लेखक अनेक आहेत, पण खुशवंत सिंगांसारखा बहुढंगी आणि बहुरंगी क्वचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:39 AM2017-08-20T01:39:50+5:302017-08-20T01:39:55+5:30

आपल्या आयुष्याची कहाणी खुशवंत सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मुक्तपणे सांगून टाकली आहे. त्यात तर चाकोरीबद्ध जगणा-याला आणि विचार करणा-याला धक्के बसून त्याला विचार करायला लावला आहे.

There are many authors, but rarely and multicolored like Khushwant Singh, rarely | लेखक अनेक आहेत, पण खुशवंत सिंगांसारखा बहुढंगी आणि बहुरंगी क्वचितच

लेखक अनेक आहेत, पण खुशवंत सिंगांसारखा बहुढंगी आणि बहुरंगी क्वचितच

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

आपल्या आयुष्याची कहाणी खुशवंत सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मुक्तपणे सांगून टाकली आहे. त्यात तर चाकोरीबद्ध जगणा-याला आणि विचार करणा-याला धक्के बसून त्याला विचार करायला लावला आहे.

लेखक अनेक असतात आणि आजही आहेत, पण खुशवंत सिंगांसारखा (जन्म २ फेब्रुवारी १९१५, मृत्यू २० मार्च २०१४) बहुढंगी आणि बहुरंगी क्वचितच असतो. आपला मोक्ष लेखनातच आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने कायम हातात लेखणी घट्ट धरून ठेवलेली होती. अनेक समस्या आल्या तेव्हा भावनावेग अनावर झाल्यामुळे यापुढे आपल्याला लिहिणं जमणार नाही असं म्हटलं. हे कशाला, आपल्या आत्मचरित्रात आपल्या पत्नीबाबत लिहिताना शेवटच्या ओळी आहेत, निश्चितच माझ्यानंतर तिचं आयुष्य संपणार हे मला पूर्वी खात्रीने वाटायचं, पण आता तो माझा अंदाज चुकणार असं मला वाटतंय. पण जर ती माझ्या अगोदर गेली तर मला पुन्हा हातात पेन घेऊन लिहावंसं कधीच वाटणार नाही. पण तसं काही झालं नाही. खुशवंत सिंग लिहीतच राहील. याचा अर्थ पत्नीबाबत त्याने प्रतारणा केली काय?
दु:खावेगाने त्यानं, त्या कल्पनेनं तसं म्हटलं हे समजून घ्यायला हवं.
मग तरी खुशवंत सिंग का लिहिते राहिले? त्याचं उत्तर त्यांनीच कधी तरी सांगून टाकलंय, मी स्वत:ला बरेचदा एक प्रश्न विचारतो, ‘आपण का लिहितो? रोजचा कश आणि मदिरा याचा खर्च भागेल, एवढं मी नक्कीच त्यातून कमावतो, पण माझ्या लिखाणामागे एवढाच हेतू आहे का? तो जर तेवढ्यापुरताच असता, तर मी एखाद्या महामार्गावर ढाबा टाकला असता, तरी चाललं असतंच की! लिखाण केल्यामुळे माझा अहं सुखावतो. माझ्या लिखाणावर काही जण प्रतिक्रिया पाठवतात. आपण जे काही लिहितो, त्याचा लोकांवर थोडा का होईना; पण परिणाम होतो, याचं मला समाधान लाभतं.’
यालाच तर ‘कोºया कागदाची हाक’ म्हणतात ना? ही असोशी खुशवंत सिंग यांच्या लेखनातून जाणवते. शिवाय आपल्या आयुष्याची कहाणी त्यांनी आत्मचरित्रात मुक्तपणे सांगून टाकली आहे. त्यात तर चाकोरीबद्ध जगणाºयाला आणि विचार करणाºयाला पुन्हा पुन्हा धक्के बसून त्याला विचार करायला लावला आहे. या आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद व्हावा यासाठी किती तरी प्रकाशकांना मी सुचवलं होतं. पण ते व्हायला तब्बल दोनएक वर्षं लागली. पंजाबी जगतात ज्या मराठी माणसाची वट आहे, त्या संजय नहार यांच्या चिनार पब्लिशर्सतर्फे ते प्रकाशित झालं. ‘सत्य, प्रेम आणि कटुता’ या नावानं. अनुवादक होते कोल्हापूरचे चंद्रशेखर मुरगुडकर. यासंबंधात त्यांनी म्हटलंय, ‘मध्यंतरी त्यांच्याशी फोनवर बोललो, भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, ‘‘चंद्रशेखर, आप जल्दी आईये, मेरे अब थोडेही दिन बाकी है!’
ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे आहेत. त्यांना शतायुष्य लाभावं आणि अजून लिहावं. यथावकाश खुशवंत सिंग यांच्या मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद मिळेनासा झाला. सर्व प्रती संपल्या. खुद्द अनुवादकाला पण सांगायला लागलं की त्याच्याकडेदेखील प्रत नाही! त्यानंतर देखील खुशवंत सिंग यांची पुस्तकं प्रकाशित होत राहिली आणि त्याचे मराठी अनुवादही होत राहिले. पण आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती येत नव्हती एवढं मात्र खरं.
दरम्यानच्या काळात अनुवादक चंद्रशेखर मुरगुडकर यांची भेट झाली तेव्हा त्यांना आवर्जून सांगितलं की, ‘‘तुम्ही वेळ गमावू नका. मिळेल त्या वाहनाने दिल्ली गाठा. सुजाण पार्कमधल्या त्या अवलियाला भेटा, अशी माणसं पुन्हा पाहायला मिळणार नाहीत.’’ काही कारणं असतील, पण चंद्रशेखर मुरगुडकर काही दिल्लीला गेले नाहीत. २० मार्च म्हणजे अगदी शंभरीच्या आसपास खुशवंत सिंग यांचं निधन झालं.
म्हणजे चंद्रशेखर मुरगुडकरांना अकरा वर्षांत खुशवंत सिंगना गाठणं जमलं नाही... त्यांची भेट राहूनच गेली. एरव्ही खुशवंत सिंग चटकन कुणाला भेटणाºयातले नव्हते आणि इथे मुरगुडकरांना आमंत्रण असून त्यांना भेटता आलं नाही. ही रुखरुख त्यांना आयुष्यभर राहणार, प्राक्तन म्हणतात ते हेच का? पण दु:खात सुख म्हणतात तसं आता या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती चिनार पब्लिकेशनतर्फेच प्रकाशित झाली आहे. तसं मी मुरगुडकरांना कळवताच त्यांना कोण आनंद झाला! साहजिकच आहे. खुशवंत सिंगची ही त्यांची पुनर्भेट झाली असं त्यांना नक्की वाटलं असणार.
खुशवंत सिंग आणि माझी ते मुंबईत असताना दहा-पाच वेळा तरी गाठभेट, वार्तालाप झाला हे माझं नशीब. ‘अ मॅन कॉल्ड खुशवंत सिंग’ आणि ‘द लिजंड व्हिजन आॅल’ ही दोन संपादित पुस्तकं म्हणजे परमोच्च आनंदाचा ठेवा. तसं खुशवंत सिंग यांचं बरंच साहित्य मराठीत अनुवादित झालं आहे ते वाचायला हवं. पण ज्याला हे पण शक्य नाही त्यांनी आता मात्र ‘सत्य, प्रेम आणि कटुता’ वाचून पाहावंच. पुस्तक वाचून त्यातली मजा कळेल. हे त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ वेगळेच आहेत एवढंच आणि असं मी म्हणेन!

Web Title: There are many authors, but rarely and multicolored like Khushwant Singh, rarely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.