सुषमाबाई, तुम्हीसुद्धा..?

By admin | Published: December 10, 2014 01:16 AM2014-12-10T01:16:23+5:302014-12-10T01:16:23+5:30

भारतहा धर्मबहुल देश आहे. तो जगातला पहिल्या क्रमांकाचा हिंदू देश असला, तरी तिस:या क्रमांकाचा मुसलमान देशही आहे.

Sushmabai, you too ..? | सुषमाबाई, तुम्हीसुद्धा..?

सुषमाबाई, तुम्हीसुद्धा..?

Next
भारतहा धर्मबहुल देश आहे. तो जगातला पहिल्या क्रमांकाचा हिंदू देश असला, तरी तिस:या क्रमांकाचा मुसलमान देशही आहे. शिवाय, त्यात बौद्ध, जैन व शीख या धर्माचा जन्म झाला असून, त्यांचेही अनुयायी त्यात आहेत. आजवरच्या इतिहासाने त्यात पारशी व ािश्चनांची भर टाकली असून, ते लोक या देशाशी एकरूप झाले आहेत. देशावरील प्रत्येकच संकटाच्या वेळी त्याची ही धार्मिक एकात्मता अधोरेखित झालेली जगाने पाहिली आहे. स्वातंत्र्याच्या लढय़ात, चीन व पाकिस्तानच्या आक्रमणाच्या काळात, त्सुनामीसारख्या संकटात हा देश नेहमीच एकसंध राहिला आहे. या एकात्मतेचे रूपांतर सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) राज्यात करणो व त्यातील जनतेला व्यक्ती वा माणूस म्हणून जगता येणो जमणो, हे आपले स्वप्न असल्याचे पं. नेहरू म्हणत. त्यात फूट पाडू पाहणा:या शक्ती अनेक आहेत. त्या देशात आणि देशाबाहेरही आहेत. पाकिस्तान हे असे एक आव्हान आहे. त्यात या देशातील मुसलमान समाज आपल्या नियंत्रणात असून, तो आपण सांगू तसे वागेल, हा भ्रम त्याने गेली 6क् वर्षे जपला आहे. धर्म, जात, भाषा, संस्कृती व प्रदेश यांसारख्या कोणत्याही एका प्रश्नावर त्यात फूट पडली, तर ती हवी असलेले असंतुष्ट दहशतखोरही देशात अनेक आहेत. कानाकोप:यांत दडलेले आणि एखाद्या छोटय़ा गटाला हाताशी धरून अशी फूट पाडू पाहणारे लोक मुळात थोडे आहेत आणि त्यांचा बंदोबस्त करणो सरकारला व समाजालाही आजवर जमले आहे. 
आताची अडचण वेगळी आणि मोठी आहे. फूट पाडण्याचे, तेढ निर्माण करण्याचे काम स्वत:ला बहुसंख्य हिंदू समाजाचे पुढारी म्हणवून घेणा:यांनीच आता हाती घेतले आहे. हा देश केवळ हिंदूंचा आहे आणि त्यात इतरांना स्थान नाही. ते त्यांना मिळवायचे असेल, तर त्यांनी एक तर दुय्यम दर्जाचे राहून व दबत जगूनच मिळवावे लागेल, असा या मंडळींचा आग्रह आहे. देशात संघासारख्या हिंदुत्ववादी संघटना आहेत. त्या व त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या शाखा-उपशाखा असा अतिरेकी उत्साह दाखवीत आहेत. 1992मधील बाबरी मशिदीच्या विध्वंसाआधीपासूनच त्यांनी असे वातावरण तापवायला सुरुवात केली व तिच्या विध्वंसानंतर त्याचा कडेलोटच झाला. आताही तशाच प्रवृत्ती देशात डोके वर काढताना दिसत आहेत आणि त्यात देशाने जबाबदार मानलेली माणसे अग्रभागी असलेली दिसत आहेत. कर्नाटकात ािश्चनांची 8क्क्वर प्रार्थनास्थळे जमीनदोस्त करण्यात आली. ओडिशात अशी 12क्क् प्रार्थनास्थळे जाळली गेली. ािश्चनांचा वर्ग अत्यल्पसंख्य असल्याने शांत राहिला. परिणामी, विध्वंसकांचे मनोबल वाढले आणि त्यांच्या सोबत जाण्याने आपले नेतृत्व बलशाली होऊ शकते, असा भ्रमही अनेकांच्या मनात निर्माण झाला. उत्तर प्रदेशची भाजपा खासदार निरंजन ज्योती या स्वत:ला साध्वी म्हणवतात. त्यांनीे देशातील सव्वाशे कोटी नागरिकांची ‘रामजादे’ व ‘हरामजादे’ अशा दोन वर्गात फाळणीच करून टाकली. वर ‘रामाला न मानणा:यांनी हा देश सोडून चालते व्हावे,’ असा धर्मादेशही सा:यांना ऐकविला. भाजपाचे दुसरे एक खासदार गिरिराज सिंग म्हणाले, ‘मोदींना आपला नेता न मानणारे लोक देशद्रोही आहेत. त्यांना देशाबाहेर घालविलेच पाहिजे.’ 
मोदींच्या पक्षाला मत देणा:या भारतीय मतदारांची संख्या 3क् टक्के, तर त्यांच्या पक्षाच्या विरोधात मतदान करणा:यांची संख्या 7क् टक्के आहे, हे लक्षात घेतले, की या साध्वीला आणि या धर्मपुरुषाला देशातली 7क् टक्के माणसे देशाबाहेर घालवायची आहेत, हेही कळून चुकते. देशाच्या मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्रिपदावर असलेल्या स्मृती इराणी यांनाही असेच काहीसे करायचे आहे. त्यांना शिक्षणाचे हिंदूकरण करून देशाची बहुविधता संपवायची आहे. संस्कृत भाषा सा:या शिक्षणात आणण्याचे स्वप्न त्या पाहत आहेत. संस्कृत ही देशाची प्राचीन भाषा असली, तरी त्या प्राचीन काळातही तिचा वापर समाजातला उच्च वर्णच करीत असे आणि तिचा उच्चर देशातल्याच बहुसंख्य लोकांना वज्र्य असे, हे ऐतिहासिक वास्तव या शिक्षणमंत्र्यांना ठाऊक नसावे. आपली वक्तव्ये व आपले इरादे देशाच्या एका मोठय़ा समाजाला देशाच्या एकात्मतेपासून दूर नेणारे आहेत, हेही त्यांना कळत नसावे. अर्थातच, स्मृती इराणी यांच्याकडून तेवढय़ा शहाणपणाची अपेक्षाही आपण बाळगण्याचे कारण नाही. 
आताचा प्रश्न सुषमा स्वराज यांचा आहे. सुषमाबाईंजवळ विरोधी पक्षाच्या नेतेपदापासून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदार्पयतचा अनुभव आहे. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री होत्या आणि मोदी मंत्रिमंडळात त्या परराष्ट्रमंत्री आहेत. आजवरची त्यांची वक्तव्ये व प्रतिक्रिया गंभीर प्रकृतीच्या राहिल्या आहेत; पण सभोवतीच्या साध्व्या आणि भोवतालचे महंत यांमुळे त्याही बिथरल्यागत बोलू लागल्या आहेत. भगवद्गीता हा हिंदूंनी शिरोधार्ह मानलेला भारतीय ग्रंथ आहे. शंकराचार्यापासून ज्ञानेश्वरांर्पयत, तात्या टोप्यांपासून लोकमान्यांर्पयत आणि गांधींपासून भगतसिंगांर्पयत सा:यांना तो पूज्य व मार्गदर्शक वाटला आहे. वेद, ब्राrाणो, आरण्यके, उपनिषदे, स्मृती व पुराणोही हिंदूंना तेवढीच पूजास्थानी ठेवावीशी वाटणारी ग्रंथसंपदा आहे. मात्र, त्यांचे धर्मसापेक्ष असणोही सर्वमान्यच आहे. यातल्या एका ग्रंथाला-गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्या, असे सुषमाबाईंचे मागणो आहे. त्यांचे गीताप्रेम ताजे, राजकीय व देशात दुजाभाव निर्माण करणारे आहे. भारतासारख्या धर्मबहुल देशात कोणत्याही एका धर्माच्या ग्रंथाला, मग तो गीताच का असेना, राष्ट्रीय म्हणून मान्यता दिली, तर देशातील इतर धर्माच्या लोकांच्या भावनांचे काय? मुसलमानांना त्यांचे पवित्र कुराण हा ईश्वरी ग्रंथ वाटतो. ािश्चनांना बायबल, ज्यूंना तोराह, बौद्धांना त्रिपिटक, तर जैनांना तत्त्वार्थसूत्र हे ग्रंथ पूज्य व पवित्र वाटणारे आहेत आणि भारत त्या सा:यांचाच देश आहे. या स्थितीत कोणत्याही एका धर्माच्या ग्रंथाला राष्ट्रीय म्हणून मान्यता द्यायचे ठरले, तर बाकीच्या धर्माचे ग्रंथ अराष्ट्रीय वा निमराष्ट्रीय ठरतात, ही बाब अल्पसंख्याकांएवढीच बहुसंख्याकांमधील सुजाणांनाही मान्य होणारी नाही. कारण, तीत दुहीची बीजे आहेत आणि ती फाळणीचीच सूचना आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच तिचा निषेध केला आहे. मुलायम, लालू, देवेगौडा, ओमर अब्दुल्ला किंवा नितीशकुमारांसारखे नेते त्यावर अजून बोलले नसले, तरी त्यांच्या प्रतिक्रियेचा अदमास बांधता येणारा आहे. यातली सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया नरेंद्र मोदींची राहणार आहे. त्यांनी निरंजन ज्योतीला फटकारले, गिरिराज सिंगाला दटावले.  सुषमाबाईंना ते काय ऐकवतात, हे आता पाहायचे. देश चालवण्याची व त्यातले ऐक्य जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि देशातले सारे समाज त्याचसाठी त्यांना सोबत घ्यायचे आहेत. साध्वी निरंजन ज्योती, खासदार  गिरिराज सिंग आणि सुषमा स्वराज यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्यातील काहींच्या जबाबदा:या मोठय़ा असल्या, तरी मोदींच्या तुलनेत त्या फार तोकडय़ा आहेत. 
 
सुरेश द्वादशीवार
संपादक, लोकमत, नागपूर
 

 

Web Title: Sushmabai, you too ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.