...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:02 AM2020-03-02T05:02:05+5:302020-03-02T05:02:18+5:30

आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही, असे धाडसाने जाहीर करा़

... that there will be no debt waiver again | ...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा

...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा

Next

- विनायकराव पाटील
आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही, असे धाडसाने जाहीर करा. शेतकरी अन्नदाता आहे, त्याच्याकडे मतदाता म्हणून पाहू नका़ खोटी आश्वासने देऊन शेतकºयाला फसवू नका. निवडणुकांमध्ये मतांसाठी खोटी आश्वासने देता व सत्ता आली की अनेक नियम व अटी लावून चुकीचे व अर्धवट निर्णय घेता़ त्याची मोठी प्रसिद्धी करून शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे वागता़ हे सर्व काही एकदा सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे़ मग कोणीही सत्तेत असो़
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटात सापडला आहे़ दुष्काळ, नंतरची अतिवृष्टी़, शेतीमालाला भाव नाही़, बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण आणि लग्न अशा अनेक अडचणींवर मात करून संघर्ष करीत शेतकरी जगत आहे़ दोन वेळा चुकीची कर्जमाफी झाली़ ज्यामध्ये थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ झाले़ मात्र न मिळणारा पीकविमा, कर्ज न देणाºया राष्ट्रीयीकृत बँका यामुळे शेतकºयांचे जगणे कायम अवघडच राहिले़ या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्या वाढत राहिल्या़ विदर्भ, मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण तीन पटीने वाढले़ एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र सत्तासंघर्षात दंग आहेत़
सरकारने केलेली कर्जमाफी चुकीची आहे़ कारण सध्याच्या कर्जमाफी योजनेमधून वगळलेला चालू बाकीदार व अपात्र थकबाकीदार ठरलेला एकही शेतकरी मार्चअखेर कर्ज भरणार नाही़ कारण त्याला पुढील कर्जमाफीसाठी थकबाकीदार व्हायचे आहे़ ज्यामुळे बहुतांश लोकांचा कर्ज न भरता थकबाकीदार होण्याकडे कल वाढला आहे़ मराठवाड्यातील दोन जिल्हा बँकांची अंदाजित आकडेवारी पाहिली तर एका जिल्ह्यात कर्जमाफी पात्र शेतकरी १६ हजार आणि फक्त व्याज भरून चालू बाकीदार राहिलेले शेतकरी ५९ हजार आहेत़ अन्य एका जिल्ह्यात कर्जमाफी पात्र शेतकरी २५ हजार तर फक्त व्याज भरून चालू बाकीदार शेतकरी १ लाख ४८ हजार आहेत़ या आकडेवारीवरून असे दिसते, थकबाकीदार शेतकºयांची संख्या कमी आहे़ मात्र व्याज भरून चालू बाकीदार बनलेल्या शेतकºयांची संख्या खूप मोठी आहे़ आता भविष्यात हे चालू बाकीदार शेतकरी पुढील कर्जमाफीच्या आशेने कर्ज न भरता थकबाकीदार होतील.


सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यकर्त्यांना व सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारला विनंती आहे, त्यांनी संपूर्ण कर्जमाफी करून आश्वासनाप्रमाणे सातबारा कोरा केला पाहिजे़ पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे सांगून कर्जमाफीची चर्चा कायमची बंद केली पाहिजे़ सध्याच्या अर्धवट कर्जमाफीमुळे भविष्यात शेती, शेतकरी आणि बँका अडचणीतच येणार आहेत़ अर्थात ज्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल़
अर्धवट कर्जमाफीमुळे मागील २० वर्षांपूर्वी मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेले गरीब शेतकरी कर्जमाफी न मिळाल्याने निराश होतील, शेती करणे सोडून देतील़ राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात घेतलेल्या फक्त अल्पमुदतीच्या थकबाकीदार शेतकºयांचे दोन लाखांचे कर्ज माफ केल्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतलेले तसेच ज्यांनी केवळ व्याज भरून कर्जखाते चालूबाकी केले आहे़, ते सर्व जण पुन्हा कर्जमाफी होईल म्हणून कर्जभरणा करण्यास तयार नाहीत़ सारख्या सारख्या कर्जमाफीच्या घोषणांमुळे शेतकºयांची कर्ज न भरण्याची मानसिकता वाढत आहे; ज्यामुळे बँकांचा एनपीए वाढत आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या मागण्या काय आहेत ते समजून घ्या़ ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले सर्व पीककर्ज तसेच द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पपई, केळी, ऊस, कापूस, हळद, आंबा यासाठी घेतलेल्या केवळ विंधन विहिरीसाठीचे कर्ज, पाइपलाइन, इलेक्ट्रिक मोटार व ठिबक सिंचन यासाठी घेतलेले कर्ज याचाही कर्जमाफी योजनेत समावेश व्हावा़

प्रत्येक शेतकºयाला पाच लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी़ सात हेक्टर क्षेत्रापर्यंत कर्जमाफी व्हावी़ अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयाला आश्वासन दिल्याप्रमाणे हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे़ ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या वाढवावी़ सर्वात महत्त्वाचे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकºयाच्या मालास हमीभाव द्यावा़ तशा प्रकारचा कायदाच अमलात आणावा़ शेतकºयाच्या मुलाने त्याच्या गावात प्रक्रिया उद्योग उभा केल्यास त्याला बँकेकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ असावी़ नियमित पाच वर्र्षे कर्जफेड करणाºयास पाच लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज द्यावे़ हे सर्व शक्य झाले तर वारंवार कर्जमाफीची चर्चा होणार नाही़
(सामाजिक कार्यकर्ते)

Web Title: ... that there will be no debt waiver again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी