विकासाचे ‘टेकआॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:51 AM2018-02-21T05:51:09+5:302018-02-21T05:51:11+5:30
देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे
देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या विमानतळाच्या कामाची पायाभरणी झाली. त्यामुळे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. नवी
मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाबरोबरच मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक
आणि प्रस्तावित उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे आता नवी मुंबई
हेदेखील खºया अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनणार आहे. नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे मुंबई महानगर क्षेत्रात विमानाने प्रवास करणाºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिवर्ष ४५ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. २०३४ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विमान प्रवाशांची संख्या प्रतिवर्षी १०० दशलक्ष किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी हाताळणे शक्य असल्याने मुंबईच्या
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही
काळाची गरज बनली होती. अनेक अडथळ्यांमुळे या प्रकल्पासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रालाही सुगीचे दिवस येतील, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक, विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष विमानाच्या उड्डाणाला २०२० साल उजाडण्याची शक्यता आहे. या दोन वर्षांत विमानतळाच्या कामामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपाचे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. पर्यायाने नवी मुंबईसह मुंबई प्रादेशिक क्षेत्राच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे. त्या दिशेने विकासाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र या प्रक्रियेत राज्याच्या विकासाऐवजी केवळ बांधकाम व्यावसायिक, विकासकांनीच स्व‘विकासा’चे टेकआॅफ घेऊ नये, याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.