सुमतिं चमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:01 AM2018-04-25T00:01:40+5:302018-04-25T00:01:40+5:30

आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे

Sumati mum | सुमतिं चमे

सुमतिं चमे

Next


डॉ. गोविंद काळे।
एरवी आपण देहाचे नुसतेच मालक़ मालकाला आतली यंत्रणा, कशी काय चालते याची तर कवडीचीही माहिती असत नाही़ स्वत:चे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव लावून देहाचा मालक म्हणून जन्मभर स्वपरिचय देत असतो़ मनाचा शोध लागत नाही नि बुद्धीचे माहात्म्य आयुष्यभर उमगत नाही़ मनुष्य हा बुद्धिमान प्राणी म्हणून मिरवत असतो़ ईश्वर सुद्धा हल्ली मनुष्य नावाच्या बुद्धीप्राण्याला वचकून असतो़ आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे हे तर आपल्या पूर्वजांचे निक्षून सांगणे होते़ ‘नमस्ते व्यास विशालबुद्धे’ बुद्धीचा एकमेव मापदंड म्हणजे महर्षी व्यास. न्यूटन आणि आईनस्टाईनला कुणी विशालबुद्धीचे म्हटल्याचे आमच्या तरी ऐकिवात नाही़ ‘बुद्धि: कर्मानुसारिणी’ म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या कृत्यानुसार ह्या जन्मी बुद्धी कार्य करीत राहते़ गतजन्म आठवणार कुणाला हो? आणि पुनर्जन्मावर विश्वास तरी कोण ठेवणार? काय साधून घ्यायचे आहे ते आत्ताच़ उद्या कुणी पाहिला आहे़
मंत्रदृष्ट्या ऋषींचे ज्ञान अगाध होते़ त्यामुळेच तर त्यांनी ‘मतिं च मे सुमतिं चमे’ अशी प्रार्थना केली आहे़ मागणी केली आहे़ बुद्धीपुरते मर्यादित राहता आले असते परंतु वेगळी सुबुद्धीची मागणी ऋषींची आहे़ कारण बुद्धिमान माणसेही मोठमोठ्या चुका करतात़ प्रमाणपत्र मिळते ‘त्या वेळी त्याची बुद्धी कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे?’ बुद्धी असून ही परिस्थिती उद्भवते़ हेच कृत्य करायचे होते तऱ़.च्या जन्माला का नाही गेलास़
अरे! तू माणूस ना? बुद्धी नव्हे तर माणसाकडे सुबुद्धी असली पाहिजे़ घरातील बालक सायंकाळी शुभं करोति झाल्यावर आजोबांच्या पाया पडते तेव्हा ते एवढेच म्हणतात़ ‘सद्बुद्धी देरे बाबा माझ्या नातवाला आणि कल्याण कऱ’ बुद्धी ही न्युट्रल आहे. ती पापाकडे, दुराचाराकडे वळली की पापबुद्धी होते़ समर्थांना लिहावे लागले ‘मना वासना पाप बुद्धी नको रे!’ पन्नासाव्या मजल्यावरून बादलीभर पाणी क्षणार्धात खाली ओतता येते़ वरती चढवायचे झाले तर मात्र पंप लावावा लागतो. तरच पाणी चढते़ जीवन सुसह्य होते़
हे तर व्यवहारातील गणित आहे़ पंपाच्या माध्यमाने वर जाण्याचे गणित सुटते़ पंप हा एक संस्कार आहे़ मानवी जीवनाला संस्कारच घडवू शकतात, वाचवू शकतात म्हणून सुमती/सुबुद्धी़ ‘मतिं च मे सुमतिं चमे’ ही झाली
पाहिजे प्रार्थना़ विष्णुसहस्रनाम
सांगते ‘नाशुभामति:’ / अशुभ बुद्धी देऊ नको़

Web Title: Sumati mum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.