टॅम्प्लीऽऽज ! आ म्हा ला बा स
By सचिन जवळकोटे | Published: March 18, 2019 10:57 AM2019-03-18T10:57:27+5:302019-03-18T10:58:03+5:30
माढ्याच्या रणांगणात दिसेल तो योद्धा पाठ दाखविण्याची भाषा करतोय. ‘थोरले काका’ माढ्यात चक्कर मारून पुन्हा बारामतीला गेले. ‘सुभाषबापू’ तर ...
माढ्याच्या रणांगणात दिसेल तो योद्धा पाठ दाखविण्याची भाषा करतोय. ‘थोरले काका’ माढ्यात चक्कर मारून पुन्हा बारामतीला गेले. ‘सुभाषबापू’ तर ‘मी कधी म्हणालो होतो?’ असं विचारू लागले. ‘संजयमामां’नी तर ‘कमळ’वाल्यांनाच ‘मामा’ बनविलं. ‘विजयदादा’ही ‘मला नकोऽऽ माझ्या लाडक्या लेकरालाच द्या,’ म्हणत मागे सरकू लागले. ही सारी गंमत पाहताना लहानपणीचा खेळ आठवला. खेळात ‘आम्हाला बासऽऽ’ म्हणणारी पोरं जशी ‘टॅम्प्लीऽऽऽज’ म्हणायची.. ती भाषा डोळ्यांसमोर तरळून गेली.
पार्थ.. स्वार्थ.. परमार्थ !
‘थोरले काका बारामतीकर’ नेहमी एका दगडात तीन-तीन पक्षी (की पक्ष?) साधतात, याची पुन्हा एकदा अनुभूती आली. ‘पार्थ’साठी कौटुंबिक ‘तह’ करून मावळ प्रांत नातवाला दिला. त्यासाठी एकीकडं माढ्याची लढाई तहकूब केल्याचा आव आणून दुसरीकडं पराभवाचा शिक्का मारून न घेण्याचा ‘स्वार्थ’ही साधला. नंतर जाता-जाता परत ‘सहकाºयांसाठी माढ्याची जागा मोकळी करतोय’, अशा आविर्भावात ‘परमार्थ’ही साधला. दि ग्रेट काकाऽऽ तुमच्या चाणाक्ष चाणक्यबुद्धीला तोड नाही.. लगाव बत्ती...
- - ‘संजयमामा’ मुंबईला जाण्यापूर्वी आदल्या दिवशी झेडपीच्या केबिनमध्ये बसलेले. एवढ्यात मोबाईल वाजला. ‘बोला दादाऽऽ’ म्हणत ‘मामां’नी घाईघाईनं साºयांना बाहेर काढलं. कार्यकर्त्यांना प्रश्न पडला; नेमक्या कोणत्या दादांचा कॉल आला? कुणी म्हणालं, ‘बबनदादांचा आसंल.’ दुसºयानं सांगितलं, ‘नायऽऽ अजितदादांचा हाय.’ तिसºयानं शोध लावला, ‘नक्कीच चंद्रकांत दादांचा वाटतुया.’ चौथ्यानं तर कडी केली, ‘भौदा विजयदादांचाच दिसतुया.’
- - अगाऽऽगाऽऽ एकाच वेळी किती ‘दादां’ना फिरविण्याची करामत हे ‘मामा’ करताहेत? त्यांच्या अनाकलनीय अन् अचाट कर्तृत्वाबद्दल खुद्द कार्यकर्त्यांनाच किती कल्पनांचे धुमारे फुटताहेत? असो.. मुख्य विषय राहिलाच बाजूला. फोन म्हणे फलटणमधील निंबाळकरांच्या ‘रणजितदादां’चा होता.
- - मुंबईत ‘वर्षा’वर खुद्द देवेंद्रपंतांनीच शब्द टाकूनही ‘नाना’चा पाढा वाचणाºया या ‘मामां’ना नेमकं हवंय तरी काय? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर त्यांना स्वत:च्या कारखान्यात पंतांच्या सत्तेचा फायदा हवाय; परंतु ‘कमळ’ नकोय. माढा-करमाळा राजकारणात ‘बबनदादां’च्या आमदारकीचा वापर हवाय; परंतु ‘घड्याळ’ नकोय. म्हणूनच गेल्या विधानसभेला मनगटात ‘घड्याळ’ बांधून ‘हाता’त ‘कमळ’ धरण्याचा प्रयत्न करताना वाजलीच नाही त्यांची ‘शिट्टी’.. तेव्हा यंदा वाजवतील की काय ‘कपबशी’... अशी विरोधकांनाही वाटू लागलीय भीती. लगाव बत्ती..
राजकीय जॉब धोक्यात
व्हीआरएस म्हणजेच स्वेच्छेनं काम थांबविणं, म्हणजे जॉब बंद.. परंतु नोकरीतला हा श्फर शब्द सोलापूरच्याराजकारणात वेगळ्या अर्थानं चर्चेत आलाय. ‘शहर उत्तर’ची जबाबदारी सुशीलकुमारांनी ज्यांच्यावर सोपवलीय, ती टीम म्हणजे व्हीआरएस. आता या शब्दाचा अर्थ ‘विश्वनाथ, राजशेखर अन् सिद्धाराम’ या तीन अण्णांना विचारायच्या भानगडीत पडू नका. अगोदरच त्या गौडगावच्या महाराजांमुळं यल्लारदू डोकं किट्ट झालंय. जळी-स्थळी भगवी वस्त्रंच दिसू लागलीत. ‘लोकसभेचं जाऊ द्या होऽऽ समाजावरचा आपला कायमस्वरूपी असलेला होल्ड कमी होतोय की काय,’ अशी भीती या महाराजांमुळं श्फर टीमला वाटू लागलीय; कारण या समाजाच्या जीवावरच यांचा राजकीय जॉब आजपर्यंत ‘जनवात्सल्य’वर चालत आलेला.
१९६१ नंतर प्रथमच ‘नम् मनशाऽऽ’ला खासदारकीची संधी मिळत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर गुप्तपणे फिरू लागलाय. यामुळं ‘तम-तम मंदीं’चं ज्या पद्धतीनं झपाट्यानं ध्रुवीकरण होऊ लागलंय, ते ‘हात’वाल्यांसाठी निश्चितच धोक्याचं.. म्हणूनच ‘विश्वनाथ अण्णां’नी या महाराजांना ओपन चॅलेंज दिलं की, ‘तुम्हाला मदत करणाºयांची नावं सांगा, राजकारण सोडतो.’ हे ऐकून देशमुख मालकांच्या वाड्यावर म्हणे खुसपूस झाली, ‘आता सोडण्यासारखं राहिलंच काय?’ अशी खोचक प्रतिक्रियाही व्यक्त झाली. मात्र, ‘शहर उत्तरमध्ये कुणीही उभारलं तरी आमचे मालकच नेहमी निवडून येणार’, अशी दर्पोक्ती करणाºया कार्यकर्त्यांना हे माहीत नसावं की ‘काळाचा महिमा अचाट असतो. लोकशाहीत मतदारांची भूमिका अगाध असते.’