कसोटी सामने पाच दिवसांचेच असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:17 AM2020-02-08T03:17:15+5:302020-02-08T03:18:14+5:30

क्रिकेटचे कसोटी सामने पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे असावेत, या विषयावर नव्याने वाद सुरू झाला आहे.

Test matches should be five days old | कसोटी सामने पाच दिवसांचेच असावेत

कसोटी सामने पाच दिवसांचेच असावेत

Next

- संतोष देसाई

क्रिकेटचे कसोटी सामने पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे असावेत, या विषयावर नव्याने वाद सुरू झाला आहे. जुन्या आणि नव्या बहुसंख्य खेळाडूंनी या कल्पनेस विरोध दर्शविला आहे. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांचे पावित्र्य घालवू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. हे सामने एका दिवसाने कमी केल्याने क्रिकेट सामन्यांच्या वार्षिक आराखड्यात कार्यक्रमांची गर्दी तर होईलच; पण क्रिकेटच्या मूळ गाभ्यालाच धक्का पोहोचेल.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिवस-रात्र होणारे सामने चांगले नाहीत याविषयी आपली खात्री पटली, असे म्हटले होते. त्याला तसे वाटते हे क्रिकेटसाठी चांगले लक्षण आहे. त्यामुळे क्रिकेटचे कसोटी सामने अधिक रोमहर्षक व दर्शकांसाठी अनुकूल होतील. दिवसामध्ये वेगवेगळ्या वेळी खेळ खेळणे हे क्रिकेट सामन्यांना अधिक आकर्षक बनविण्यात मदतच करीत असते. वास्तविक, आधुनिक क्रिकेट सामन्यांमधूनच समोर आलेल्या विराट कोहलीसारख्या खेळाडूने केव्हाही सामना खेळल्यास तयार असायला हवे. कसेही करून क्रिकेटचे सामने व्यावसायिक दृष्टीने परवडणारे कसे होतील, हेच बघितले गेले पाहिजे.

माझ्या मते, आजच्या जगात पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांना स्थानच असायला नको. सध्या आपण ज्या तºहेचे घाईगर्दीचे जीवन जगत आहोत त्यात एका सामन्यासाठी पाच दिवसांचा वेळ देणे आणि तेवढा वेळ देऊनही सामना अनिर्णीत राहणे हे कितपत परवडणारे आहे? असे असले तरी क्रिकेटच्या खेळात कसोटी सामन्यांना वेगळेच महत्त्व आहे. तोच क्रिकेट खेळाचा खरा चेहरा आहे, असे म्हटले तरी चालेल. पण क्रिकेटचा खेळ ज्या देशांत खेळला जातो ते देश वगळता अन्य देश या खेळाकडे आश्चर्याने बघत असतात. त्यांच्या खेळाच्या कल्पनेत अशा तºहेच्या खेळाला स्थानच नसते.

क्रिकेटचा खेळ कमी लोकांना संधी देत असतो. प्रत्येक डावात दोन-तीन खेळाडूच स्वत:चे कौशल्य दाखवीत असतात आणि त्यांच्यासाठीदेखील शारीरिक श्रम हे किरकोळच असतात. कसोटी सामन्यात हालचालींचा हा अभाव पाच दिवसांपर्यंत लांबविण्यात येतो आणि हे अधिक कंटाळवाणे करण्यासाठी सामन्यात एक विश्रांतीचा दिवसही दिला जातो. दोन दिवसांच्या संथगतीने खेळल्या जाणाºया खेळानंतर थकलेले खेळाडू एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा दोन दिवस संथगतीने खेळण्यास सज्ज होत असतात! काही दशकांपूर्वी हा खेळ म्हणजे चैन समजला जात होता; आणि कालांतराने तो इतिहासाचा एक भाग बनला. आजच्या काळात आपला संगणक सुरू होण्यास काही सेकंदच लागतात, तेथे पाच दिवसांचा कंटाळवाणा खेळ पाहण्यात वेळ घालविल्याने वास्तविक त्याविरोधात संघर्ष व्हायला हवा किंवा त्याविरुद्ध कॅण्डलमार्च तरी निघायलाच हवा.

कसोटी सामने पाच दिवसांच्या स्वरूपात जे खेळले जातात आणि अनेकदा सामन्यांची मालिकाच (सिरीज) खेळली जाते, त्यात अनेकदा निर्णय होत नाही. कारण निर्णय लागावा यासाठी खेळाडूंवर कोणताही दबाव नसतो. त्यामुळे क्रिकेट सामन्यांना जे नवे स्वरूप प्राप्त झाले आहे (एकदिवसीय सामने, टी टष्ट्वेन्टी सामने इत्यादी) ते लोकांना अधिक आवडते; त्यामुळे वास्तविक कसोटी सामन्यांचा अंत होणे अपेक्षित होते. पण, अशा विपरीत परिस्थितीतही पाच दिवसांचे कसोटी सामने कशामुळे टिकून आहेत?

अनेकांना वाटते की कसोटी सामने हे मृत्युपंथाला लागले आहेत. पण त्यात काही अर्थ नाही. उलट हा विचार अतिरंजित वाटतो. तरीही सध्याच्या कसोटी सामन्यांच्या स्वरूपात बदल करायला हवा, असेही वाटू लागले आहे. त्यासाठी चॅम्पियनशिप सामने हाच पर्याय असू शकतो. पण नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस सामन्यांच्या निकालाबद्दल जे वातावरण निर्माण झाले त्यावरून सामन्यांच्या एकूण व्यवस्थापनाविषयी शंकेचे वातावरण तयार झाले आहे.

ज्याप्रमाणे बातम्यांचा आस्वाद घेत असतो, त्याचप्रमाणे आपण कसोटी सामन्यांचा आस्वाद घेऊ लागलो आहोत. ते सामने सतत बघत राहणे गरजेचे नसते. आपले इतर व्यवहारही त्याच बरोबरीने सुरू असतात. कसोटी सामन्यांमुळे आपण क्रिकेट या खेळाच्या अधिक जवळ पोहोचतो. त्यामुळे दोन स्पर्धकांची क्षमता जाणून घेणे शक्य होते. वास्तविक, त्या सामन्यातून खेळाडूंच्या कौशल्याचे अधिक चांगल्या तºहेने दर्शन होते. कसोटी सामन्यासाठी खर्च होणारा वेळ व पैसा दुर्लक्षिला जातो; कारण हे सामने विशेष स्वरूपाचे असतात. प्रत्येक सामना निर्णयापर्यंत पोहोचेल ही शक्यता नसते, तसेच प्रत्येक सामना हा उत्कंठापूर्ण असेलच याची खात्री नसते. या सामन्यात बाऊन्ड्रीज ठोकल्या जातील याचीही हमी नसते. खेळाडू बाद होतील ही शक्यताही नसते. प्रत्येक सामना उत्कंठापूर्ण कळसाला पोहोचेलच याची शाश्वती नसते. पण, आपल्या जीवनातही कंटाळवाणे वाटावे असे क्षण येतच

Web Title: Test matches should be five days old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.