जरा झूल उतरवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:40 PM2020-05-12T12:40:10+5:302020-05-12T12:40:34+5:30

मिलिंद कुलकर्णी संकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना ...

Take off your hats! | जरा झूल उतरवा !

जरा झूल उतरवा !

Next

मिलिंद कुलकर्णी
संकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना येत आहे. नातलग, जिवाभावाचे मित्र, विचार-वाद यामुळे घनिष्ट संबंध तयार झालेले नेते-कार्यकर्ते हे ह्यशारीरिक अंतराह्णच्या नियमामुळे दुरावले आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे किमान दर्शन व ध्वनीद्वारे निकटता येत आहे, तेवढाच दिलासा आहे.
कोरोना पूर्व आणि कोरोना पश्चात अशी नवीन संस्कृती आता जगभर अस्तित्वात येणार आहे. कोरोना पश्चात संस्कृतीचे नीती-नियम अद्याप ठरायचे असले तरी त्याविषयी संकेत जाणवू लागले आहे. कोरोना पूर्व काळात भारतीय संस्कृती ही आतिथ्यशील मानली जात होती. आता काय आहे, नातलग जरी असला तरी तो येऊ नये, अशी मनोमन इच्छा असते. परदेश, परराज्यातील नातलग, मित्र आला तरी प्रशासकीय यंत्रणा त्याला आधी क्वारंटाईन करते. नंदुरबार जिल्ह्यातील श्रमिक मंडळी गुजराथमधून परत आली, मात्र त्यांना गावात घेण्यापूर्वी गावाबाहेर, शेतात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. भेद याठिकाणीही आहे. श्रीमंतांसाठी विलगीकरण कक्ष आहेत, गरिबांसाठी माळरान आहे. नवीन संस्कृती उदयाला येत असली तरी भेदाभेदसारखे दुर्गुण मात्र कायम राहिले आहेत.
ह्यकोरोनाह्णच्या संकटात माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न पडत असताना उत्तर प्रदेशातील महिलेची प्रसुती करण्यासाठी कवी कासार हा राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता पुढे येतो आणि कन्यारत्न जन्माला येते. संघाचे पदाधिकारी डॉ.विलास भोळे सहाय्यभूत ठरतात. त्याच जळगावात ५० दिवसांच्या लॉकडाऊनने वडील आणि भावाचा रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले. शासकीय विभाग, सामाजिक संघटनांनी अन्नछत्र उघडूनदेखील भूकबळी कसे होतात? कुठेतरी समन्वय कमी पडतोय काय, असे या घटनेतून जाणवले.
नंदुरबार- धुळ्यात स्थलांतरित कामगारांसाठी मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे या आदिवासी समाजासाठी झटणाऱ्या नेत्या प्रयत्नशील आहेत. गुजराथ व मध्य प्रदेशातून आदिवासी बांधव यावेत, यासाठी शिंदे यांनी मंत्री व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाटकर यांनी मध्य प्रदेशात ४८ तासांचे उपोषण केले. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यात थांबून त्या उपाययोजनांवर चर्चा करीत आहे. परप्रांतीय कामगारांना राज्य सरकार केवळ त्या राज्याच्या सीमेवर सोडत असताना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवा, अशी त्यांची मागणी आहे. समाजाविषयीची कळकळ, तळमळ यातून दिसून येते.
या पार्श्वभूमीवर अधिकार, पदांची झूल पांघरलेल्या मंडळींच्या अस्तित्वाची खरी कसोटी आहे. वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात संपूर्ण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, वैचारिक आणि मतदानाच्या आदल्या रात्री आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने झटणाºया भावी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांची कळकळ किती फोल होती, हे कोरोनाच्या संकटकाळात दिसून येते. समाजमाध्यमांवर सक्रीय असलेली ही मंडळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मात्र अदृश्य आहे. एका कार्यकर्त्याला सहज विचारले, बाबा रे आता तुझी समाजकार्याची उर्मी कशी जागृत होत नाही. तेव्हा तो विनयशील स्वरात म्हणाला, आम्ही ठरवलेय, आमचे नेते जोवर घरातून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही पण पडणार नाही.
समाजाच्या कल्याणाची कळकळ वर्षभरापूर्वी वाटणाºया या मंडळींनी सरड्यासारखा रंग बदललेला दिसला. लोकांना केवळ धीर, आधार हवा आहे. संकट कोसळल्यावर ह्यलढ म्हणाह्ण असा आपुलकीचा शब्द हवा आहे. पण त्यापासून लोक वंचित आहे.
प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, परिचारिका हे सध्याचे खरे हिरो आहेत. हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरदेखील कोरोनापासून बचावलेले नाही. पण धीरोदात्तपणे ते संकटाशी मुकाबला करीत आहेत. वाद असतील, नियोजनातील गोंधळ असेल, साधनसामुग्रीची कमतरता असेल, निधीचा ठणठणाट असेल पण इच्छाशक्ती दांडगी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी समाजाने स्वयंशिस्त, संयम पाळायला हवा.

Web Title: Take off your hats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.