प्रासंगिक- रस्ते झाडा, घासा- पुसा.. आता माणसांचे नव्हे, स्मार्ट यंत्राचे काम !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:40 AM2023-10-02T06:40:08+5:302023-10-02T06:40:35+5:30
गणेशोत्सवाची लगबग संपली. दोन ऑक्टोबरची गांधी जयंती, तत्पूर्वीचा स्वच्छता पंधरवडा आणि नागरिकांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे.
- दीपक शिकारपूर, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक
गणेशोत्सवाची लगबग संपली. दोन ऑक्टोबरची गांधी जयंती, तत्पूर्वीचा स्वच्छता पंधरवडा आणि नागरिकांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे. ह्या सर्व प्रकारात आपण शहर स्वच्छ ठेवत आहोत का ह्याकडे किती लक्ष देतो आहोत? हजारो स्वच्छता कर्मचारी शहर स्वछतेसाठी जिवाचे रान करत असतात. इथेच आधुनिक तंत्रज्ञान अशा हातांना मदत करू शकते. ह्यासाठी आपण जपानकडून खूप शिकू शकतो. ह्यात अग्रेसर असणार आहे ते रोबोटिक्स तंत्रज्ञान. गेल्या दहा-वीस वर्षांत रोबोट्सचा वापर सध्या प्रत्येकच क्षेत्रामध्ये केला जातो आहे, शस्त्रक्रियेपासून युद्धभूमीपर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून गटारे साफ करण्यापर्यंत दूषित किंवा विषारी द्रव्ये गोळा करणे व ती वाहून नेणे अशांसारख्या आपल्यासाठी अतिशय धोकादायक असलेल्या कामांसाठी तर रोबोट्स आदर्शच म्हणावे लागतील.
रोबोट्सना जास्त काम देऊया आणि ज्या कामाचा आपणास तिरस्कार वाटतो त्यापासून सुरुवात करूया. उदा. शहरे स्वच्छ ठेवणे अवघड जागी जाऊन कचरा शोधणे, अति शीत वा अति उष्ण वातावरणात वावरणे अशा ठिकाणी यंत्रमानव वापरणेच योग्य.
ट्रिपल आय टेक्नॉलॉजीच्या रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर्समुळे साफसफाईचे काम सोपे, कमी वेळात होते. संदर्भात ही एक क्रांती होते आहे. या उपकरणांतून बाहेर पडणाऱ्या निगेटिव्ह आयओन्समुळे धूळ, धूर, बुरशीसारखे हवेतील सूक्ष्म कण निकामी होतात.
त्यामुळे तुम्ही शुद्ध हवेत श्वास घ्याल याची खात्री होते. अशी उपकरणे मानवी कर्मचाऱ्यांना मदतनीस म्हणून नक्कीच मूल्यवर्धन करू शकते. ह्याच बरोबर जर आपण स्मार्ट मटेरिअलचा वापर केला तर सहज विरघळणाऱ्या वस्तूंची निर्मिती शक्य होईल. उत्पादनतंत्र तसेच यंत्रांच्या संदर्भातही क्रांती होते आहे.