मराठवाड्यात नेत्यांना धक्के

By सुधीर महाजन | Published: October 11, 2017 01:06 AM2017-10-11T01:06:24+5:302017-10-11T01:07:24+5:30

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात.

 Strike the leaders in Marathwada | मराठवाड्यात नेत्यांना धक्के

मराठवाड्यात नेत्यांना धक्के

googlenewsNext

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या दाव्याकडे गंभीरपणे पाहिले तर त्यांनी गावपातळीवर सत्तेत शिरकाव करणे साहजिक आहे; पण या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती असे स्पष्ट चित्र नाही. मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद वगळता सात जिल्ह्यातील १७७३ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. उस्मानाबादेतील १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसºया टप्प्यात आहेत. दावे प्रतिदावे काहीही असले तरी प्रमुख नेत्यांच्या बाबतीत धक्का देणाºया गोष्टी घडल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवखेडा हे भोकरदन तालुक्यातील गाव ते भाजपकडे असणे साहजिक आहे पण येथे भाजपचीच तीन पॅनल्स एकमेकांच्या विरोधात लढत होती. कोणतेही जिंकले तरी ते दानवेंचेच असणार. अशा अडचणीच्या वेळी नेते मंडळी सर्वांनाच आशीर्वाद देतात. बीडमध्ये भाऊबंदकी जोरावर आहे. मुंडे-क्षीरसागर दोघेही त्रस्त आहेत. मुंडे भावंडामध्ये येथेही वरचढ ठरले. गोपीनाथगड असलेली पांगरीची ग्रामपंचायत त्यांच्या समर्थकांनी जिंकली. तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांची नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पळविली.
लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यांच्या तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेता आल्या नाहीत. येथे काँग्रेस वरचढ ठरली. दापका, अंबुलगा या ग्रामपंचायती त्यांच्या हातून निसटल्या. परभणीत तर ग्रामपंचायतींचा कौल सत्ताधाºयांच्या विरोधात गेला. माजी खासदार गणेश दूधगावकर यांना दूधगावातील ग्रामपंचायत गमवावी लागली आणि पुतण्या दिलीप हा पराभूत झाला. नांदेडमध्ये शिवसेनेचा जोर कायम होता. तर हिंगोलीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली. औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जनतेतून थेट निवडून येणारा सरपंच त्यामुळे त्याला अधिकारही जास्त. दीड वर्षांनंतर होणाºया लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपला आपले बस्तान बसवता आले नाही; पण आता उद्या होणाºया महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोर लावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का देण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर तळ ठोकून आहेत. दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. नांदेड जिल्ह्यात भाजप अजून स्थिर होऊ शकलेला नाही. तेथे काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रभाव असल्याने महापालिका निवडणुकीसाठी भाजपने येथे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना गळास लावले. चिखलीकरांनी आपले साथीदार भाजपमध्ये पाठविले. आणि उघडपणे भाजपचा प्रचार केला. किंबहुना या निवडणुकीचे नेतृत्व केले; पण ग्रामपंचायत निवडणुकीत लाभ भाजपला मिळाला नाही. उद्या होणाºया महापालिका निवडणुकीत त्यांची भाजपसाठीची उपयुक्तता स्पष्ट होईल. शिवाय या निकालाचे दूरगामी परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर होतील.
 sudhir.mahajan@lokmat.com  

Web Title:  Strike the leaders in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.