॅपकीन यावर अखंड बडबड. पण, हे तुम्ही थांबवू शकता. अमितभार्इंनी ‘कसे काय’, असा चाचरत प्रश्न केला. फक्त एकदा तुम्ही नरेंद्रभार्इंकडे जा आणि त्यांना म्हणा की, नोटाबंदी, रोहित वेमुला, कठुआ, नीरव मोदी, राफेल डील आणि जय शहाबद्दल बोला. मौन संपवा. आता अमितभाई लालबुंद झाले. त्यांनी डॉ. विश्वामित्राच्या बखोटीला धरून त्याला केबिनबाहेर आणले आणि ‘पागल कही का’, असं जोरात किंचाळले. क्षणार्धात डॉक्टरची दाढी, मिशा व केसांचा विग कार्यकर्त्यांच्या हाती लागला. तो वैफल्यग्रस्त भक्त असल्याचे उघड झाले. 

Web Title:  The story is about silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.