महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:39 AM2019-10-02T05:39:33+5:302019-10-02T05:41:24+5:30

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते.

The thoughts of Mahatma Gandhi should be practiced | महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

Next

- टीआरके सौमय्या
(व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ)

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. मी १० वर्षांचा असताना गांधीविचारांनी माझ्या मनावर गारुड केले. त्यामुळे मी गांधीजींच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करु लागलो. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचा व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा मला खोटे बोलावे लागते, त्याची खंत आहे. माझे खोटे बोलणे माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठीच असते. मात्र माझ्यातील हा दुर्गुणदेखील कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. गांधी जयंती एक दिवस, एक सप्ताह साजरी करण्याऐवजी त्यांचे विचार दररोज आचरणात आणण्याची गरज आहे.

माझे वय ८२ वर्षे आहे. मात्र तरुणाई, नवीन पिढी गांधी विचार पुढे नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुढे येण्यास इच्छुक नाही, हे चित्र मनाला अतिशय वेदना देणारे आहे. नव्या पिढीत गांधी विचार रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ मात्र हव्या त्या प्रमाणात तरुणाई याकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचार प्रसार, प्रचार करण्याचे काम करण्यासाठी कोणी इच्छुक स्वत:हून पुढे येत नाही. नि:स्वार्थ भावनेने हे काम करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे दर महिन्याला गलेलठ्ठ पगार घेऊन हे काम यशस्वी होणार नाही. मात्र सामाजिक कार्याच्या हेतूने नि:स्वार्थ भावनेने गांधी विचार पुढे नेण्यासाठी कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. एकीकडे मंडळाच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे या कार्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी घट होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक अशीच आहे. देणगीदारांमध्ये मोठी घट झाली आहे.

तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये मतपरिवर्तन व्हावे यासाठी आम्ही कैद्यांपर्यत गांधी विचार पोहोचवून त्यांच्या परीक्षा घेतो. एकाही कैद्याचे खºया अर्थाने मतपरिवर्तन झाले तर ते आमच्यासाठी मोठे यश असते. जास्तीत जास्त जणांपर्यंत गांधी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून तरुणाईला याबाबत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेबसाईटला २०१९ मध्ये सुमारे १५ लाख जणांनी भेट देऊन गांधी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, पाकिस्तान व जगातील १९५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

धर्माऐवजी माणूस म्हणून जगण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. सर्वोदय मंडळात गांधी जाणून घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात. गांधी विचारांवर आचरण करणारी माणसे कमी कमी होत चालली असली तरी आमचा लोकांच्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास असून महात्मा गांधीची हत्या करणाºया नथुराम गोडसे प्रवृत्तींना समाज जवळ करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सध्या गावागावांत द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी विचार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचीती लोकांना येईल, गांधी विचारांचे महत्त्व लोकांना पुन्हा नक्कीच कळेल. कारण महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी गांधी विचार कधीच मरणार नाहीत.

Web Title: The thoughts of Mahatma Gandhi should be practiced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.