सुशीलकुमार शिंदे ही निव्वळ व्यक्ती नव्हे, तर समाजाची संपत्ती !

By राजा माने | Published: September 4, 2017 11:17 AM2017-09-04T11:17:09+5:302017-09-04T11:21:22+5:30

काही काही माणसं आपल्याला मनापासून का आवडतात,या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ! त्या माणसाला आपण आवडत असू का ? अशा तकलादू प्रश्नांच्याही फंदात मन पडत नाही. पण त्या माणसाच्या सदैव प्रेमात राहावे असेच मन म्हणत राहते. अशी व्यक्ती म्हणजे सुशीलकुमारजी !

Sushilkumar Shinde is not a net person, but a wealth of society! | सुशीलकुमार शिंदे ही निव्वळ व्यक्ती नव्हे, तर समाजाची संपत्ती !

सुशीलकुमार शिंदे ही निव्वळ व्यक्ती नव्हे, तर समाजाची संपत्ती !

Next

काही काही माणसं आपल्याला मनापासून का आवडतात,या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ! त्या माणसाला आपण आवडत असू का ? अशा तकलादू प्रश्नांच्याही फंदात मन पडत नाही. पण त्या माणसाच्या सदैव प्रेमात राहावे असेच मन म्हणत राहते. अशी व्यक्ती म्हणजे सुशीलकुमारजी ! मी शाळकरी असताना आमच्या बार्शीच्या जवाहर हॉस्पिटलच्या प्रांगणात कुठला तरी कार्यक्रम होता. तो कार्यक्रम मी हॉस्पिटल परिसरातल्या एका झाडाच्या बुंध्यावर बसून बघितला होता. त्या कार्यक्रमात काहीशा तलवार कटच्या पीळदार मिशा अन् कपाळावर काही जुल्फे असलेल्या हसमुख, रुबाबदार राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जीवनात पहिल्यांदा पाहिले. त्यावेळी आपल्या जीवनात कधी तरी या माणसाशी फक्त भेटच होणार नाही तर आपली चांगली नाळही जुळणार आहे,असं कधी स्वप्नातही नव्हतं. पण माझं भाग्य बघा तसंच घडलं ! या माणसाला मी मंत्री म्हणून पाहिलं, मुखमंत्री म्हणून पाहिलं, राष्ट्रीय नेता म्हणून पाहिलं, कलाकारांच्या सहवासात रमणारा आणि काव्य मैफिली सजवणारा साहित्यप्रेमी म्हणून पाहिलं,गरिबीतल्या दोस्तांच्या कुटुंबात रमून जाताना पाहिलं, " हन्सो का जोडा " मुख्यमंत्रिपदाची शर्यत चालू असतानाही जोडा अलग न होवू देणारा एक मित्र म्हणून पाहिलं, मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिल्यानंतर आम्ही मध्यमवर्गीय घर बदलल्या नंतर सामानाची जशी " बांधा-बांधी" करतो तशीच "वर्षा" बंगल्यावर पुस्तकांची बांधा-बांधी करणारा आंध्र प्रदेशचा भावी राज्यपाल म्हणून पाहिलं,संसदेतील सर्वोच्च पदावर पोहोचूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेला पराभूत नेता म्हणून पाहिलं. कित्ती कित्ती म्हणून सांगावं? अशा असंख्य रुपात मी त्यांना पहिलं. पण मला भावला तो त्यांच्यातील  संवेदनशील "सच्चा हळवा माणूस" ! दिल्ली असो वा गल्ली सुशीलकुमारांनी त्यांच्यातल्या त्या सच्चा हळव्या माणसाला कधीही हरवू दिले नाही,उलट दिवसागणिक अधिक सशक्त आणि मजबूतच बनवलं ! त्यामुळेच त्यांच्यातील सहजता आजही शाबूत आहे.ज्या ज्या वेळी कुठे त्यांचा विषय निघतो त्या त्या वेळी मी आवर्जून म्हणत असतो की सुशीलकुमार शिंदे ही केवळ राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेली व्यक्ती नाही तर संपूर्ण समाजाची संपत्ती आहे ! अशी वयक्तिमत्व तयार होण्यासाठी ४०-५० वर्षे लागतात ... अशा संपत्तीची जपणूक करणे ही समाजाची जबाबदारी असते. हळव्या मनाच्या या सच्चा माणसाला आपण जतन करुया..  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याची ओळख निर्माण करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा  !                                         
 

(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: Sushilkumar Shinde is not a net person, but a wealth of society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.