आजचा दिवस तुमचा...

By admin | Published: October 15, 2014 12:38 AM2014-10-15T00:38:56+5:302014-10-15T06:09:14+5:30

आपले एक मत किती मोठी क्रांती करू शकते, याचा प्रत्यय भारतातील मतदारांनी अनेकदा घेतला आहे.

Today is your day ... | आजचा दिवस तुमचा...

आजचा दिवस तुमचा...

Next

आपले एक मत किती मोठी क्रांती करू शकते, याचा प्रत्यय भारतातील मतदारांनी अनेकदा घेतला आहे. सत्तेवरच्या सरकारला खाली खेचण्याची आणि सर्वस्वी नव्या नेत्याच्या हाती सत्ता देण्याची अद्भुत कामगिरी मतदारांनी यापूर्वी करून दाखवली आहे. त्यामुळेच आजच्या महाराष्ट्रातील निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आवर्जून मतदान करणे किती आवश्यक आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी चमत्कार करून दाखविल्यामुळे या वेळीही मतदारांमध्ये उत्साह आहे. त्यातच महाराष्ट्रात पंचरंगी लढती असल्यामुळे मतदारांपुढचे आव्हान आणि जबाबदारीही वाढली आहे. निवडीला भरपूर वाव असणे हे चांगले लक्षण मानले जाते; पण कधीकधी त्यामुळे निवड करणे अवघडही होऊ न जाते. महाराष्ट्रातील मतदाराच्या सुजाणपणाचा कस लागावा, अशी सध्या स्थिती आहे. राज्यातील आघाड्या आणि युत्या तुटल्यामुळे आता मतदाराला बराच वाव असला तरी पक्षाची आणि उमेदवाराची कामगिरी व दोन्हींची गुणवत्ता पारखून मतदान करावे लागणार आहे. या वेळी युती आणि आघाडी तुटल्यामुळे बहुतेक पक्षांचा वेळ आणि ऊ र्जा आपल्याला सोडून गेलेला पक्ष कसा दुर्गुणी आणि घातकी आहे, हे सांगण्यातच गेला आहे. आपला पक्ष किती चांगला आहे व तो जनहिताची कोणती कामे कशी करणार आहे, हे सांगण्याऐवजी दुसरा पक्ष किती वाईट आहे व त्याने काहीच न करता ह्यमहाराष्ट्र कुठे नेऊ न ठेवला आहेह्ण याचेच रडगाणे बहुतेक पक्ष गात होते. त्यामुळे कुणाला कशाच्या आधारे मत द्यावे, असा प्रश्न मतदारांना पडण्याची शक्यता आहे. पण या पक्षांची अथवा उमेदवारांची याआधीची कामगिरी हा पक्ष अथवा उमेदवाराची योग्यता जोखण्याचा निकष होऊ शकतो. काही उमेदवारांनी कोणत्याही अपप्रचाराचा आधार न घेता आपण आमदार म्हणून अथवा मंत्री म्हणून केलेली कामगिरी मतदारांपुढे मांडण्यावर भर दिला आहे. हे उमेदवार वा मंत्री बातम्यांत दिसले नसतील; पण ते मतदारांना नक्कीच दिसत होते. त्यामुळे मतदार नक्कीच त्यांच्या पारड्यात आपले दान टाकतील, यात काही शंका नाही. पण ज्यांनी काहीच कामगिरी केली नाही आणि आपली पाच वर्षांची कारकीर्द निष्फळ वाया घालवली, त्यांना आरोप-प्रत्यारोप, उखाळ्या-पाखाळ्या, नटनट्या, मिमिक्री आर्टिस्ट, खर्चीक प्रचारपुस्तिका, अवाढव्य मिरवणुका यांचा आधार घ्यावा लागला आहे. प्रचारात असा निरर्थक खर्च करणारे उमेदवार हा खर्च कसा भरून काढतील, हे मतदारांना चांगले समजते. महाराष्ट्राच्या या वेळच्या निवडणूक प्रचारात खूपच राजकीय अपरिपक्वता दिसून आली. युती आणि आघाडी तुटल्यानंतर काही पक्ष तर शाळकरी मुले मित्राशी भांडण झाल्यावर रडतात तसे रडताना दिसत होते. या निवडणुकीत टीव्हीवरील प्रचाराच्या जाहिरातींनी उच्चांक गाठला होता. पण या जाहिराती सर्जनशील करून मतदाराचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न मात्र त्यात दिसला नाही. इतके चांगले व सुलभ माध्यम; पण ते एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी वापरले गेले, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत या वेळी दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि तीन प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत. (राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वत:ला राष्ट्रीय म्हणवून घेत असला तरी तो महाराष्ट्रापुरता उरलेला प्रादेशिक पक्षच आहे.) त्यामुळे आपल्याला आपली प्रादेशिक अस्मिता महत्त्वाची वाटते की आपल्याला राष्ट्रीय पक्षाबरोबर राहून राष्ट्रीयता हीच आपली अस्मिता वाटते, हे महाराष्ट्रातील मतदारांना स्पष्ट करायचे आहे. महाराष्ट्र जो काही निर्णय देईल तो देशाला मार्गदर्शक ठरणारा असेल, यात काही शंका नाही. या निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळा, टोलनाके, सत्तेवर आल्यानंतर विफल ठरलेली मोदी सरकारची आश्वासने याची म्हणावी तशी गंभीर चर्चा झाली नाही. याबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्नही संबंधित पक्षांनी केला नाही,
हे मतदारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण अशा प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर काय होऊ शकते, ते मतदारांनी दाखवून देण्याची ही वेळ आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना गृहीत धरतात. आपण काहीही उच्छाद मांडला तरी मतदारांना आपल्याशिवाय पर्याय नाही, असे काहींना वाटते. हा निर्ढावलेला विश्वास मोडून काढण्याची मतदारांना ही संधी आहे. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचा कडक असा लेखाजोखा मतदार मागणार आहेत आणि ते दिल्याशिवाय आपली सुटका नाही, हे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मनावर या मतदानातून बिंबवणे गरजेचे आहे.

Web Title: Today is your day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.